क्षितिजाकडे बॉस रागाने बघत असतात. तेवढ्यात धावतच हर्षद आतमध्ये येतो..." सर ते माझ्या मोबाईलवर देवयानी चे...हर्षद घाबरतच बोलत असतो. क्षितिजा हे सगळे काय चालय हे बघत असते. ते बघून बॉस क्षितिजाला ओरडतात.." तू अशी काहीच माहीत नसल्यासारखं काय बघतेस. हे सगळे तूच केलंस ना. तुला अक्कल आहे स्वतःच्या मैत्रिणी सोबत कोणी असे वागत का? देवयानीला कळलं तर ती जीव देईल. मला तर तुझ्यासोबत बोलायची सुद्धा इच्छा नाहीय." त्याच वेळेत देवयानी ऑफीसमध्ये येते. ते फोटोज् आणि व्हिडिओ ऑफिस मधल्या सगळ्यांच्या मोबाईलवर गेलेले असतात. देवयानी ऑफीसमध्ये येताच सगळे तिच्या कडे बघून काही ना काही कुजबुजत असतात. बॉस हर्षद कडे निरोप देऊन देवयानीला केबिनमध्ये बोलवता त. देवयानी केबिनमध्ये जाते. बॉस तिला बसायला सांगून क्षितिजाला बाहेर जायला सांगतात. देवयानीला सगळी घडलेली घटना ते सांगतात. ते फोटो क्षितिजा च्या मोबाईलवरून सगळ्यांना गेले आहेत. क्षितिजा ने असं का केलं ते मला माहित नाही. पण मी हे सगळे प्रकरण ऑफीसमध्ये च मिटवतो. तू काळजी नको करुस आणि क्षितिजाला आजच कामावरून काढून टाकतो. बॉस केबिन मधून बाहेर येतात आणि सगळ्यांच्या मोबाईल मधून स्वतः तो फोटोज् आणि व्हिडिओज चा डेटा डिलीट करतात. क्षितिजा च्या मोबाईल मधून ही डेटा डिलीट करून तिचा मोबाईल जपत करतात आणि तिला ऑफिसमधून लगेच निघून जायला सांगतात. पुन्हा ह्या ऑफीसमध्ये दिसायचं नाही. असं केलंस तर तुझी पोलिसात तक्रार करेन आणि इथून पुढे ऑफिस मधल्या कोणाचं सोबत काहीच संबंध ठेवायचं नाही.
क्षितिजा देवयानी सोबत बोलायचा खूप प्रयत्न करते पण देवयानी ह्या सगळ्या प्रकाराने आतून खूप तुटलेली असते. ती तिच्यासोबत काहीच बोलत नाही. ते पाहून हर्षद क्षितिजावर ओरडतो. " तुला अजुन तिला त्रास द्यायची गरज नाहीय. तू निघून जा आता इथून आणि पुन्हा तिला भेटायचं प्रयत्न करू नकोस. तिने किती विश्वास ठेवला तुझ्यावर आणि तू असं वागलीस. मैत्रीवरचा विश्वास तुझ्यामुळे उडाला आहे. तू प्लीज जा. मी हात जोडतो. माझ्याने देवयानी चा त्रास नाही बघवत."
क्षितिजा तिथून निघून जाते. काही दिवस असेच शांत वातावरणात निघून जातात. दरम्यान हर्षद देवयानीला ह्या सगळ्यातून सावरायला खूप मदत करतो. तो नेहमी तिला आनंदी ठेवण्याचा हसवण्याचा प्रयत्न करत असतो. तिला ऑफीसमध्ये काही अडचण आली तर मदत करतो. देवयानी ही हळू हळू ह्या सगळ्यातून बाहेर पडते. आता ती सगळ्यांमध्ये मिसळायला लागलेली असते. पण क्षितिजा ची आठवण आणि तिने केलेलं ते कृत्य तिच्या डोक्यातून जात नाही. ती नेहमी विचार करते हर्षद पासून क्षितिजा ने मला नेहमी लांब राहायला सांगितलं पण तोच हर्षद आज माझी एवढी मदत करतोय. मला ह्या सगळ्यातून बाहेर काढायला प्रयत्न करतोय. ह्याच्या जागी दुसरा मुलगा आता तर त्याने फायदा घेतला असता. मी उगाच क्षितिजा च ऐकल. तिला एवढा जीव लावून तिने माझ्याच सोबत असे केलं.
हर्षद आणि देवयानी ची मैत्री दिवसेंदिवस वाढत असते. देवयानी ला सुद्धा त्याची सोबत त्याचा सहवास आवडू लागतो. नकळत ती त्याच्या प्रेमात पडत असते. ऑफिसला एकत्र येणं - जाणं देवयानीला स्वतःच्या बाईकवरून घरी सोडणे. ऑफीसमध्ये तिच्या कामात तिला मदत करणे. ह्या सगळ्यांनी देवयानी क्षितिजाला विसरून जाते. ती पुन्हा नव्याने आयुष्य जगायला सुरवात करते.
एक दिवस असच हर्षद देवयानीला बाईकवरुन घरी सोडायला निघतो. त्याला आज देवयानी सोबत बोलायचं असत म्हणून तो तिला कॉफी साठी विचारतो. देवयानी ही होकार देते. दोघे एका छोट्या हॉटेलमध्ये कॉफी साठी जातात. हर्षद कॉफी मागवतो आणि दोघांच्या गप्पा सुरू होतात.
देवयानी - हर्षद बोल तुला काही तरी बोलायचं होत ना.
हर्षद - हो खरं तर ते. मला तुला हे सांगायचं होत.( हर्षद देवयानी चा हात हातात घेऊन बोलतो) जिथे तू असावे तिथे मी असावे आपल्या दोघांशिवाय मग तिथे तिसरे कोणीच नसावे. I love you देवयानी.तू लग्न करशील का माझ्यासोबत?
देवयानी - हर्षद काही दिवस झाले माझ्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी खूप वेगाने होत आहेत. क्षितिजा च असं वागणं पुन्हा ते माझे फोटोज्. तुझं माझ्या आयुष्यात येणं मला आधार देण आणि अचानक हे प्रोपोज करण. मला थोडा वेळ दे विचार करायला. मला ही तू आवडतोस नाही असे नाही पण प्रेमाच्या बाबतीत मी अजुनही थोडी गोंधळलेली आहे. क्षितिजा माझ्यासाठी खूप खास होती तिने असे का केले. ह्याच कारण मला माहित नाही. पण मी तिला बोलायची एक संधी पण नाही दिली. जशी परिस्थिती होती तस मी वागले आणि तिला दोषी ठरवून मोकळी झाले. झालं ते जाऊदे मी तुझं उत्तर उद्या देईन.
हर्षद - ठीक आहे. घे तू तुझा वेळ मी समजू शकतो तुझी मनस्थिती काय आहे ते. मी वाट बघेन तुझ्या उत्तराची. चल आता आपण नीघुया मी तुला घरी सोडतो आणि मग मी घरी जाईन.
देवयानी आणि हर्षद दोघे ही तिथून निघतात. हर्षद देवयानीला घरी सोडून त्याच्या घरी जातो. देवयानी हर्षद विषयी आईला सांगते. आई क्षितिजा बद्दल खूप प्रश्न विचारते पण क्षितिजा चा काही तरी घरचा प्रोब्लेम झाला आणि म्हणून तिने जॉब सोडला असे ती सांगते. देवयानी आईला सांगते की हर्षद ने आज मला लग्नासाठी विचारलं आणि तो आमच्याच ऑफीसमध्ये काम करतो. मला तो मुलगा चांगला वाटतो. मी तुझ्या होकारासाठी त्याला थांबवलं आहे. मी उद्या त्याला तुला भेटायला घेऊन येईन. आई आता तूच सांग मी काय करू.
देवयानी ची आई - बघ बाळा आता तुझ्या लग्नाची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. तुला तो मुलगा चांगला वाटतो पण तो मुलगा खरच चांगला आहे किंवा नाही ह्याची खात्री करून मग त्याला होकार कळव. तुझ्या आयुष्याचा निर्णय आहे तो चुकता कामा नये. मला फार काही माणसं ओळखता येत नाहीत. पण तुला त्याच्या सोबत लग्न करून पूर्ण आयुष्य त्याच्या सोबत घालवायचं आहे तर तू नीट पारख कर त्याची. उद्या त्याला भेटायला घेऊन ये.
देवयानी - हो आई. तो माझी खूप काळजी घेतो आणि मेहनती पण खूप आहे. त्याचे फार मित्र वैगरे आहेत असे कधी मला जाणवलं नाही पण तो मला खूप समजून घेतो. एका मुलीला आपल्या नवऱ्याकडून अजुन काय अपेक्षा असणार. मी उद्या त्याला घरी घेऊन येते.
दुसऱ्या दिवशी देवयानी हर्षद ला सांगते. तुला आईने घरी बोलवलं आहे. तिचं माझे सर्वकाही आहे. तू घरी ये तिला भेट मग मी माझे उत्तर तुला कळवेन. हर्षद त्यावर होकार देतो. ऑफिसमधून निघाल्यावर दोघे देवयानी च्या घरी जातात. हर्षद देवयानी च्या आईसाठी गुलाबजाम घेऊन जातो. हर्षद तिच्या आईच्या पाया पडतो आणि तब्येतीची विचारपूस करतो. देवयानी ची आई त्याला त्याच्या घरच्यांना बद्दल विचारते. त्यावर आईवडील गावी असतात. मी इथे एकटा रूम भाड्याने घेऊन राहतो आणि नोकरी करतो. आईवडिलांना सांगितलं आहे त्यांची काही हरकत नाहीय लग्नासाठी. त्यांना देवयानी पसंत आहे. आई तुम्ही फक्त तुमचं उत्तर सांगा म्हणजे आम्ही बंधनात अडकायला मोकळे.
देवयानी ची आई - बघ पोरा. देवयानी माझी एकुलती एक मुलगी तिला भाऊ बहीण कोणी नाहीय. तिचे वडील सुद्धा वारले. त्यानंतर आम्ही दोघींचं एकमेकींना आधार आहोत. आम्हाला कोणी नातेवाईक नाही. त्यामुळे तुमचं लग्न कोर्टात पार पाडावे लागेल. आम्हाला लग्नाचा खर्च काही झेपणार नाही. तसे तुझ्या आई - वडिलांना सांग आणि मग ठरवा काय करायचं ते.
हर्षद - मला काही हरकत नाहीय. माझे आईवडील ह्या सगळ्यासाठी नाही बोलणार नाहीत ह्याची मला खात्री आहे. त्यामुळे आपण लग्नाची तयारी करूया.
तिघे ही सगळ्या गोष्टींची बोलणी करतात. देवयानी ही लग्नाला होकार देते. सगळी बोलणी करून आणि कोर्टातून लग्नाची तारीख घेण्यासाठी उद्याच जाऊया असे ठरवून हर्षद, देवयानी आणि तिच्या आईचा निरोप घेऊन निघतो.
देवयानी आज खूप खुश असते. पण तरीही काहीतरी कमी तिला टोचत असते. क्षितिजा ची आठवण तिला सारखी येत असते. एक मन म्हणत असत क्षितिजा असं करूच शकत नाही. पण मग ऑफिस समोर सगळ्यांसमोर जे झालं ते खोटं कसं असू शकत. ती स्वतःची च समजूत घालत विचारात झोपून जाते.
दुसऱ्या दिवशी लवकर निघून हर्षद आणि देवयानी कोर्टात जातात. कोर्टातून लग्नाची पंधरा दिवसानंतर ची तारीख मिळते. जास्त काही काम नसल्याने दोघेही तिचं तारीख नक्की करतात. देवयानी आईला कळवते. हर्षद ही त्याच्या घरी फोन करून सांगतो.
देवयानी - काय रे? मलाही आई बाबांसोबत बोलायचं होत. तू कधी देणार आहेस बोलायला. फोन का ठेवलास लगेच.
हर्षद - अग बाबा इथे यायचं म्हणून त्यांची सगळी काम उरकून घेतायत आणि आई ती तर खूप खुश आहे. ती तारीख ऐकल्यावर लगेच तयारीला लागली सुध्दा. चल तू आपल्याला पण कपडे वैगरे घ्यायला हवे.
हर्षद देवयानीला घेऊन निघतो. लग्नाची शॉपिंग आणि काम ह्यात दिवस लगेच निघून जातात आणि लग्नाची तारीख उद्यावर येते.
( चला. उद्या हर्षद आणि देवयानी च्या लग्नाला सगळ्यांनी नक्की यायचं हा. )
To Be Continued...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा