पन्ना आणि त्यांचं बोलणं चालू असत. तेवढ्यात एक व्यक्ती सांगायला येते की कोणीतरी व्यक्ती आली आहे तुम्हाला भेटायला संस्थेमधील आहे महत्वाचं काही बोलायचं आहे. आतमध्ये पाठवू का?
पन्ना मानेनेच होकार देतात....
एक साधारणतः २५-२७ वय असलेली मुलगी आत येते. काळेभोर पण हलकेच लाल रंगाने हायलाईट केलेले केस, कपाळावर चंद्रकोर छोटी टिकली, ओठांवर हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक, कानात झुमके, उंची साधारणतः ५ फूट आणि नाजूक बांधा पण साडीमध्ये आकर्षक असे घडी पडणार पोट, बेंबीच्या खाली सुबक आणि रेखीव पद्धतीने नेसलेली साडी, चालताना हलकेच लचकणारी कंबर. कोणाचीही नजर क्षणभर तिच्यावर खिळून राहिली असे मनमोहक सौंदर्य होत तिचं. ती पन्ना समोर स्वतःची ओळख करून देते.
नमस्कार. मी रेशम. रेशम पाटील. मी सात वर्षापासून आपल्या हमसफर च्या मेडिकल डिपार्टमेंटसाठी काम करते. पूर्वी मी मुंबईमध्ये होते पण नंतर कौटुंबिक अडचणींमुळे दिल्लीला शिफ्ट झाले.
रेशम स्वतःबद्दल पन्ना ला ओळख करून देत होती. पण बोलताना तिची ओठांची हालचाल, गालावर त्रास देणाऱ्या केसांना हलकेच बोटाने मागे करण, चेहऱ्यावरील हावभाव आणि हाताची हालचाल. क्षितिजा ची नजर रेशमवर खिळली होती. रेशम सोबत बोलताना अचानक पन्ना च लक्ष क्षितिजावर गेलं. तोंडाचा आव आसून क्षितिजा रेशमकडे बघतेय हे पाहून त्यांना खूप हसू येत असत पण त्या स्वतःला सावरतात आणि रेशमला त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसायला सांगतात. एका व्यक्तीला आत बोलावून त्याला चहा आणायला सांगतात. क्षितिजाला विचारण्यासाठी त्या तिला आवाज देतात तरीही अजून सुद्धा तिच लक्ष रेशमकडेच असत. त्या थोड मोठ्याने आवाज देतात तेव्हा क्षितिजा दचकून भानावर येते.
पन्ना तिला चहा विचारतात.
हो आणते ना.
अग क्षितिजा मी तुला चहा घेणार का विचारते आहे.
हो हो असे का हो घेणार ना.

क्षितिजाचा हा असा गोंधळ पाहून त्या दोघींना हसू आवरत नाही. रेशम आणि पन्ना दोघी हसू लागतात.
काहीतरी स्वतःला सावरायचं म्हणून क्षितिजा म्हणते की ते मी जरा विचारात होते.ते माझे लक्ष जरा सॉरी.
अग हो हो क्षितिजा ते कळलं मला तुझे लक्ष नव्हत माझ्याकडे ते तुझे लक्ष कुठे दुसरीकडेच होत. ठीक आहे. ह्या वयात होत असं.
क्षितिजा प्रश्नार्थक नजरेने पन्ना ना विचारते. असं म्हणजे? तिला लक्षात येत की आपण रेशमकडे बघत होतो ते त्यांनी अचूक घेरलेले असते. पण तिला ही गोष्ट रेशमच्या लक्षात येऊ द्यायची नसते.
अग असं म्हणजे असं विचारात बुडतो माणूस. ठीक आहे काही हरकत नाही. त्या देखील क्षितिजाची बाजू सावरून घेतात.
रेशम ही क्षितिजा आपल्या संस्थेमध्ये येणं जाणं असते हीचं पण ती तिच्या कामानिमित्त बाहेर असते. माझी खूप आवडती लेक आणि एक सुंदर व्यक्तिमत्व.
दोघी एकमेकींना हात मिळवून स्मित हास्य करतात.
रेशम ही क्षितिजा आपल्या संस्थेमध्ये येणं जाणं असते हीचं पण ती तिच्या कामानिमित्त बाहेर असते. माझी खूप आवडती लेक आणि एक सुंदर व्यक्तिमत्व.
दोघी एकमेकींना हात मिळवून स्मित हास्य करतात.
बरं रेशम तुझं काय काम होत?
मेडिकल डिपार्टमेंट ने पाठवलं आहे. संस्थेमधील स्टाफच्या रूटीन चेकअपसाठी पाठवलं आहे. काही बदल करायचे आहेत. त्यामुळे महिनाभर मला रोज संस्थेमध्ये यावं लागेल आणि मला मदतीला कोणीतरी लागेल. फक्त चेकअपसाठी आलेल्या सगळ्यांची माझ्या लॅपटॉप मध्ये नोंदणी करण्यासाठी म्हणजे तपासणी करून, ब्लड सॅम्पल कलेक्ट करायचं काम मी लवकरात लवकर पार पाडेन.
ठीक आहे. तू क्षितिजाला सोबत घेऊन काम कर. ती तुला मदत करेल. ती सुद्धा काही दिवस इथेच आहे. अर्थात तिला चालणार असेल तर आणि तुझी काही हरकत नसेल तर.
मला काहीच हरकत नाही. रेशम क्षितिजाकडे हलकेच एक कटाक्ष टाकून म्हणते.
क्षितिजा सुद्धा होकार देते.
बरं मग उद्या भेटू आपण. ११ वाजता. रेशम क्षितिजाला काही सूचना देते आणि दोघींना निरोप देऊन निघून जाते.
रेशम गेल्यावर पन्ना आपला मोर्चा क्षितिजाकडे वळवतात. काय मग उद्या येणार ना वेळेत. अगदी निरखून पाहत होतीस तिला.
नाही ते असे काही नाही. पण छान दिसते रेशम.
दोघी एकमेकींकडे बघून हसतात. बरं चला. मी पण निघते उद्या येते ११ पर्यंत.
दुसऱ्या दिवशी सकाळी रेशमच्या अगोदर क्षितिजा संस्थेमध्ये पोहचलेली असते. रेशमला यायला अजून बराच वेळ असतो. क्षितिजा आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असते. काही वेळात रेशम सुद्धा तिथे येते.
Good morning assistant. चहा घेणार ना.
रेशम च्या आवाजाने क्षितिजा मोबाईलमधुन आपल डोकं बाहेर काढते.
Good morning madam. हो चहा घेणार मी. आता काही दिवस तरी तुम्ही म्हणाल तसे ऐकावं लागणार ना. मग चहाला तरी नाही कसे म्हणणार.
Good morning madam. हो चहा घेणार मी. आता काही दिवस तरी तुम्ही म्हणाल तसे ऐकावं लागणार ना. मग चहाला तरी नाही कसे म्हणणार.
रेशम दोघींसाठी चहा मागवते.
क्षितिजा तू राहायला कुठे असतेस?
मी मूळची मुंबईची आहे पण सध्या कामानिमित्त बँगलोरला असते.
बरं. मग किती दिवस आहेस मुंबईला म्हणजे मला दुसरा असिस्टंट शोधायची गरज नाही ना म्हणून विचारलं बाकी काही नाही. जमेल ना तुला सगळे.
हो. हो मॅडम. बंदा आपकी सेवा में हाजिर हैं।
हो का? मग बरीच सेवा करून घेईन मी आता तुझ्याकडुन बघच तू फक्त.
हो चालतंय की. चला चहा पिऊन कामाला लागू. नाही तर उशीर होईल. तुम्ही ओव्हरटाईमचा मोबदला सुद्धा देणार नाही मॅडम. ह्या गरिबाला.
हो का? मी पुरेपूर मोबदला देते हा तुमच्या कामाचा तुम्हाला. आता सध्या कामात लक्ष देऊया.
दोघी कामाला सुरुवात करतात. पहिलाच दिवस असल्यामुळे खूप जास्त काम असत. दोघी मन लावून काम करत असतात. चेकअप अनिवार्य असल्यामुळे आणि पन्नानी सगळ्यांना सक्त ताकीद दिल्याने पहिल्याच दिवशी सुद्धा खूप रांग लागलेली असते.
To Be Continued....