Login

चांभार चौकश्या भाग २

चांभार चौकश्या भाग २
" सुमतीने तर मला काहीच नाही ना सांगितलं म्हणून तर तुला विचारायला आले ना ! उलट तिचं मला म्हणली, मालू माझ्या पेक्षा जास्त तुला अक्षयाच सांगु शकते. त्या दोघी पक्क्या मैत्रिणी आहेत बघ. तिला पन अर्धवट माहिती आहे ना ! मी असं ऐकलं की तिने त्याच्या सोबत लग्न पण केलं म्हणे."

" काकू तुम्हाला इतकं सगळ माहिती आहे मग हे पण माहिती असेल ना ती कोणाच्या सोबत पळून गेली ? " ती तिरकसपणे म्हणली. तिला मालतीकाकूंच बोलणं पटतं नव्हत.

" काकु स्पष्ट बोलते म्हणून राग नका मानू, मला एक गोष्ट लक्षात आली नाही ते म्हणजे, तुम्हाला इतकं सगळं माहीत आहे, मग तुम्ही प्राचीच्या लेकी बद्धल जाणून घेण्यासाठी इतक्या का उतावळ्या आहात. तुम्हाला कशाला हवी आहे सगळी माहिती ? एक तर ती बिचारी पळून गेली आहे.

प्राची आणि संदीप भाऊजींनी किती लाडाने प्रेमाने तिला वाढवलं आहे. तिच्यासाठी किती झटले आहेत ते दोघं. त्यांनी तिच्यासाठी किती स्वप्न बघितली होती. आणि आता तिच्या एक चुकीच्या पद्धतीने उचललेल्या पावलामुळे किती अनर्थ घडला आहे.त्यांच्या इज्जत चव्हाट्यावर मांडली गेली आहे. याची कल्पना पण करवत नाही.

तुम्हाला माहीत आहे का श्राव्याच्या आईला बी पीचा त्रास आहे. भावजींनी अजून अन्नाला हात लावला नाही. सगळी कडे तिला शोधण्यासाठी वणवण भटकत आहेत. नुसता जीवाला घोर लागला आहे.

कुठं असेल श्राव्या ? कशी असेल ? तिला काय झालं असेल ? याच्या कल्पनेंन जीव घश्याशी आला आहे. तिच्या आठवणीने रडत आहेत. किती टेंशन मध्ये आहेत."

" असु दे. तू नको तिची बाजु घेऊ. माहीत आहे मला प्राची कशी आहे ते. तिच्या सोबत झालं तर बरोबरच झालं म्हणायचं. खूप माज होता ना. मला तिचा माज उतरवायचा होताच एकदा.
तिला खूप गर्व होता ना तिच्या मुलांवर ! आता बघ म्हणावं.

कशी ठसक्यात म्हणायची की , माझी मुलं म्हणजे सोन आहेत सोन. कधी चुकणार नाहीतचं. सगळ्या बाबतीत अव्वल स्थानी असतात.

प्राचीला तर वाईट खोड आहे दुसऱ्यांच्या मुलांना कमी लेखण्याची. नावं ठेवण्याची.जगात तिचीच काय ती मुलं हुशार आहेत. एकडा आहे तर तिने माझ्या लेकिवर पण कॉमेंट केली होती. माहित आहेना तुला. मी सुमतीला सांगितल होत.

माझ्या मुलीला नावं ठेवली होती. माझी मुलगी कशी चुकीचं आहे. तिला कसं वळण नाही हे बोलायची ! ती काय वागायची ? कशी बोलायची ? दुसऱ्यांना कमी लेखायची ? तेव्हा ती नाही का चुकली.

माझ्या मुलीला नावं ठेवली. म्हणून मी जरा बोलले तर भांडली माझ्याशी. आता बघ काय दिवे लावले आहेत मुलीने. ही संधी आयतीच चालून आली आहे. मी का म्हणून सोडू ?

मी तर म्हणेन तिला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे म्हणजे कोणाच्या पोरा बाळांच्या बद्दल बोलणार नाही. तिच्या बद्दल इतकं सगळं पसरलं आहे की मला फार काही करायची गरजच पडणार नाही. घरातुन बाहेर पडणं मुश्किल होईल तिच्यासाठी. हे असं घडलं नाही तर माझं नाव मालती नाही सांगणार ! " मालती बाई तावा तावाने बोलतं होत्या.

" काकू आपण कोण आहोत प्राचीला शासन करणारे. देवाने तिला जे फळं दिलं आहे ते काय कमी कडु आहे का ? मला मान्य आहे प्राची जरुरी पेक्षा जास्त बोलते. वागते. तिचा तिच्या मुलांवर पुर्ण पणे विश्र्वास होता. खरं तर तिचं वागणं चुकीचं होत. इतकं आंधळे प्रेम नकोच.

तिने मुलांच्या चुकांवर पांघरूण घालायला नको होत. चुका दुर्लक्षित करायला नको होत्या. वेळीच सावध झाली असती, मुलांना योग्य अयोग्य हे समजावून सांगितलं असत वेळीच फटकारल असतं तर आज हा दिवस बघायला लागले नसते.

काकु तुम्हाला आठवण प्राचीच्या सोसायटी मधील ते प्रकरण. एक अल्पवयीन मुलगी पळून गेली होती. तिने लग्न केलं होत. त्यावेळी प्राची आणि तिच्या नवऱ्याने किती बेकार टिपणी केली होती.
माझी मुलं असलं लाजिरवाण काम करणारं नाहीत. आणि कधी केलं असतं तर नरडीचा घोट घेतला असता. भर चौकात चाबकाने फोडल असतं.