दोघेही एकरूप होतात. बराच वेळ गेल्यानंतर हर्षद देवयानी पासून लांब होतो.
हर्षद च्या चेहऱ्यावर एक वेगळच समाधान असत. पण देवयानी चा चेहरा आता खूप उतरलेला असतो. पहिल्या रात्रीच तेज आणि पहिल्यांदा शरीर संबंध केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर अजिबात नसतो.
हर्षद देवयानी ला विचारतो. काय झालं तुला काही त्रास झालं का? म्हणजे तसं पहिल्यांदा त्रास होतोच. पण तू काळजी नको करुस नंतर नाही होणार तुला त्रास. तू आता झोप. आपण सकाळी बोलू. मला उद्या थोड काम आहे.
देवयानी विचार करत पडते.. पहिल्यांदा त्रास होतो वैगरे मी ही ऐकलं होत पण हर्षद काही वेगळच वागत होता. मला त्रास होत होता. मी थांब म्हणत होते हे त्याला नसेल का समजल. माझा आवाज त्याला ऐकू नसेल का गेला. का असं केलं त्याने पहिल्या रात्रीच कुतूहल तो आनंद तो अविस्मरणीय क्षण काहीच नाहीय माझ्याकडे. मी काही वेगळा विचार करतेय का?
विचार करता करता देवयानीला झोप लागते. सकाळी तिला लवकर उठायची सवय असल्याने लवकर जाग येते. ती सकाळी उठून अंघोळ करते तिचं आवरते आणि नाश्त्याच्या तयारीला लागते. हर्षद अजून झोपलेला असतो. तिचं सगळे आवरून होत. ती चहा पित बसते. तेवढ्यात हर्षद उठतो. तो उठून त्याच आवरून घेतो. देवयानी त्याला चहा देते आणि दोघांना नाश्त्याला घेते. तो नाष्टा करून त्याच आवरून बाहेर निघून जातो. तिला सांगतो की येतो मी लवकर तू जेवायला थांबू नकोस जेवून घे. ती ही त्याला लवकर ये म्हणून सांगते. असच दिवस जात असतात आता हर्षद पहिल्या रात्री नंतर कधीच पुन्हा तसे वागलेला नसतो. तो खूप रोमँटिक आणि प्रेमाने वागत असतो देवयानी सोबत. पहिल्या रात्री साठी तो देवयानी ची माफी मागतो. देवयानी ही त्याला माफ करते. अधून मधून देवयानी च्या आईकडे येणं जाणे चालू असत. लग्नानंतर पंधरा दिवस कसे निघून जातात दोघांनाही कळत नाही. आता ऑफिसची सुट्टी संपते. दोघांनाही उद्या पासून ऑफिसला जायचं असत. ऑफीसमधे दोघांचंही छान स्वागत होत. काम सुद्धा भरपूर असल्याने दोघेही कामाला लागतात. ऑफिस आणि घर ह्यात आता देवयानी पूर्ण गुंतून जाते. दरम्यान ती हर्षद ला तिच्या आईकडे लक्ष ठेवायला सांगते. त्याला जसं वेळ मिळेल तसे आईकडे जाऊन यायला सांगते. पण हर्षद ला ही त्याच्या कामामुळे वेळ मिळत नाही. तो फोन करून त्यांची चौकशी करत असतो. देवयानी सुद्धा दिवसातून एकदा फोनवरून आईची चौकशी करत असते.
देवयानी ची आई सुद्धा आता खुश असते. आपली मुलगी संसारात खुश आहे. एवढा चांगला जावई आहे. एका माऊलीला अजून काय हवं असणारं. ती देवयानीला सतत सांगत असते. तू तुझ्या संसारात लक्ष दे. माझी काळजी नको करू. मी एकदम छान आहे.
देवयानी सुद्धा हर्षद च्या प्रेमाने खुश असते. तिला आता कोणाची आठवण नसते. क्षितिजा म्हणत होती ते खोटं होत. तिचं माझ्यासोबत चुकीचं वागली असा विचार करत असते. पण असो हर्षद नसता तर मी काय केलं असत. तो इतकं प्रेम करतो माझ्यावर आईचीही काळजी घेत असतो. क्षितिजा कधीच कोणाला समजून न घेता न बोलता कसं त्याच्या बद्दल निष्कर्ष काढायची हे मला अजुनही कळत नाहीय.
आज दोघांच्या लग्नाला एक महिना झालेला असतो. दोघेही खुश असतात. हर्षद ने काही तरी कामासाठी सुट्टी घेतलेली असते. देवयानी नेहमी प्रमाणे ऑफिसला येते. संध्याकाळी लवकर निघून आईला भेटायला जाते. तसे हर्षद ला सांगून ठेवते. दोघं सोबतच जाऊ. असं म्हणून ती कामाला लागते. लंच टाईम मधे ती हर्षद ला फोन लावायला फोन काढते. तितक्यात हर्षद चा समोरून फोन येतो.
देवयानी - अरे मी आता तुलाच फोन करत होते. आपण संध्याकाळी आईला भेटायला जाऊया म्हणून सांगायचं होत.
हर्षद - देवयानी माझे नीट ऐकून घे. मी आता तुझ्या घरीच आहे पण आई आणि तो रडायला लागतो.
देवयानी - काय हर्षद. रडतोस कशाला?
हर्षद - देवयानी तू आता लगेच इथे निघून ये. मी कोणाला तरी सांगतो तुला इथे सोडायला.
देवयानी - अरे पण काय झालं ते तर सांग. एवढं का वेळ लावतोय
हर्षद - देवयानी आई आई आपल्याला सोडून गेली. She is no more....
देवयानी च्या हातातून फोन खाली पडतो आणि ती ही ढासळते. She is no more... हेच शब्द तिच्या भोवती फिरत असतात. आपण जे ऐकलं ते खरं नसणार आई असं अचानक कसं काय होऊ शकतं. ऑफीसमध्ये तिच्या मैत्रिणी तिला पाणी वैगरे देऊन शुद्धीवर आणतात आणि तिला तिच्या आईच्या घरी सोडायला सांगतात. ऑफिस मधला एक मुलगा तिला सोडायला जातो.
देवयानी घरी जाते तेव्हा तिला काही वेगळच दृश्य बघायला मिळत. हर्षद रडत रडत कोणासोबत तरी भांडत असतो. ती क्षितिजा असते. थोड्या वेळासाठी देवयानीला कळत नाही. हे काय चाललं आहे ते. क्षितिजा माझ्या पहिला इथे कशी आली. तेवढ्यात हर्षद देवयानीला बघून तिला आणायला तिच्या जवळ जातो आणि तिला रडत सांगतो.
देवू ह्या क्षितिजा ने आपल्या आईला मारलं. हीच होती इथे मी यायच्या अगोदर पासून आणि कोणाला तरी फोन लावत होती. आई बेडवर पडली होती. मला खात्री आहे हिनेच काही तरी केलं असणारं.
( क्षितिजाची entry तर झाली पण काय वाटतं क्षितिजा मुळे हे सगळे झाल असले? देवयानी ह्या सगळ्यांवर कसं react करेल? आता पर्यंत जेवढे भाग झाले त्यात तुमचा आवडता role कोणाचा?
आणि हो प्रॉमिस पुढचा भाग लवकर अपलोड करेन.)
To Be Continued...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा