जेवणाची वेळ असते तरी क्षितिजा कामात गुंग असते. सगळे जेवणासाठी निघून जातात. देवयानी थोडा वेळ वाट बघते आणि क्षितिजाला विचारायला जाते.
देवयानी - तू येणार आहेस का जेवायला. नसेल यायचं तर तसं सांग मलाही मेथीची भाजी आवडते. जेवेन मी एकटी.
मेथीच्या भाजीच नाव ऐकून क्षितिजा जागेवरून उठते.
क्षितिजा - काय मेथीची भाजी. अगोदर का नाही सांगितलं? चल दे मला तुझा डब्बा. हा घे माझा डब्बा. चल ना.
देवयानी - कसली हावरी आहेस तू. आता तू चिडली होतीस आणि खायचं नाव काढल की कसं ना सगळे विसरतेस.
क्षितिजा - हो मग. जेवणावर राग काढू नये असे म्हणतात आणि मेथीच्या भाजीला नाही म्हणायचं पाप कोण करेल.
त्यांच्या गप्पा सुरू असताना तिथे हर्षद येतो. हर्षद देवयानी सोबतच नोकरीला लागलेला असतो. हर्षद देवयानीला विचारतो.." तू येणार आहेस ना ट्रीप ला म्हणजे आम्ही सगळेच जाणार आहोत. संतोष म्हणत होता की क्षितिजा नाही येणार ती कधीच जात नाही. मग तू तरी चल आमच्यासोबत."
देवयानी - हो अरे येणार आहे मी आणि हो क्षितिजा सुध्दा येणार आहे ह्या वेळेस.
( देवयानी सोबत थोड्या फार गप्पा मारून हर्षद तिथून निघून जातो )
क्षितिजा - तू स्वतः ठरवलं का सगळे. मी येणार आहे हे आणि तू जाणार आहेस. तुला मी नाही पाठवणार.
देवयानी - चल ना. फक्त एकदा माझ्यासाठी चल. आपल्याला इतरांसोबत काय करायचं आहे. आपण आपली मज्जा करू ना. प्लीज.
क्षितिजा - ठीक आहे. आपण ह्यावर नंतर बोलू. आज सोमवार आहे अजून खूप दिवस बाकी आहेत. बघू नंतर काय करायचं ते.
देवयानी - ठीक आहे म्हणजे हो. चल आता निघू खूप काम आहे ना आज. मी जाते पुढे तू ये तुझे झाले की. ( देवयानी मनात बोलते. आता हीच प्रवचन ऐकण्यापेक्षा इथून निघालेले बरं. ) देवयानी निघून जाते.
क्षितिजा एकटीच कॅन्टीन मध्ये असते आता. जेवण संपवून ती ही तिथून निघते. आपल्या जागेवर जाऊन पुन्हा कामाला लागते.
ऑफिस सुटल्यावर दोघी घरी जायला निघतात. खूप थकलेल्या असल्याने दोघी एकमेकींना निरोप देऊन घरी जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपली दिनचर्या सुरू करतात. रोज तेच आपल कामावर यायचं आणि थकून घरी जायचं. ( मला माहित आहे तुम्ही सुद्धा आता ह्या सगळ्याला कंटाळला असाल ????.. तर पुढे.)
पण ह्या सगळ्यात क्षितिजाच्या एक गोष्ट लक्षात येते. हर्षद रोज देवयानीला एखाद्या मजनू सारखं न्याहाळत असतो. तिला सुरवातीला वाटतं की तिचा अंदाज चुकत असेल. पण आता येता जाता तो देवयानी सोबत बोलायचा प्रयत्न करत असतो. अचानक क्षितिजा एकदा देवयानी कडे विषय काढते.
क्षितिजा - तो हर्षद तो काय सारखं बघत असतो तुला आणि एवढं काय बोलायचं असतं त्याला तुझ्याशी. मला ह्या तेरी मेरी यारी मधे एक दुजे के लिये नको आहे हा.
देवयानी - एक दुजे के लिये. अग क्षितिजा काय बोलतेय तू. वेड लागलं आहे का? तो फक्त ऑफिस पुरता बोलतो तेही एकत्र काम करतो आपण म्हणून बाकी काही नाही. तुझ्या डोक्यात कधी काय येईल तुलाच माहित असत.
क्षितिजा - तरी मला त्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत. तू त्याच्यापासून थोड लांबच रहा.
देवयानी - ठीक आहे. तू म्हणतेस तर राहते. मग विकेंड च पक्का आहे ना.
क्षितिजा - हो. मी आईची सुद्धा घेतली आहे. तू तयारी कर.
देवयानी क्षितिजा ला thank you बोलून मिठी मारून तिथून आनंदात निघून जाते. क्षितिजा एकटीच विचार करत असते. " हर्षद देवयानी सोबत बोलत असताना मला वाईट का वाटत? देवयानी मला इतकी जवळची का वाटते? काही कळत नाहीय ह्या मुलीने काय जादू केली आहे ते. आज पर्यंत मी कधी शाळेच्या पिकनिकला ही गेले नाही आणि आता ऑफिस ट्रीपला चालले आहे. माझ्या भावना काहीतरी वेगळीच दिशा घेतायत. चलो क्षितिजा तेरा बर्ताव कुछ ठीक नहीं हैं। तुझमें जरूर कुछ गडबड हैं।
दुसऱ्या दिवशी शनिवार सगळ्यांनी सकाळी सात वाजता ऑफिस बिल्डिंग जवळ भेटायचं आणि तिथूनच एकत्र रिसॉर्ट वर जायचं.
सकाळी सात वाजता ठरल्या प्रमाणे सगळे ऑफिस बिल्डिंग खाली भेटतात. तिथून मिनी बसने सगळे निघतात. इथे ही हर्षद देवयानी सोबत बोलायचा एकही चान्स सोडत नाही. तो देवयानी च्या बाजूला येऊन बसतो. क्षितिजा चिडून आपली एकटीच शेवटच्या सीटवर जाऊन बसते. ती बाहेरच निसर्गरम्य वातावरण बघत. कानात हेडफोन्स घालून गाणी ऐकत असते. बाकी सगळ्यांच्या गाण्यांच्या भेंड्या, मज्जा मस्ती चालू असते. तासाभराने सगळे शांत बसून थोडा आराम करतात. रिसॉर्ट वर पोहचायला अजून तासभर तरी लागणार असतो म्हणून देवयानी ही थोडा वेळ आराम करायचा विचार करते. ती हर्षद ला सांगून क्षितिजा च्या सिटवर जाऊन बसते. देवयानीला बघूनही क्षितिजा आपली गाणी ऐकण्यात गुंग असते. देवयानी ला समजत क्षितिजा चिडली आहे ती तिच्या बाजूला बसून तिचा हात हातात घेऊन काही न बोलता तिच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपून जाते. क्षितिजा ही शांततेत गाणी ऐकत बसते. साधारणतः दीड तासानंतर सगळे रिसॉर्ट वर पोचतात. सगळे ठरवून दिलेल्या रूमवर जातात. रूमवर सामान ठेऊन फ्रेश होऊन नाश्त्यासाठी खाली एकत्र भेटायचं ठरत. क्षितिजा आणि देवयानी ला एकच रूम दिलेली असते. कारण क्षितिजाला देवयानी शिवाय कोणी सांभाळू शकत नाही आणि तिचं इतर कोणासोबत कामाशिवाय जमत नाही. रूमवर गेल्यावर क्षितिजा मोबाईल चार्जिंग ला लावते आणि फ्रेश होण्यासाठी जाते. क्षितिजा फ्रेश होऊन बाहेर येते तरी ती देवयानी सोबत काहीच बोलत नाही. ते बघून देवयानी च तिच्या जवळ जाते.
देवयानी - ( क्षितिजा च्या खांद्यावर हात टाकून ) चिडली आहे तर एक मुलगी...की मग मला गमवायची भिती वाटते. नाही नाही मला कोणी पळवून न्यायची भिती वाटत असेल हो ना..
क्षितिजा - हे बघ. तू मस्ती करू नकोस. असे काही नाहीय. आईने माझ्या जबाबदारीवर तुला इथे पाठवलंय ह्याच भान ठेव. तुला खूप वेळा सांगितलं आहे की त्या हर्षद पासून लांब रहा. तुला समजतच नाहीय माझे म्हणणं. जाऊदे मला काही हक्क नाहीय हे सगळे बोलण्याचा.
देवयानी - मला तुझी काळजी समजते आहे. मी नाही आता असे वागणार. सॉरी ना.
क्षितिजा - लवकर आवर आणि चल खाली. नाही तर तो मजनू येईल इथे.
देवयानी हसत फ्रेश व्हायला जाते. दोघी आवरून खाली नाश्त्यासाठी जातात. सगळे नाष्टा करून मस्त एन्जॉय करतात. मस्ती मज्जा करण्यात दुपार होते. सगळे जेवण आटपून आराम करतात आणि संध्याकाळी बाहेर फिरायला जातात. फिरून परत आल्यावर रात्रीच जेवण आटपून सगळे गप्पा मारत, खेळत बसतात. बराच वेळ गप्पा, गाणी, गोष्टी होतात. हळू हळू करून सगळ्यांना दिवसभर थकल्याने झोप येत असते. सगळे एकमेकांना गुड नाईट करून रूमवर जातात. सगळ्यांना छान झोप लागते. देवयानी ही खूप वर्षानंतर असे बाहेर आलेली असते. म्हणून ती आनंदी असते. ती ही झोपून जाते. क्षितिजा आपली एकटी विचार करत बसते. तिचं मन खूप अशांत असत. ती विचार करत असते. मला असे का होतंय. सगळे चांगलं चाललं आहे. देवयानी ही खुश आहे आणि माझे काय असं मलाच समजत नाहीय. ती देवयानी कडे एकटक बघत असते. किती छान आणि निरागस आहे ही. आजचा दिवसभराचा आनंद हिच्या चेहऱ्यावर किती उठून दिसतोय. बरं झालं मी यायला हो म्हणाले नाहीतर एवढे सुंदर क्षण आणि देवयानी सोबत एवढा छान वेळ घालवायचा चान्स मी गमावला असता. विचार करता करता क्षितिजाला झोप लागते. सकाळी आलर्मने दोघींना जाग येते. दोघी आपल लवकर आवरून खाली येतात. सगळे नाश्ता करून थोड फिरून जेवून मग निघायचं ठरवतात. आजचा ही अर्धा दिवस छान निघून जातो. सहा वाजता सगळे आपल आवरून बस मध्ये बसतात. आता मात्र देवयानी अगोदरच क्षितिजा सोबत बसते. नऊ पर्यंत सगळे घरी पोहचतात. आज कितीही थकला असलात. तरी उद्या ऑफिसला यायचं आहे सगळ्यांनी. अशी ताकीद बॉसने दिलेली असते.
दुसऱ्यदिवशी क्षितिजा लवकर ऑफीसमध्ये पोहचते. ऑफिसमध्ये देवयानी सोडून सगळेच आलेले असतात. क्षितिजा डेस्क वर आपली बॅग ठेऊन कामासाठी बॉसच्या केबिनमध्ये जायला निघते. ती केबिन चा दरवाजा वाजवते. आतून बॉस काहीच आवाज देत नाही म्हणून ती दरवाजा थोडा ढकलून आत येऊ का विचारते. बॉस तिला हातानेच आत यायला खुणावतात. आतमध्ये गेल्यावर बॉस क्षितिजाला म्हणतात.. "बरं झालं तू आलीस ते. माझेही काम होत तुझ्याकडे तू काय कामासाठी आली आहेस.?" इतक्यात बॉसच्या मोबाईलवर मेसेज येतो म्हणून ते मोबाईल काढतात तर ते फोटो बघून ते शॉक होतात. ते देवयानी चे रिसॉर्टच्या बाथरूम मधले फोटो असतात. आंघोळ करताना आणि कपडे बदलताना. न्यूड फोटो आणि व्हिडिओ. ते क्षितिजाच्या नंबर वरून आलेले असतात.....
( काही प्रसंग आणि काही गोष्टी आपले आयुष्य एका क्षणात बदलून टाकतात. देवयानी चे फोटो तेही बॉसच्या मोबाईलवर क्षितिजा च्या नंबर वरून कसे आले? क्षितिजा ने हे केलं असेल का? पण ती असे का करेल? ती नाही तर मग कोण असेल?....बघुया पुढच्या भागात...तो पर्यंत सगळे काळजी घ्या आणि कुठेही बाहेर गेल्यावर कपडे बदलताना किंवा आंघोळ करताना आपण एखाद्या कॅमेऱ्याच्या कैदेत तर हे सगळे करत नाही आहोत ना ह्याची दखल घ्या.)
To Be Continued....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा