Login

अभ्याची जिद्द भाग २

दुरून डोंगर साजरे
जलदलेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025


अभ्याची जिद्द भाग २

जानकी काकूचं बोलणं ऐकून अभ्या काही क्षण शांत राहिला.
त्याला उत्तर सापडत नव्हतं, कारण तिचे बोलणं खरं होतं.

पण मग त्याने स्वतःला सावरलं.तो जरा मोठ्याने म्हणाला,
“हो काकू, तुम्ही जे म्हणता ते अगदी खरं. पण थांबलो तर काय होईल? एखाद्या वेळी आपणच सोडलं, तर कधीच उजेड येणार नाही. यावेळी मी अर्ज पुण्यापर्यंत नेऊन देईन. अधिकाऱ्यांसमोर स्वतः उभा राहीन.”

त्याच्या आवाजात ती जिद्द होती जी मी आधीही पाहिली होती.
मला नेहमी वाटायचं, अभ्याचं मन खरंच आग आहे तसा आहे शांत, पण पेटला तर आकाश उजळवणारं.

इतर लोक मात्र अजूनही नाखूष.

“अभ्या, सरकारला तुझं लहानसं उंबरगाव आठवेल असं वाटतं का तुला?”
कोणी तरी पुटपुटलं.

अभ्या हलकं हसला, पण त्या हसण्यात दु:ख होतं.

“नाही काका. कदाचित नाही. पण आपण आवाजच नाही उठवला तर विसरणं त्यांना सोप्पं जाईल.”

त्या क्षणी चौकात एकदम शांतता पसरली.
केवळ दूरवरच्या पानांची सळसळ ऐकू येत होती.

मी मात्र त्याच्याकडे पाहत होते एकटक.
त्याची शब्दांतील आग माझ्या मनालाही स्पर्शून गेली होती.

मी तिथे उभी होते, पण मनात मात्र वेगळाच संघर्ष सुरू होता.

“अभ्या एवढं का झटतोय? काही मिळत असे हे त्यालाच माहित आहे…”

पण त्याच्या डोळ्यांतील विश्वास बघून मला जाणवलं
तो फक्त वीजेसाठी नाही झटत. तो स्वतःच्या गावासाठी झटतोय… स्वतःच्या लोकांसाठी.

आणि कदाचित…
माझ्यासाठीसुद्धा?

हे विचार मनात आले तसा मी स्वतःशीच लाजले.
पण तो जसा बोलत होता, तसा मला वाटत होतं उंबरगावाच्या अंधारापेक्षा मोठा अंधार आमच्या मनात पसरलाय… नाउमेद होण्याचा.

अभ्या मात्र एकटाच त्या अंधारात दिवा घेऊन उभा राहिलेला.

अभ्याने हातातील छोटा तेलाचा दिवा उचलला आणि म्हणाला,
“जोपर्यंत सरकारचा दिवा आपल्या गावात लागत नाही, तोपर्यंत मी हा दिवा लावत राहीन. कुणीतरी तरी पेटवायला पाहिजे ना? अंधारावर मात करायचं असेल, तर प्रकाशाची एक ठिणगी पुरेशी असते.”

त्या क्षणी त्याचे शब्द माझ्या मनात खोलवर उतरले.
जणू कुणीतरी काळोखाच्या कडेवरून उजेडाची शिडी टाकली होती.

गावकरी थोडे हबकलेले होते.
काहींच्या नजरेत संशय होता,
काहींच्या मनात अपराधीपणा,
तर काहींमध्ये खूप दिवसांनी दिसलेली आशेची किनार.

आणि मी?
मी तर पूर्णपणे बदलून गेले होते त्या क्षणी.

तो कागदांचा गठ्ठा हातात घेऊन निघून गेला.
त्याच्या पाठीवर दिव्याचा प्रकाश पडत होता…
आणि मला तो प्रकाश गावात नाही तर त्याच्या मनात दिसत होता.

लोक अजूनही त्याच्यामागे बोलत राहिले
“बघूया… यावेळी काय होतंय…”
“फार हट्ट करतो हा…”
“नाहीतर हे सगळं करून उपयोग काय?”

पण त्यांच्या बोलण्यापेक्षा माझ्या मनात अभ्या जास्त मोठा होता.

त्या रात्री आकाशात जरी दोनच तारे होते, तरी मला वाटलं
एक वेगळाच, मोठा, ठळक तारा उंबरगावावर चमकतोय.
जणू अभ्याच्या निश्चयाने त्यांनाही उजळून टाकलं होतं.

आणि माझ्या मनात पहिल्यांदाच एक विचार आला“कदाचित या वेळेस खरंच… आमचं गाव उजळेल.
कदाचित या वेळेस… मीही अभ्यासोबत उजेड घेऊन चालू शकेन.”

*भाग कसा वाटला हे कमेंट व रेटिंग देऊन प्रोत्साहन द्या*
*तुमच्या जान्हवी ला फोल्लो करा म्हणजे तुम्हला वेळेत नोटिफिकेशन येईल.*
*तुमचे मनोगत माझ्यासाठी खूप अमूल्य आहे.*


©®जान्हवी साळवे
0

🎭 Series Post

View all