जलदलेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
अभ्याची जिद्द भाग १
सायंकाळची वेळ नेहमीच उंबरगावात वेगळी वाटायची. सूर्य जशी जशी डोंगरामागे सरकू लागे, तशी संपूर्ण वस्तीवर एक अलगद सायाळ अंधार पसरू लागे. त्या वेळेला मी अंगणात उभं राहून दूरवरचा काळोख पाहत राहायचे. सगळं गाव जणू दिवसाचा थकवा उतरवत असायचं. कुठे तरी एक-दोन तारे चमकत असताना दिसायचे, जणूच आभाळाने आम्हाला सांगावं "अंधार कायमचा नसतो, कधीना कधी उजेड हा येईलच…”
पण आमच्या गावात उजेड म्हणजे फक्त आभाळच. वीज नावाच्या गोष्टीचा तर काहीच पत्ता नव्हता.
विजेचे खांब होते त्याला जोडणाऱ्या तारा पण होत्या, पण ते फक्त पाहायला. प्रत्यक्षात त्यातून कधीच उजेड घराघरात पोचलाच नव्हता. दिवसभर मातीच्या ओट्यावर कामं करून दमलेल्या स्त्रिया संध्याकाळी तेलाचे मिणमिणते दिवे लावायच्या. स्वयंपाकाचा धूर, दिव्याच्या प्रकाशात चमकणाऱ्या मुलांच्या हसण्याच्या आवाज सगळं एखाद्या जुन्या काळातील चित्रासारखं वाटायचे.
मी त्या दिवशीही तसंच सगळं पाहत होते. पण मनात मात्र आज काहीतरी अधिक जडपणे काळजात बसलेलं होतं. कारण चौकात अभ्या काही बोलणार होता, आणि आज पुन्हा एकदा गावाला आशा दाखवणार होता.
उंबरगावचा चौक म्हणजे आमच्या गावाचं धडधडणारं हृदय. जुनं वडाचं झाड तिथं छायेसारखं उभं असायचं जसं एखादं शांत वृद्ध आजोबा आपल्या मुलांचं भांडण, हसू, दुःख शांतपणे ऐकत असतात.
मी आणि काही जणी तिथं गेलो तेव्हा मंडळी आधीच जमलेली होती. वृद्धांची एक ओळ, पुरुषांचा गट, काही तरुण, आणि नेहमीप्रमाणे गावातील बायका थोडं दूर उभ्या खुर्च्या टाकून बसल्या होत्या.दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात सगळ्यांचे चेहरे थोडे थकल्यासारखे, पण तरीही काहीतरी ऐकण्याची, जाणून घेण्याची इच्छा असलेले होते.
अभ्या थोड्याच वेळात हातात कागद घेऊन आला. डोळ्यांत चमक होती, पण कपाळावर आठ्याही.
जणू त्यानेच उंबरगावाचं भविष्य स्वतःच्या खांद्यावर घेतलं होतं.
तात्या त्याला चिडवत म्हणाला,
“काय रे अभ्या, परत तीच धडपड? वीज येणार म्हणतोस प्रत्येक वर्षी. आता तर गावातल्या लोकांनी ऐकायलाही सोडलंय.”
“काय रे अभ्या, परत तीच धडपड? वीज येणार म्हणतोस प्रत्येक वर्षी. आता तर गावातल्या लोकांनी ऐकायलाही सोडलंय.”
सगळे हसले, पण त्या हसण्यात टोचदार वेदना होती.
मी शांतपणे हे सगळं पाहत होते.
अभ्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला स्पष्ट कळत होते तो थकलेला नव्हता, पण एकटा वाटत होता.
माझ्या मनात मात्र त्याच्यासाठी एक वेगळीच ओढ निर्माण झालेली होती कोण जाणे कधीपासून…
अभ्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला स्पष्ट कळत होते तो थकलेला नव्हता, पण एकटा वाटत होता.
माझ्या मनात मात्र त्याच्यासाठी एक वेगळीच ओढ निर्माण झालेली होती कोण जाणे कधीपासून…
त्याने शांतपणे उत्तर दिलं,
“हो काका, पण प्रयत्न करायला नकोत का? यावर्षी ‘ग्रामीण विद्युतीकरण’ची नवी योजना आलीये. यावेळी आपण सगळ्यांनी सही केल्या, अर्ज दिले, तर काहीतरी बदल होऊ शकतो.”
“हो काका, पण प्रयत्न करायला नकोत का? यावर्षी ‘ग्रामीण विद्युतीकरण’ची नवी योजना आलीये. यावेळी आपण सगळ्यांनी सही केल्या, अर्ज दिले, तर काहीतरी बदल होऊ शकतो.”
काही तरुणांनी समाधानाने मान हलवली, पण बहुतेकांच्या चेहऱ्यावर “असं काही होणार नाही” असाच भाव.
आणि त्याचवेळी, नेहमीप्रमाणे सत्य बोलणारी जानकी काकू पुढे आली.
ती चालत आली तसा तिचा काठीवरचा आधार आवाज करत आला. तिचे डोळे अंधारातही चमकत होते थकवा, अनुभव आणि वेदनेची चमक तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती.
“अभ्या बाळा, असं तू दरवेळी म्हणतोस. पण कधी काही होतं का? योजना येतात, फोटो काढले जातात, पण आमचं आयुष्य तसंच. वीज नाही, रस्ता नाही. आमचं जगणं हे आजही चुलीच्या धुरात आणि दिव्यावरच्या काजळीमध्ये अडकलेलं आहे.”
तिच्या प्रत्येक शब्दात आयुष्याचा भार होता.
ती बोलत असताना तिचे डोळे भरून आले.
मला ते पाहून आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटलं.
मला ते पाहून आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटलं.
कारण तिच्यासारख्याच अनेक बायका रोज अंधाराशी झगडत होत्या अंधाऱ्या रात्रीला चिरत करून स्वयंपाक करणे, मुलांची काळजी, पाण्याची फरपट, धुरामुळे डोळ्यांना होणारे त्रास… सगळं इतकं जड होतं, की “उजेड” आमच्यासाठी फक्त शब्द उरला होता.
*भाग कसा वाटला हे कमेंट व रेटिंग देऊन प्रोत्साहन द्या*
*तुमच्या जान्हवी ला फोल्लो करा म्हणजे तुम्हला वेळेत नोटिफिकेशन येईल.*
*तुमचे मनोगत माझ्यासाठी खूप अमूल्य आहे.*
©®जान्हवी साळवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा