क्षितिजा धाडकन खाली कोसळते. तिच्या अंगाला घाम फुटलेला असतो. तिचं रडणं चालू असत पण घशातून आवाज फुटत नसतो. मी तुझ्यासाठी येईन बोलणारी देवयानी अशी अचानक. ह्या गोष्टीवर तिचं विश्वास बसत नाही.
To Be Continued....
रेशम ने क्षितिजाला तोंडावर पाणी मारून उठवल. अग काय झालं? एवढी का घाबरली आहेस? एवढा का घाम फुटला आहे तुला. कधीच उठवते आहे. शेवटी पाणी मारल तोंडावर तेव्हा उठलीस.
..... रेशम
..... रेशम
अग रेशम देवयानी. ती गेली मला सोडून.
......क्षितिजा
अग वेडी आहेस का क्षितिजा. तिचं ऑपरेशन चालू आहे अजून. तू काय बडबडत आहेस. शुध्दीवर ये आधी तु. तुला स्वप्न पडल असेल. तुझा डोळा लागलेला.
..... रेशम
किती वाईट स्वप्न होत हे. असे काही झालं तर मी.
क्षितिजा पुढे काही बोलणार तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात.
ऑपरेशन खूप छान झालं आहे.थोड्याच वेळात त्यांना बाहेर शिफ्ट करू. त्यांची काळजी घ्या. नंतर माझ्या केबिनमध्ये या. मी बाकी सगळे समजावून सांगतो.
एवढं बोलून डॉक्टर निघून जातात.
ऑपरेशन खूप छान झालं आहे.थोड्याच वेळात त्यांना बाहेर शिफ्ट करू. त्यांची काळजी घ्या. नंतर माझ्या केबिनमध्ये या. मी बाकी सगळे समजावून सांगतो.
एवढं बोलून डॉक्टर निघून जातात.
क्षितिजा रेशमला मिठी मारते आणि तिला थँक्यू बोलते...
थँक्यू रेशम म्हणजे हो तू सांगितल होत की तू माझ्यासाठी देवयानीला शोधून काढशील आणि तू तसचं करून दाखवलं. तुझे आभार कसे मानू हेच कळत नाहीय मला. तुझे हे उपकार मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. तुझ्यामुळे देवयानी वेळेत सापडली. आज ती एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आली आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे तिचं वेळेत ऑपरेशन झालं तिचा जीव वाचला. तुला कल्पना नाहीय तू जे काही केलं आहेस माझ्यासाठी त्याची परतफेड कधीच नाही करू शकणार मी. खरचं खुप खुप थँक्यू तुला.
.....क्षितिजा

क्षितिजा खरं सांगू तुला मलाही नव्हत माहित की मी देवयानीला शोधू शकेन की नाही. पण मला एक खात्री होती की तुझे प्रेम तुझा विश्वास जो पर्यंत तिच्यासोबत आहे तो पर्यंत तिला काही होणार नाही. त्याच विश्वासाने मला तिला शोधायची जिद्द मिळाली.
तुला अजून काही तरी सांगायचे आहे क्षितिजा म्हणजे अर्थात तू त्याचा चुकीचा अर्थ नसणार काढशील तर सांगते.
......रेशम
......रेशम
हा बोल ना रेशम. सगळे ठीक आहे ना म्हणजे तू एवढ्या टेन्शनमध्ये येऊन बोलतेय ते.
.......क्षितिजा
.......क्षितिजा
अग हो सगळे ठीक आहे. खरं तर मला तू आवडतेस म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो पन्नाच्या केबिनमध्ये तेव्हा तू माझ्याकडे एकटक बघत होतीस ते माझ्या लक्षात आले होते. तुला पन्ना ने सावरून घेतल खरं त्या वेळेस पण ते ही मला कळत होत. नंतर मी मुद्दाम तुझ्याशी मैत्री वाढवण्यासाठी पन्ना समोर तू असताना ते मदतीसाठी बोलले. नाहीतर माझ्यासोबत मदतीला एक व्यक्ती येणार होती मी तिला कॅन्सल केलं होत. नंतर जसं आपल भेटणं, बोलणं आणि मैत्री घट्ट होत गेली तेव्हा वाटायला लागलं की तुला सुद्धा मी आवडतं असेन म्हणून तू एवढं छान आणि आपल असल्याप्रमाणे बोलतेस माझ्यासोबत ते मला अजून तुझ्या जवळ आणत होत. एकदा पन्ना समोर सहज मी हे बोलले की मला तू आवडतेस आणि कदाचित तुला सुध्दा मी. तेव्हा पन्ना ने सांगितल तुझ्या आणि देवयानी बद्दल अर्थात तुझ्या देवयानी वरच्या प्रेमा बद्दल. तेव्हा त्यांनी मला एकच सांगितल बघ बाळा.
" तिचं ती पहिलं प्रेम आहे. ते तिने तिच्या मनाच्या कोपऱ्यात बंद करून जपून ठेवलं आहे. अजूनही समाज तेवढा सुधारला नाही की हे सगळे स्वीकारेल. त्यामुळे तिने कधी तिचं प्रेम व्यक्त नाही केलं पण विसरली सुद्धा नाहीय ती. तिच्या आयुष्यात किती ही माणसं आली. किती ही सुंदर मुली आल्या तरी तिचं प्रेम नेहमी देवयानी साठीच राहिलं. "
मला त्यांचं ते बोलणं पटलं. मला लहानपणापासून सगळे मिळत होत. माझे वेगळं असणं सगळ्यांनी समजून घेतल होत. माझे करिअर छान रुळावर होत. माझी कॉलेज लाईफ सगळे सगळे छान होत म्हणून मला असं वाटलं की प्रेम सुद्धा मला सहज मिळेल. पण काही वेळेस मिळविण्यापेक्षा, देऊन बघावं छान वाटतं. तेच मी केलं तुझे प्रेम तुला मिळवून दिलं त्याने मला अजून छान वाटतं आहे.

क्षितिजा आज एक गोष्ट समजली जी पन्ना मला त्या दिवशी शेवटी बोलल्या. " बाळा प्रत्येक वेळेस खांदा देताना तो प्रेमाचा असावा असे गरजेचं नाहीय ना. कधी मैत्रीचा किंवा दुसऱ्या कोणत्या नात्याने खांदा देऊन बघ अजून छान वाटतं. "
मी आज तेच केलं. तुझे सुख देवयानी सोबत आहे. मैत्री म्हणून मी असेन आणि तस ही मी इतकी सुंदर आणि हॉट आहे की मला दुसरी कोणीही भेटेल. वो तो आपका नसिब खराब हैं. जो हम आपको ना मिले.
...... रेशम एवढं बोलून क्षितिजाला मिठी मारते.
...... रेशम एवढं बोलून क्षितिजाला मिठी मारते.
रेशम मला कल्पना सुद्धा नव्हती की तुझ्या मनात असे काही असेल पण हो पन्ना बोलल्या तो शब्द नी शब्द खरा आहे. देवयानी माझे प्रेम आहे आणि आयुष्य सुद्धा.
हे पण खर आहे की तू खरचं खुप छान आहेस तुला खरचं चांगली कोणी भेटेल......
.....क्षितिजा
दोघी हसत डॉक्टरच्या केबिनमध्ये जातात.
" बसा. देवयानीच ऑपरेशन खूप छान झालं आहे पण पुढचे काही दिवस तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. आम्ही अजून दोन दिवस त्यांना इथे ठेऊ. नंतर डिस्चार्ज देऊ. खरं तर त्यांच्या ऑपरेशन पेक्षा त्यांच्यावरचा मानसिक आघात खुप मोठा असेल. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा जशी परिस्थीत होती तशी पुन्हा उद्भवणार नाही. काही गरज लागलीच किंवा तशी काही परिस्थिती ओढवली तर मग मानोपचारतज्ञाकडे दाखवाव लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घ्या. "
डॉक्टरांन सोबत बोलून आल्यावर क्षितिजा खूप टेन्शनमध्ये असते. देवयानीला सुद्धा अजून वार्डमध्ये आणलेलं नसत.
" क्षितिजा कसल टेन्शन घेतेस. तू सोबत असताना देवयानीला काही होणार नाही. जर काही लागलंच तर आम्ही सुद्धा आहोत की पन्ना पण आहेत.तू नको जास्त टेन्शन घेऊ. सगळे ठीक होईल."
..... रेशम
"तू बोलतेस ते बरोबर आहे पण मला आता देवयानीला कोणत्याच कारणांमुळे गमवायच नाहीय. त्यासाठी मला त्या हर्शद्चा जीव घ्यावा लागला तरी चालेल. त्याच्यामुळे आज माझी देवयानी अश्या परिस्थितीमध्ये आहे. असं वाटतं त्याला शोधून त्याला शिक्षा देऊ. पण सध्या देवयानीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे"
......क्षितिजा
"तुझा राग समजतोय पण खरचं सध्या देवयानीकडे लक्ष दे.बाकी तुझे काम पन्ना ने सुरू केलंय. "
...... रेशम
...... रेशम
" म्हणजे कशाबद्दल बोलतेय तू रेशम.?"
......क्षितिजा
"काही नाही थोडा निवांत वेळ मिळाला की पन्ना ला फोन कर त्या सांगितल तुला सगळे."
...... रेशम
...... रेशम
To Be Continued....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा