Login

झुंजार ( भाग -11)

अम्रुता ची केस पुन्हा ओपन
दुसऱ्याच दिवशी सकाळी लवकर खंडागळे च्या फोन ने अभय ची झोपमोड होते . झोपेतच तो फोन करणाऱ्याला शिव्या घालतो . पण समोर खंडागळेच नाव बघून तो ताडकन उठून बसतो .
अभय - " जय हिंद साहेब . आज काही काय आठवण काढलीत ?"
खंडागळे - " तुला सस्पेन्शन पाहिजे कि बदली पाहिजे चंद्रपूर ला ?"
अभय - " साहेब , अहो का माग लागलाय गरीबाच्या ? मी तुमचाच माणूस आहे कि . "
खंडागळे - " माझा माणूस आहे ? मग मला अमृता ची केस परत ओपन होते आहे हे का सांगितलं नाहीस ? माहित आहे ना तिची केस परत ओपन झाली तर काय होईल ते ?"
अभय - " तुम्ही पण ना सर . काही गोष्टींचा उगाचच जास्त विचार करता .आहो , डोक्याला शॉक देऊन देऊन त्या अमृता ला आपण ठार वेड केलं आहे . ती आता कुठं बरी होत असती व्हय ? आणि वेड्याच्या बोलण्यावर कोर्ट विश्वास ठेवत असत व्हय ?"
खंडागळे - " तुझी अक्कल इथं पाजळु नकोस . तिच्यावर ट्रीटमेंट करणारी डॉक्टर आहे ना , प्रीती . तिचा आज पर्यंत एकही पेशंट वेडा राहिला नाही . भल्या भल्याना तिने त्यातून बाहेर काढलं आहे . मग अमृता ची केस तिच्यासाठी किरकोळ नाही का ?"
अभय - " मेलो मेलो . ठार मेलो साहेब . काही तरी करा लवकर .ती अमृता जर बरी होऊन परत आली ना ..... आपलं काही खर न्हाई मग ."
खंडागळे - सध्या तरी इतकंच कर . माझी आणि त्या शिवानी ची मीटिंग ठेव, तुझ्याच पोलीस स्टेशन मध्ये . " असं म्हणत खंडागळे नि फोन कट केला . लगेचच अभय ने शिवानी ला फोन लावला . अभय चा फोन आलेला बघून शिवानी ला आश्चर्य वाटलं .
शिवानी - " बोला इन्स्पेक्टर साहेब ."
अभय - " मॅडम तुम्हाला वेळ असेल , तर भेटायचं होत . पोलीस स्टेशन ला येऊ शकाल का ?"
शिवानी - " काय विशेष इन्स्पेक्टर साहेब ?"
अभय -" विशेष असं काही नाही .जरा अमृता मॅडम च्या केस बद्दल चर्चा करायची होती . "
शिवानी - " बर . मी अकरा वाजेपर्यंत येईन "
अभय - " ठीक आहे मॅडम . मी वाट बघतोय . " असं म्हणत त्यानं फोन कट केला आणि खंडागळे ना फोन करून सगळं सांगितलं .
शिवानी ला अभय चा फोन आलेला बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं .
कुणाल - " पण त्याने तुला का फोन केला ?"
शिवानी - " आते ते तिथं गेल्याशिवाय कस समजणार ?"
अन्वर - " ताईसाहेब . आज मी येतो तुमच्यासोबत . "
शिवानी - " अरे कुणाल आहे कि सोबत . आणि आज तुझ्या नोकरी चा पहिला दिवस आहे . विसरलास का ? आणि पूजा ची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे . "
अन्वर - " ते झालंच ताईसाहेब पण ......."
कुणाल - " नको काळजी करू अन्वर . तुझ्या ताईसाहेबाना काहीही जाऊ देणार नाही . "
अन्वर - " त्याची खात्री हाय . पण उलट्या काळजाची माणसं हाईत ती . माणसं कसली ? सैतान आहेत ती सैतान . "
तानाजी - " व्हय व्हय . आज मला तरी येऊ द्या कि सोबत तुमच्या . "
शिवानी - " तुम्ही ऐकणार नाही तानाजी काका . ठीक आहे . तुम्ही चला आमच्यासोबत आज . पण नंतर खंडागळे च्या प्रत्येक हालचालींची खबर मला पाहिजे ."
तानाजी - " ते तुम्ही माझ्यावर सोडा . "
शिवानी - " चला कामाला लागा आता " असं म्हणत सगळे उठले . पूजा आणि अन्वर युवराज च्या ऑफिस कडे निघाले तर कुणाल , शिवानी आणि तानाजी ठाणे पोलीस स्टेशन ला निघाले .
गाडी ठाणे पोलीस स्टेशन ला पोहोचताच शिवानी सोबत आज कुणाल सुद्धा खाली उतरला. आणि शिवानी आलेली बघून अभय हसत हसत उभा राहिला ,
अभय - " या मॅडम या . "
शिवानी - " नमस्ते साहेब . ओळख करून देते , हा कुणाल शिंदे . आर्मी मध्ये आहे . "
अभय - " अरे वा , जय हिंद सर "
कुणाल - " जय हिंद " आणि कुणाल च बोलणं संपत तोच खंडागळे तिथं आले .
खंडागळे - " अरे वा वा वा . फौजी कुणाल शिंदे .... भाग्य आले आज आमचे दारात . "
कुणाल - " जय हिंद सर "
खंडागळे - " जय हिंद . "
अभय -" सर तुम्ही बोलत बसा. मी जरा कोठडीमध्ये चक्कर मारून येतो . "
शिवानी - " अभय , अहो तुमीच मला बोलावून घेतलं ना कि अमृता च्या केस बद्दल बोलायचं आहे म्हणून . आणि तुम्ही कुठे चाललात ? थांबा इथंच . "
खंडागळे - " बसा पाटील बसा . "
शिवानी - " बोला पटकन प्लिज , मला वेळ कमी आहे . "
खंडागळे - " आम्ही बोलतो मॅडम . तुमचा वेळ मला वाया घालवायचा नाहीये . पण मला एक सांगा . अमृता ने गुन्हा काबुल केलाय , तरीही तुम्ही तिची केस का घेऊन वेळ का घालावताय?"
शिवानी - " त्या केस मध्ये माझं सगळं आयुष गेलं तरी हरकत नाही . कारण अमृता ला मी ओळखते /. ती असं करणार नाही . एक तर कोणीतरी तिच्यावर दबाव टाकून गुन्हा मान्य केला आहे . किंवा ती खोटं बोलून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे . "
खंडागळे - " पण मला कळत नाही , कि उंची म्हणता तस असेल तर पोलिसांना पुरावे का मिळाले नाहीत अजून ? कि पोलीस खात निष्क्रिय आहे आपलं ?"
शिवानी - " पोलीस खात्याबद्दल शंका नाही . पण काही खाकी वर्दीतले पैशासाठी खादी कपड्यातलाना विकले जातात . आणि प्रश्न राहिला पुराव्याचा . तर पुरावे नक्की सापडतील .काळजी नका करू . आणि काहीही झालं तरी मी हि केस सोडणार नाही . जर बोलून झालं असेल तर मी निघते . " असं म्हणत शिवानी उठली आणि पाठोपाठ कुणाल पण उठला .
गाडीत बसल्यावर शिवानी डोळे बंद करून अमृता वर झालेले अत्याचार आठवत होती . तिचा चेहेरा रागाने लाल झाला होता .
शिवानी - " कुणाल , तुझे गृहमंत्र्यांशी संबंध चांगले आहेत का ?"
कुणाल - " हो "
शिवानी - " मला अभय ची ट्रान्स्फर हवी आहे आणि त्याच्या जागी अनिकेत जेधे हवाय इथं "
कुणाल - " तो एन्काउंटर स्पेशालिस्ट ?"
शिवानी - " हं . "
कुणाल - " ठीक आहे . मी बोलतो गृह मंत्र्यांशी लगेच . " असं म्हणत कुणाल ने गृहमंत्र्यांना फोन लावला .
शिवानी - " तानाजी काका , गाडी गायकवाड बिल्डर्स च्या ऑफिस कडे घ्या . "
तानाजी- " निखिल ?"
शिवानी - " हं . त्याच्याकडून बऱ्याच उत्तरांचा खुलासा मिळणार आहे . " यावर तानाजी ने हादी गायकवाड बिल्डर्स च्या ऑफिस कडे घेतली आणि काही वेळात गाडी त्यांच्या ऑफिस च्या पार्किंग मध्ये पार्क केली . शिवानी आता खाली उतरून ऑफिस च्या रिसेप्शन ला गेली .
शिवानी - " निखिल सर ?"
रिसेप्शनिस्ट - " जस्ट मिनिट , असं म्हणत तिने निखिल ला फोन लावला आणि फोन वरून परवानगी मागितली . आणि निखिल ने परवानगी देताच तिने शिवानी ला आत जायची खूण केली . शिवानी आत यामध्ये जाताच निखिल ने तीच स्वागत केलं .
निखिल - " ये शिवानी , ये . "
शिवानी - " अरे असं स्वागत करू नकोस . पोलीस आणि वकिलांचा असं स्वागत केलं कि ते परत परत येतात ऑफिस मध्ये ." हसत शिवानी बोलली .
निखिल - " तू वकील नंतर . आधी माझी मैत्रीण आहेस . "
शिवानी - " आता मैत्रिणीच्या अधिकाराने एक विचारायचं होत . "
निखिल - " बोल ना . "
शिवानी - "तू अमृता ला जामीन मिळवून द्यायचा प्रयत्न का नाहीस केला ?"
निखिल - " शिवानी , मी प्रयत्न केला होता . एकदा सोडून तीन वेळा . पण जामीन नामंजूर झाला तिचा . "
शिवानी - " वकील कोण होते ?"
निखिल " ऍडव्होकेट मिराशी . "
शिवानी - " काय ? ते क्रिमिनल स्पेशालिस्ट ?"
निखिल - " हं . अमृता ला सोडवण्यासाठी मी सगळ्यात टॉप च्या वकिलांना हायर केलं होत . पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही .आता कशी आहे अमृता ?"
शिवानी - " लवकरच बरी होईल ती , चल येते मी . " असं म्हणत शिवानी उठली .
निखिल - " आग चहा कॉफी काहीतरी ."
शिवानी - " नेक्स्ट टाइम . " असं म्हणत शिवानी बाहेर सुद्धा पडली आणि गाडीत येऊन बसली .
असं काय झालं होत , कि मिराशी सारख्या निष्णात वकिलांना सुद्धा अमृता ला जामीन मिळवता आला नाही . निखिल चे प्रयत्न का फसले ? युवराज पूजा आणि अन्वर च्या सापड्यात सापडेल , कि डाव त्यांच्यावर च उलटवेल हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचत राहा . आणि लाईक , कमेंट आणि कॉईन्स देत राहा .

🎭 Series Post

View all