Login

चांभार चौकश्या भाग १

चांभार चौकश्या भाग १
जलद कथा स्पर्धा नोव्हेंबर २०२५

सदर कथा काल्पनिक आहे. याचा जीवित अथवा मृत् व्यक्तीशी काहीही संबंध नाही. मनोरंजन करण्याच्या दृष्टीने कथा लिहिली आहे.

" अक्षया जरा इकडं ए ग. बघ कोण आलं आहे." सुमती बाईंनी आपल्या सुनेला हाक मारली.

" अक्षया अग ऐकलस् ना ? काय काम करत आहेस ? ते काम जरा बाजुला ठेव बरं. ये लवकर." सुमती ने अक्षयाला अजून एकदा बोलावलं.

" आले आले आई. बस पाच मिनिट." अक्षया त्यांना उत्तर देत म्हणली.

त्याचं झालं असं की, सुमती बाईंच्या मैत्रिण मालती बाई त्यांना भेटायला आल्या होत्या. सिनियर सिटीझन ग्रुपच्या कार्यक्रमाची मीटिंग आहे. तर त्या बद्धल सांगत होत्या. त्यांना येऊन अर्धातास होऊन गेलेला. पण दोघींच्या गप्पा काही संपल्या नव्हत्या.

अक्षया घरची काम पुर्ण करण्यात व्यस्त होती. आज तिला ऑफिस मधून घरी यायला थोडा उशीरच झाला होता. सुमती बाईंनी जेवण करून घेतल होत. अक्षयाने नुकतच जेवण केलं होतं. तर बाकीची काम संपवण्यात गुंतली होती. त्यामुळे सुमती बाईंनी बोलावलं तेव्हा ती बाहेर आली नव्हती. अक्षया बाहेर आली तर तिच्या कानावर त्यांचे बोलणं पडले,

" सुमती तू खूप भाग्याची आहेस हो जी तुला अक्षया सारखी सुन मिळाली. सगळं काही व्यवस्थित सांभाळते. खूप चर्चा होते तूझ्या सुनेच्या वागण्या बोलण्याची. मुलांवर खुप चांगले संस्कार केलेत हो तिने." मालती बाई अक्षयाचे कौतुक करत होत्या.

अक्षयाने येताना दोघींच्या साठी कोकम सरबत आणलं होतं. सरबताचे ग्लास समोर ठेवून ती समोरच्या बाजूला बसली. पण तिने दोघींच्या बोलण्यात सहभाग घेतला नाही. फक्त ऐकत होती.

" हे तू एकदम बरोबर बोलली, अक्षया आहेच कौतुक करण्यासारखी."

नंतर मालती बाईंनी तिला सिनियर सिटीझन ग्रुप तर्फे वर्षा सहल बद्दल विचारलं होत. अक्षयाच्या ओळखीत कोणी ट्रॅव्हल एजंट आहे का की जो या पंचवीस लोकांना टुर बुक करुन देईल. ते पण खात्रीशीर. असेल तर त्यांना माहिती हावी होती. म्हणजे मीटिंग मध्ये त्या प्रस्ताव मांडता येईल. अक्षयाने देखील मी चौकशी करून सांगते असं सांगितलं. अक्षयाची बहिण एका ट्रॅव्हल कंपनी मध्ये नोकरी करत होती.

बरीच ठिकाणं सुचवली गेली. बोलताना सहजच तिच्या घरचा विषय निघाला. मालती बाई बोलता बोलता म्हणल्या,

" अक्षया ऐकल ते खरं आहे का ? "

" काय ऐकलं काकु ? "

" अक्षया असं ऐकलं की, तुझी मैत्रीण प्राचीची मुलगी श्राव्या घरातून पळून गेली म्हणे ? खरं का काय ? कोण मुलगा होता ? तिचं प्रेम वगैरे होत म्हणे. तुला काही माहिती आहे का ग तिच्या बद्दल ? " अगदी खाजगीतल्या आवाजात त्यांनी विचारलं.

" काकु मला या बाबतीत काही माहीत नाही." अक्षया नम्र स्वरात नकार देत म्हणाली.

" असं कसं काय होऊ शकतं तुला या बद्दल काहीच माहिती नव्हती. सगळया गावाला माहिती आहे. श्राव्या एका मुला सोबत पळून गेली आहे. मला तर पक्की खात्री आहे तुला सगळं काही माहिती असणार. सुमतीला पण काही गोष्टी माहिती नसतात त्या तुला माहिती असतात.

तुम्ही दोघी मैत्रिणी आहात.तुम्ही जवळ जवळ पण राहता. येणं जाणं पण आहेच की. परवा गेले होते प्राची कडे. तुला प्राची ने सांगीतलं असेलच की "मालती बाईंनी गुगली प्रश्र्न विचारला.

" असं आहे का, मग आईनी तुम्हालाही सगळं काही सांगितलं असेलच की, मी आईना सगळं काही सांगतेच की, विचारा आईना! " अक्षयाने बॉल त्यांच्या कोर्टात टाकला.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all