"सुशांत... मला नाही माहित... म.. मा.. झा... काय संबंध? मला चकवा लागलेला.... त्यानंच मला पाणी मागितलं अन् तलावात बुडवलं! हो... हो.. ना... आजी...!"
"चकवा वगैरे असं काही नसतं! आता खरं काय ते तू सांगतेस की मी सांगू?" इन्स्पेक्टर प्रशांतने दरडावणीच्या सुरात विचारलं.
आता मात्र रमणीचा धीर सुटला अन् ती ओक्साबोक्शी रडू लागली.
"सुशांत माझा शाळेतला मित्र. मला दोन वर्ष सिनियर.... एक वर्षांपूर्वी आमची ओळख झाली.... तो माझी खूप काळजी घेतो... त्याच्या सहवासात मला एकटं नाही वाटत... नाहीतर घरी मी एकटीच... माझ्या आईबाबांना माझ्यासाठी वेळ नाही पण सुशांत माझ्या सोबत असतो... त्याला माझा सहवास आवडतो अन् मला तो...
मागच्या महिन्यात त्यानं मला प्रपोज केलं. मी तर अक्षरशः हवेत होते. आम्ही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. त्याने मला त्याच्या घरी नेलं. त्याचं घर अगदी लहान आहे.... दोन खोल्यांचं...ते....त्या पलीकडच्या झोपडपट्टीमध्ये.... पण त्यांचं मन मात्र फार मोठं ... त्याची फॅमिली खूप आवडली मला ...माझ्या स्वप्नातलं माझं कुटुंब! त्याच्या आईने मला \"सूनबाई\" अशी हाक मारली अन् मी अगदी हरखून गेले.
आता आम्ही शाळा बुडवून बाहेरही फिरू लागलो.... अर्थातच माझ्या घरी कळू न देता.... कारण आमची श्रीमंती आपल्या प्रेमाच्या आड येऊ शकते असं सुशांत म्हणाला. म्हणून आजीचा डोळा चुकवून आम्ही भेटत असू... मोबाईलवर तासन्तास गप्पा मारत असू."
"ह्याबाबतीत तुम्हाला काही माहिती आहे?" इन्स्पेक्टर प्रशांतने रमणीच्या आईला वीणाताईंना विचारलं तर त्यांनी मान खाली घातली तर हे सगळं ऐकून विनायकरावांचा पारा चढला होता. ते काही बोलणार इतक्यात इन्स्पेक्टर प्रशांतने विनायकरावांना रोखलं अन् रमणीला पुढे बोलण्याची खूण केली.
"आईला कसं माहित असणार हे सगळं? ती सतत तिच्या ऑफिस मध्ये अन् नंतर मोबाईल मध्ये बिझी असते. माझ्याकडे पाहायला वेळ कुठाय तिला?" रमणी उपहासानं बोलली... अन् बाबा त्यांच्या बिझनेस डील्स मध्ये गुंग असतात त्यांना मुलीपेक्षा टर्नओव्हर महत्वाचा!"
"त्याबद्दल आपण नंतर बोलू. आधी तू गावाच्या बाहेर कशी गेलीस ते सांग " विनायकराव दातओठ खात ओरडले. रमणीनं काल जी घटना सांगितली त्यात काहीतरी गौडबंगाल आहे ह्याची कल्पना एव्हाना त्यांना येऊ लागलेली....
"काल सुशांतचा वाढदिवस होता. त्यानं मला गिफ्ट मागितलं... मला आईबाबा भरपूर पॉकेटमनी देतात. त्यातून एक छानसा शर्ट घेणार होते मी त्याला... पण तो म्हणाला त्याला त्याच्या पसंतीचं गिफ्ट हवंय म्हणून! त्याला गिफ्ट म्हणून माझा "वेळ" हवा होता! त्याच्या वाढदिवसाची संध्याकाळ आम्ही सोबत व्यतीत करावी अशी त्याची इच्छा होती.
"काल सुशांतचा वाढदिवस होता. त्यानं मला गिफ्ट मागितलं... मला आईबाबा भरपूर पॉकेटमनी देतात. त्यातून एक छानसा शर्ट घेणार होते मी त्याला... पण तो म्हणाला त्याला त्याच्या पसंतीचं गिफ्ट हवंय म्हणून! त्याला गिफ्ट म्हणून माझा "वेळ" हवा होता! त्याच्या वाढदिवसाची संध्याकाळ आम्ही सोबत व्यतीत करावी अशी त्याची इच्छा होती.
मग मी माझ्या मैत्रिणीच्या सलोनीच्या वाढदिवसासाठी तिच्या घरी जाणार असं आजीला सांगितलं.अन् सुशांत सोबत "ड्रीम डेट" साठी त्याच्या बाईकवर निघाले.
शहराच्या बाहेर जाताच आडमार्गाला गाडी थांबवून सुशांतने माझ्याशी लगट करायला सुरुवात केली तशी मी घाबरले. त्याचा स्पर्श मला शाळेत शिकवला तसा "बॅड टच" वाटू लागला आणि असह्य होऊ लागला. मी घाबरले अन् त्याला नीट वागण्यासाठी बजावलं पण तो काही ऐकेनाच.
मी घाबरले अन् आरडाओरडा करत वाट दिसेल तिकडे पळत सुटले."
रमणीने बोलणं थांबवलं अन् एक मोठ्ठा पॉज घेतला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा