Login

ग्लॅमरस लग्नसोहळा आणि व्हायरल आनंद

Celebrity Wedding And Social Media Hype
स्मृती मन्धना भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडू आणि पलाश मुछाल संगीतकार ह्यांचा विवाह सोहळा २३ नोव्हेंबर रोजी होणार होता पण तो पोस्टपोन झाला. आता खरच तो पोस्टपोन झाला की तो रद्दच झाला हे काही अजून नक्की समजले नाही..
बॉलिवूड आणि क्रिकेट नेहमीच एक खास नातं आणि वलय टिकवून असतं.. दोन्ही क्षेत्राबद्दल जनमानसात उत्सुकता असते…आपल्या घरात काय चाललंय हे बघण्यापेक्षा दुसऱ्यांच्या खास करून सेलिब्रिटी च्या आयुष्यात काय आणि कसं घडतंय हे जाणून घ्यायला बऱ्याच जणांना आवडतं त्यामुळे आपण अश्या बातम्या खूप बघतो आणि चघळतो ही…असो


तर असच सोशल मीडियामध्ये एके दिवशी एका क्रिकेटच्या मैदानावरती पलाश ने स्मृतीला कसं प्रपोज केलं ते दाखवलं गेलं ..ते बघून अनेक प्रेमी युगल आपल्या आयुष्यात असंच व्हावं अशी इच्छा बाळगू लागले.. मुलींना तर अक्षरशः आपल्या होणारा नवरा आपल्यासाठी असं काही का नाही करत किंवा ज्यांचे प्रेम आहे अशा मुली ना आपलाही बॉयफ्रेंड आपल्याला असच प्रपोज करेल का असे वाटू लागले ..

स्मृती आणि पलाश यांच्या मेहंदी, हळद या सगळ्या कार्यक्रमांना अगदी उत्साहाने सगळे सहभाग घेत होते आणि त्याचे फोटोज् पण शेअर केले जात होते…आणि ते फोटो बघून व्हिडिओ बघून आपण ही त्या कार्यक्रमाचा भाग आहोत असे वाटू लागले होते… आणि अशातच घडलेली एक घटना म्हणजे स्मृतीच्या वडिलांना इस्पितळात दाखल करण्यात आल आणि मग बहुचर्चित असलेला हा लग्न सोहळा पोस्टपोन झाला . (त्यांना लवकर बरं वाटो ही देवाकडे प्रार्थना..)
सोशल मीडिया फॉलो करणाऱ्यांना अगदी हा सोहळा ज्यांना घरचा वाटत होता त्या सगळ्यांना खूप वाईट वाटले..
आता हे लग्न होईल का? कधी होईल.. पलाश खोट बोलत आहे का?असे एक ना अनेक प्रश्न ज्याचा खरतर आपल्या आयुष्याशी काही ही संबंध नाही असे प्रश्न रोज सकाळी उठून आपल्याला पडायला लागले.. आणि बरेच जण रोज उठून आता त्यांच्या घरात काय चालू असेल ह्याची बातमी शोधू लागले..
घरी बसून आँखो देखा हाल सोशल मीडिया मुळे आपल्याला कळतो, छान आहे ते..पण कोणाच आयुष्य किती चव्हाट्यावर आणायचं आणि किती खाजगी ठेवायचं हे थोडं तरी लक्षात आलं पाहिजे..

सोशल मीडिया आपल्याला वेळोवेळी दर मिनिटाला सगळ्या जगाची खबर दाखवते,आपणही ती बघतो, फेसबुक, ट्विटर इंस्टाग्राम याच्यामध्ये छोटे छोटे बिट्स दाखवले जातात ,एखाद फोटो दाखवला जातो , कधी दहा सेकंदाचा व्हिडिओ दाखवला जातो आणि मग त्याच्यावरती काहीतरी कॅप्शन लिहून येतो जेणेकरून आपण एक तर आनंदी होतो किंवा हळहळ व्यक्त करतो आणि बऱ्याचदा फुकटचा ताण आपल्या आयुष्यामध्ये ओढवून घेतो . आजकाल ह्यामुळे खरं काय आणि खोट काय हे ही नक्की कळत नाही..

ह्या सोहळ्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यावर आलेलं संकट लवकर टळू दे आणि पुढचा निर्णय त्यांना धीराने घेण्यात यश येऊ दे एवढंच म्हणावं लागेल..
ह्या सोहळ्याबद्दल रोज नवी एक लाईन किंवा तेच तेच पण रोज नव्या रूपात दाखवून त्यांची घरगुती अशी खाजगी बाब चव्हाट्यावर जास्त आणली जाऊ नये अस वाटतं..उद्या जर का हे लग्न मोडले( अस होऊ नये) तर आपल्यातली लोक मध्यस्ती करून ते लग्न पुन्हा जुळवू शकतील का ? हा विचार बघणाऱ्यांनी करावा .. असो..


शेवटी सोशल मीडिया ला किती बळी पडायचं ,किती त्याचा वापर नवीन गोष्टीसाठी करायचा? हे आपण ठरवायला हवं…