Login

चाळीशीत खुलली ती...भाग 4 अंतिम

Katha tichya sundartechi
चाळीशीत खुलली ती...भाग 4 अंतिम


झाडाला फुल येण्यासाठी सुद्दा काही काळ जाऊ द्यावा लागतो. मग इतक्या प्रचंड बदलातून जाणारी स्त्री एका रात्रीत कशी बरं बदलेल? आणि तिने स्वतः च्या दिसण्यावरच भर दिला तर बाळाचं संगोपन तितकं चांगलं होइल का?


मातृत्व म्हणजे आईचा दुसरा जन्म, इतक्या यातना सोसून ती बाळाला जन्म देते. माणसांची खरी गरज आणि मदत तिला आता असते, पण कधी मिळते तर कधी मिळत नाही.

त्यातून शरीरातील कमी होणारे कॅलशियम, हार्मोनल चेंजेस अन् बदलते मुड्स सांभाळून ती बदलून घेते स्वतःला.

बाळाच्या संगोपनात ती स्वतःला विसरते.

चाळीशीत तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून ती या वयात छान दिसते पण दृष्टी स्वच्छ असेल तर ती ऑल टाईम स्मार्ट दिसते.

जशी दृष्टी असेल तसच जग दिसेल.

आज बऱ्याच वर्षांनंतर अनु तयार होऊन बसली होती.

"अनु तू आज खरंच खुप सुंदर दिसतेस ग."

"सुंदर मी तेव्हाही होते, फक्त तुझा दृष्टिकोन बदललेला होता."

"तुला काय म्हणायचं आहे मला कळलंय आणि त्याबद्दल मी खरंच क्षमस्व आहे, माफ करशील मला."


"तू मला माफी मागावीस आणि मी ती द्यावी ही अपेक्षाच नाही आहे. पण एक लक्षात ठेव. स्त्री ही सगळ्यांच वयात सुंदरच असते, फक्त जबाबदाऱ्यांची एक लेअर तिच्या चेहऱ्यावर असते, ती बाजूला करून बघितलं ना तर तुला तिची सुंदरता दिसेल."


"मला कळलं ग, पण आज माझी अनु चाळीशीत खुलली."

त्याने हसून तिला मिठीत घेतलं.

ती ही त्याच्यात सामावली.