Login

चांभार चौकश्या भाग ३(अंतिम भाग)

चांभार चौकश्या भाग ३(अंतिम भाग)
तिचं श्राद्ध घातलं असतं. मेली मला कायमची असं समजलं असतं. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न देखील केला नसता. आज नशिबाचा फेरा बघा कसा उलटा फिरला आहे. आज प्राची तिच्या मुलीला शोधत आहे. लेकीसाठी वणवण भटकत आहे.

देव कधी न्याय करायला चुकत नाही. देवाच्या मर्जी विरूध्द जगात काहीच घडत नाही. बोलताना नेहमी विचार करून बोलावं. वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही.

म्हणून एक विनंती करते, प्राची आणि तिच्या कुटुंबाला त्यांच्या त्यांच्या परिस्थिती वर सोडून दया. तिला बोल लावण्याआधी आपल्या लेकी सुना पोरी बाळीच्या बद्दल विचार करा. देव न करो पण कदाचित देवाला आपलं आताच वागणं पसंत पडलं नाही, तो न्याय करताना भेदभाव करत नाही.

काकू आताच्या परिस्थिती मध्ये प्राचीला आपल्या माणसांची सहनभुतेची आपले पणची गरज आहे. मदतीची गरज आहे. तिच्यावर ओढवलेल्या या परिस्थितीचा आपण गैर फायदा घेतला तर आपल्यात आणि प्राची मध्ये काय फरक राहणार ? तिच्या मुलीवर शिंतोडे उडवण कितपत योग्य वाटतं ? " अक्षयाने मालती काकूंना तिचं मत सांगितल. त्यांना त्यांच्या वागण्या बद्दल समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या वयाचा मान राखत.

" अक्षया मला माफ कर ग. या परिस्थितीची ही बाजु मी लक्षात घेतली नव्हती. खरं बोलायचं तर मी आता इथ खास उद्देश मनात ठेवूनच आली होती. मीटिंग आणि वर्षा सहल हे तर फक्त निमित्त होत.
पण तू मला वेळीच समजावलं. तुझं म्हणणं अतिशय योग्य आहे, मी तर तूझ्या कडून सगळं काही जाणून घेऊन गावभर करणारं होते. पण तु बरोबर बोलतं आहेस. प्राचीला तिच्या परिस्थिती वर सोडून द्यावं. एखाद्याची मदत करता येत नसेल तर बदनामी तर नाही करायला पाहिजे.

देवा पेक्षा सुंदर न्याय जगात कोणीही करू शकत नाही. प्राचीला आता आपल्या मदतीची, सहानुभूतीची आवश्यकता आहे.
आपल्याला लहान पणापासून शिकवलं आहे ना शेजार धर्म पाळला पाहिजे. झालं गेलं विसरून पुढं जायला हवं. चुका वेळीच सुधारायला हव्या. अडल्या पडल्याला जो पटकन धावून येतो तोच चांगला शेजारी असतो. चल आता येते मी. संध्याकाळ व्हायची वेळ झाली." मालती काकूंना उठत म्हणल्या.

" काकू माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर माफी मागते. पण असं लगेचच नका निघू." अक्षया नम्र पणे म्हणली.

" तसं काही नाही ग. मनात पण काही आणू नकोस. खरं बोलायचं तर तुझ म्हणणं मला शंभर टक्के पटलं. तु उगीच माफी वगेरे नको मागुस. तू मला अगदी छान समजावून सांगितलंस.

मला तर माझी, माझ्या वागण्याची विचार करण्याची लाज वाटते आहे. मी काय करणारं होते ? त्याचे परिणाम किती भयंकर असतील. मी किती खालच्या दर्जाच्या विचाराने तुझ्याकडे आली होती. तू मला माझी चुक दाखवून दिलीस.

आता निघते मी. विचार करत आहे की प्राचीच्या घरी जाऊन तिला भेटून यावं. तिला दिलासा देण्यासाठी. तिची हिंमत वाढवण्यासाठी. कदाचित मला भेटून तिला बरं वाटेल. माझ्या बद्दलची गाठ थोडी सैल होईल. राग, हेवे दावे एका बाजूला आणि संकटाच्या काळात दिलेली साथ एका बाजुला. शेजार धर्म म्हणून नाही पण एक माणूस म्हणून मी तिला भेटायला जाणार आहे."

" मालती अग थांब. अशीच नको जाऊ. अक्षया कॉफी खुप छान करते." सुमती बाई म्हणल्या.

" हो काकु. थांबा पाच मिनिट. मी लगेचच कॉफी करून आणते. साडे तीन वाजून गेले आहेत. आता आमची सासवा सूनांची कॉफीची वेळ असते. तुम्ही बसा पाच मिनिट. मी आलेच. पाच मिनिटात कॉफी करून आणतेचं." असं म्हणून अक्षया किचन मध्ये गेली.

" शोभतेस हा प्रोफेसरीण बाई. " मालती काकु काकु सुमती बाईंना म्हणल्या. सुमती बाई प्रसन्न होऊन हसल्या.

अक्षया पाच मिनिटात कॉफी घेऊन आली. कॉफी पिऊन झाल्यावर मालती काकू अक्षयाला कधी तरी त्यांच्या घरी येण्याचं निमंत्रण देऊन आणि अक्षयाला अनेक आशीर्वाद देऊन निघुन गेल्या.

त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत अक्षया मनात विचार करत होती. लोकांना चांभार चौकश्या करण्याची हौस फार असते. आज मी समजावून सांगितलं आहे. बघू कितीसा फरक पडतो.

खरं आहे ना, देव चुकीचा न्याय कधीचं करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात,
क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट

समाप्त

© ® वेदा

कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.

या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.