चलान..
कर्तव्यावर नेहमी नेहमीच प्रामाणिक असणाऱ्या इन्स्पेक्टर समीर ची ड्यूटी त्याच्या चारपाच हवालदारासह.... चाकी नाक्यावर लागली होती....
येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांचे लायसन्स... कागदपत्रे.. पीउसी... हेल्मेट व.... खासकरून मास्क तपासले जात होते.....
मीरा आपल्या स्कुटीवर चाकी नाका पास करणार इतक्यात तिला.... ऐका हवालदाराने तिला अडवले.... काय?... मॅडम हेल्मेट कुठे आहे?.....हेल्मेट नाही ते नाही....वरून मास्क देखिल नाही..... चला.. तुम्हांला पाचशेची पावती फाडायला लागेल!... हवालदार रागात म्हणाला.... तुमच्या साहेबांना बोलवा मी बोलते त्यांच्याशी!.... मीरा म्हणाली..... अहो! मॅडम साहेब आले तर पाचशेचे हजार करतील..... तुम्ही पावती फाडा गुमान!.....तुम्ही साहेबांना बोलवा आधी!... मीरा पुन्हा......
हवालदाराने समीरला हाक मारली...... काय हे? ना हेल्मेट ना मास्क?....समीर म्हणाला.. पण मी दोन डोस घेतलेत! मीरा बेफिकीर पणे म्हणाली....वा! दोन डोस घेतले म्हणजे तुम्ही अमर झालात का? समीर काहीश्या रागात..... अहो पण मी इथेच फक्त भाजी घ्यायला चाललेय!.....मीरा विनंती स्वरूपात..... तुम्ही भाजी घ्यायला जा नाहीतर आणखी काही कामासाठी जा! .....नियम मोड्लात त्यामुळे पावती तर फाडाविच लागेल!.....मोहिते पावती फाडा मॅडम ची!......
मीराने पावती फाडली...आणि गाड़ीला सेल मारला.... मात्र जातांना ती समीर कडे खुन्नस मध्ये .....बघुन घेईन कधीतरी....या नजरेने पाहत गेली..........
समीर रात्री थकून भागून.. घरी पोहचला.... फ्रेश होऊन जेवणासाठी.... टेबलवर बसला... टेबलावरील जेवण पाहुन..... काय हे?......फक्त डाळ भात?.... भाजी कुठे आहे?....... वा!.... रे वा!!..... तुला संगितले होते ना तेंव्हा..... की ,मी फक्त भाजी घायला चाललेय म्हणुन..... पण तु तर ड्युटीवर ईमानदारी की मुरत ना!.... स्वतःच्या बायकोचे पण चलान फाडलेस !.......आता खा फक्त डाळ भात!..... मीरा त्याला चिडवीत म्हणाली....
लेखन : चंद्रकांत घाटाळ..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा