चहा विथ भजी : भाग :३
नकुल मागे वळून पाहतो तर प्रधान काकांचा मुलगा ( दिपक) असतो. दिपक नकुलच्या बाजूला येऊन ,
दिपक: काय नकुल आज इथला रस्ता चुकला? पूर्ण २ वर्षांनंतर!
नकुल: सहज आलो होतो.
दिपक: चल चल घरात ! सगळेच जाम खुश होतील तुला पाहून .
( दोघे गेटच्या आत प्रवेश करतात, गाडी पार्क करता करता नकुल दिपक ला)
नकुल: दिपक ... तुमच्या शेजारी कोणी आल आहे का रहायला ? गेली ५-६ वर्षे ते घर खाली होत . आता गेट उघडा दिसला म्हणून विचारल.
दिपक: होय आले आहेत. त्यांनी विकत घेतल ते घर . दीड वर्ष झाल येऊन आम्हालाही बर झालय , चांगली सुशिक्षित लोक आहेत ती.
दोघेजन घरात जातात.
सौ . प्रधान: नकुल ... ये बेटा ! खुप दिवसांनी आलास . बस !
( हॉल मध्ये दिपक नकुल दोघे बसतात , प्रधान काका ही कंपनी देण्याकरिता हॉल मध्ये बसतात).
चहा नाश्ता , गप्पा उरकुन नकुल जाण्यास निघणार असतो,
प्रधान काका : नकुल येत्या रविवारी आमच्या लग्नाचा २८ वा वाढदिवस आहे. तसेच तुझ्या होणाऱ्या वहिणीला देखील बोलावल आहे.
नकुल ( आश्चर्य चकित होऊन): होणारी वहिणी !
दिपक : अरे अजून साखरपुडा वगैरे नाही झाला. फक्त बोलण झाल आहे १५ दिवसच झाले आहे.
प्रधान काका(नकुल ला) : तुला सोडून नाही करणार . साखरपुडा करणार नाही , येत्या रविवारी फक्त फॅमिली आणि काही मित्र परिवार यांच्या उपस्थितीत छोटीशी रिंग सेरमनी करायची आहे.
दिपक: तसं शनिवारी वाढदिवस आहे , पण आम्ही रविवारी करणार आहोत. तु शनिवार पासून येथेच ये रहायला.
नकुल : ओके ! ट्राय करतो आणि नक्की येतो .
सौ. प्रधान: यायचच आहेस तु, त्यात आणि ट्राय काय करायच ?तु देखील दिपक बरोबर चा आमच्या करिता ! मग माझी दोन्ही मुल एकत्र नको का कार्यक्रमात ?
नकुल : येतो काकी नक्की . दुसरा शनिवार आहे मग लाँग रेस्ट , पण आत्ता गेलो तरच परत येईन !
( सगळेच हसतात ????????????)
नकुल : येतो , निघतो आता.
प्रधान कुटुंब एकत्र (नकुल ला) :
लवकर ये.
नकुल हो येतो म्हणून आपली गाडी काढतो आणि ड्राईव्ह करत करत परत त्याच केसांच्या मऊ जाळ्यात गुंततो.
घरी पोहचून परत डायरी वाचायला घेतो.
????????????????
१०-११ पान वाचून झाल्यावर एका पानावर त्या मुलीचा उल्लेख मिळतो .[ लिहिलेल असत]
" आज एक मुलगी पाहिली .( हे वाचताच नकुलला कोण ही जाणून घेण्याची उत्सुकता वाढते)
माझ्या नकुलसाठी अगदी त्याला शोभेल अशी . सुशिक्षित, संस्कारी, देखणी किती सुंदर आहे ती. एका क्षणात नजरेत बसणारी, तिच्या डोळयांत किती तो तेजस्वी पणा आत्मविश्वास . ती माझ्या नंतर हे घर सांभाळू शकेल अशी. बर झाल शालिनीच्या कानावर ठेवली ही गोष्ट . रोहन च्या वर्गातील मैत्रिण त्याची एवढच कळाल , तिच नाव तेवढ विचारायच राहून गेल."
रोहण च लग्न समारंभ आटपून मग बोलते तिच्या घरातील मंडळींशी.
नकुल हे सर्व वाचतो यापुढे त्या वहीत काहीच लिहिलेल नसत.
शालिनी नकुलच्या आईची बालमैत्रिण , आई वारल्यानंतर तो त्याच्या घरी जाण येण टाळतो. नकुल प्रधान काकांना कॉल करून वाचलेल सर्व कळवितो,
तो रोहण ला कॉल करून शनिवारी प्रधान काकांच्या घरी बोलावतो जे रोहन च्या घरापासून काही अंतरावर असते.
????️????️????️????️????️????️
शनिवारी रोहन नकुल प्रधान काकांच्या घरी पोहचतात. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नकुल आणलेली भेट त्यांना देतो.जेवन करता करता नकुल ने त्या मुली बद्दल डायरी मध्ये वाचलेल सर्व काही सांगितले.
राहूल : अरे हो आठवलं ! आई ने सांगितल होत मला , पण मीच इतकं लक्ष नाही दिल यात. ती माझ्या कॉलेज मध्ये होती.
प्रधान काका: मग बाळा तिचा काही संपर्क असेल ना? कशी आहे ती मुलगी ?
राहूल : अगदी नकुल ला शोभेल अशी. इथेच जवळच्या ठिकाणी आली आहे तीची फॅमिली १वर्ष झालं, पण कधी पत्ता विचारला नाही.
प्रधान काका : मग विचारुन घे . आसपासच्या परिसरात असेल तर , बघू आजच बोलू तिच्या घरच्यांना.
राहूल : ठिक आहे. आधी आईला कळवितो, मग करतो तिला कॉल.
(जेवण झाल्यावर ............, राहूल त्याच्या आई ला ही बातमी कळवून , त्याच्या मैत्रिणी ला कॉल करतो.
डोअर बेल वाजते , दिपक दार उघडून ....
मेघना.. ये ना आत ये .....!
( आत येता येता )
कधीच तुझी वाट पाहत होतो आम्ही. इतक्यात मेघना चा फोन वाजतो.
( पुढील भागात नकुल मेघना ची गोड अशी भेट लवकरच पाहू)
लेखिका : सौ. शगुफ्ता मुल्ला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा