कॅनव्हास भाग ५
©® सौ.हेमा पाटील.
नलिनी ताई दमयंतीला मानसोपचार तज्ज्ञ डॉ.उलुपीकडे घेऊन आल्या आहेत... संमोहन शास्त्र उपयोगी न ठरल्याने आकाशिक रेकाॅर्ड तपासून पहावे असे डॉ. उलुपी यांनी सुचवले आहे.
आता पुढे.
आता पुढे.
दमयंतीने आईकडे पाहिले.
" याची खरंच गरज आहे का? मी लग्न केले नाही म्हणून काय बिघडणार आहे?"
यावर नलिनीताई म्हणाल्या,
" तू लग्न केले नाहीस तर काही बिघडणार नाही, पण तुझ्या मनात पुरुषांविषयी जी भीती आहे ती दूर होणे आवश्यक आहे. भविष्यात जर ही भीती वाढली तर तुझे जगणे अबनाॅर्मल होईल. आज आम्ही तुझ्यासोबत आहोत, उद्या आम्ही नसू तेव्हा तुला कोण सावरणार? यासाठी या भीतीला मुळापासून नष्ट केले पाहिजे."
दमयंतीने थोडावेळ विचार केला व तिने आकाशिक रेकाॅर्ड तपासून पहायला डॉक्टर उलुपीला परवानगी दिली.

डाॅ. उलुपीने आधी या दोघींना आकाशिक रेकॉर्डस् बद्दल माहिती सांगितली. आकाशिक रेकॉर्ड म्हणजे आत्म्याचे ऊर्जावान संग्रह! थोडक्यात सांगायचे तर आपण आपले बालपणापासूनचे फोटो आठवण म्हणून जपून ठेवतो. तसाच आपला प्रत्येक आत्म्याचा संपूर्ण प्रवास आकाशिक रेकॉर्ड मध्ये उपलब्ध असतो. आपल्या आध्यात्मिक भाषेत आपण जी पाच तत्वे मानतो त्यापैकी आकाश म्हणजेच पोकळी ! सर्व गोष्टी नष्ट झाल्यावर या अवकाशात सामावल्या जातात असे आपण वैदीक संस्कृती नुसार मानतो.
या आकाशिक रेकॉर्डवर डॉ.लिंडा होवे यांनी खूप संशोधन केले आहे. डाॅ. लिंडा होवे या आत्म्याचा उर्जावान संग्रह वैयक्तिक सक्षमीकरण आणि परिवर्तनासाठी वापरण्यात तज्ञ असलेल्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय तज्ञ आहेत. यांची पाथवे प्रेयर प्रोसेस अतिशय उपयुक्त आहे.
आकाशिक रेकॉर्ड ओपन करणे म्हणजे तुमच्या जीवनाची कहाणी सांगणारे पुस्तक वाचणे. आजच्या वर्तमानकाळातील तुमच्या आयुष्यात काही अडचणी, दुःखे ही खूपदा मागच्या एखाद्या जन्मातून आलेली असतात. आकाशिक रेकॉर्ड आपल्या स्वतःच्या वैयक्तिक स्वरुपाची ओळख करुन देते. याचा अर्थ आपल्या मनातील एखाद्या भीतीचे मूळ कदाचित आपल्यावर बालपणी झालेल्या एखाद्या आघातामुळे झाले आहे हे समजते.
कधीकधी एखाद्या फोबिया किंवा आजाराबाबत जाणून घेता घेता आपण मागील एखाद्या जन्मापर्यंत पण पोहोचतो. मानसिक आणि आधिभौतिक दृष्ट्या झालेले आघात पिढ्यानपिढ्या जाऊ शकतात, पण आकाशिक रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्यासाठी त्या व्यक्तीची परवानगी असावी लागते. तुमचे सध्याचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ या गोष्टी आवश्यक असतात. यांच्या द्वारे आपण आकाशिक रेकॉर्ड मध्ये प्रवेश करुन आत्म्याला क्लेश देणाऱ्या घटनांच्या मुळापर्यंत जाऊ शकतो."

दमयंतीने आकाशिक रेकॉर्ड बद्दल पूर्वी थोडेफार वाचले होते ते तिला आठवले. आज त्याबाबत उलुपीकडून सविस्तर माहिती मिळाल्यावर तिला वाटले,
'प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे?' तिने डाॅ.उलुपीला आकाशिक रेकॉर्ड मध्ये प्रवेश करण्यासाठी आपली अनुमती दर्शविली. तिच्या आईला बाहेर बसायला सांगून डॉ.उलुपीने आपली प्रक्रिया सुरू केली.

दमयंतीला स्फटीकाच्या आधारे ध्यानावस्थेत जाण्यास उलुपीने मदत केली. तिच्या मनात पुरुषांविषयी असणारा तिरस्कार का आहे हे शोधून काढणे डॉ.उलुपीचे काम होते. ती अवचेतन स्थितीत पोहोचली आहे याची खात्री करून घेतली आणि डॉ.उलुपीने तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
तिने पुरुषांविषयीच्या तिरस्काराबद्दल विचारताच दमयंतीचे अंग शहारले. ते पाहून घाव खूप खोलवर आहे हे उलुपीच्या लक्षात आले. हळूहळू तिच्या बालपणीच्या आठवणी जाग्या करत करत उलुपीने तिच्या मनात ठाण मांडून बसलेल्या भीती विषयी तिला प्रश्न विचारला. काही क्षण शांततेत गेले. त्यानंतर ती रडू लागली.

तिला समोर दृश्य दिसत होते. ते पाहताना तिला त्रास होत होता हे उलुपीला समजत होते, पण हा त्रास सहन केल्याशिवाय ती तिच्या त्रासाच्या मुळापर्यंत पोहोचू शकणार नाही हे उलुपीला माहीत होते. काही क्षण असेच गेले आणि दमयंती सांगू लागली,
" ती तेव्हा नऊ वर्षांची होती. आंघोळ करण्यासाठी ती घरामागील न्हाणीघरात गेली. नेहमीप्रमाणे कपडे काढून ती आंघोळीसाठी घंघाळाजवळ बसली व अंगावर पाणी ओतून घेऊ लागली. गरम पाण्याच्या स्पर्शाने तिला बरे वाटले. त्वचेवर उटणे लावून ते चोळत असताना तिचे सहजच समोर लक्ष गेले तर समोरच्या भिंतीला छोटीशी खिडकी होती त्या खिडकीची काच थोडीशी उघडी होती. त्या काचेतून दोन डोळे तिला न्याहाळत होते.
तिच्या लक्षात येताच आपण विवस्त्र आहोत याची तिला जाणीव झाली व आंघोळीचे पाणी कसेतरी अंगावर ओतून घेऊन तिने कपडे चढवले. ती बाहेर आली तर तिथे कुणीच नव्हते. तिने हे आईला सांगितले तेव्हापासून आईने त्या काचेवर आतून एक पक्के आवरण लावून घेतले. ती आंघोळीला जाताना आई जवळपास राहू लागली". एवढे बोलून दमयंती थांबली. तिला दम लागला होता. ती थकली होती.

आजचे सेशन थांबवते अशी सुचना देऊन डॉ.उलुपीने तिला अवचेतन स्थितीतून सामान्य स्थितीवर आणले. तिच्या आईला आत बोलावले. दमयंती शांतपणे डोळे मिटून बसली होती. डाॅ. उलुपीने दमयंतीच्या आईला सांगितले की,
"दमयंतीची तिच्या आघातातून बाहेर पडण्याची सुरुवात झाली आहे. एकाच वेळी तिच्या अंतर्मनाला जास्त त्रास देणे योग्य नाही. अजून दोन, तीन किंवा अधिक सेशन्स घ्यावी लागतील. तुमचा आकाशिक रेकॉर्ड वाचण्याचा निर्णय योग्य होता. हे तिला पूर्णपणे नाॅर्मल आयुष्य जगण्यास मदत करेल."
डॉ.उलुपीचे हे बोलणे ऐकून दमयंतीच्या आईला आनंद झाला.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

काय होईल पुढे? दमयंती पूर्णपणे नाॅर्मल आयुष्य जगू शकेल? तिच्या अंतर्मनात काय साचले आहे? कशामुळे ती पुरुषांपासून दूर रहाते? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा