Login

चंपा -भाग १ (जलद कथामालिका)

It's A Story Of Prostitute Girl


#चंपा (जलद कथामालिका )

"चंपा..अगं ये चंपा ..कूठं गेलीस हूंदडायला...
बास झालं..नदीच्या काठावर चिंचेच्या झाडाखाली पोरींसोबत खेळनं...चल पाहूने येणारे तूला पाहायला आज..चल ये लवकर.." चंपाची आई चंपाला आवाज देत बोलवत होती

आईची हाक ऐकली आणि मी धावत पळतचं लपंडावचा रा अर्धवट राहिलेला डाव सोडून पऴाले...ईकडे माझ्या मैत्रीणींना विचार पडला " लग्नं आणि हीचं अजून तर वयात पण नाहीना आली ही पोर ?"माझ्या मैत्रिणी एकमेकींना हसत बोलत होत्या.

हो हे खरयं , माझी आई म्हणजे माझ्या लिला शेठानी गुरू मी एका किन्नर घरात जन्माला आले ...पण समाजात ज्याप्रकारे किन्नर लोकांकडे पाहीले जाते आणि बिचाऱ्यांचे आयूष्य अर्थशून्य बनून संपून जाते त्या भितीमूळे लिला आईने लहानपणीच माझं आँपरेशन केलेलं...आज त्यांच्या मूळेच तर मी मूलींमध्ये बिनधास्त खेळू शकते, बागडू शकते.. आमच्या साताऱ्यातल्या चिमनपूरा गावात आम्ही राहतो. माझा दिवस सकाळी देवीची पूजा करण्यात आणि दिवसभर पोरींसोबत हूंदडन्यात निघून जातो..रात्री रोज लीला आईकडून मस्त केसांची मालीश करून घेते म्हणून तर माझे केसं एव्हढे मोठे आहेत..

आज मला मूलगा पहायला येणार होता मनात खूप भिती होती पण मजाही वाटत होती की चला शेवटी मलाही माझा तो भेटेलच.. लीला आईने मलाच पोहे आणि चहा बनवायला लावला..मला मूळात या स्वयंपाकाची काहीच आवड नाही पण ईकडे रीतच आहे की, पोरीनेच पहायला आल्यावर स्वत:च्या हातानी स्वयंपाक बनवायचा..

मी अल्लड जरी असले तरी थोडी जाड ,चपळ आणि रागीट होते..मला आज शेंद्रे गावातून मूलगा पहायला आलेला. मी पाहुण्यांसमोर आले ..पोहे ,चहा त्यांना दिला आणि खूर्चीवर त्यांच्या समोर मान खाली टाकून डोक्यावर पदर घेऊन बसले होते...हे महाशय चहा पीता पीता एकटक माझ्याकडे पहात होते मला वाटले पहात असेल माझ्या सुंदर चेहऱ्याकडे म्हणून मान वर करून पहाते तर हा माझ्या उभारलेल्या छातीकडे एकटक लावून चहाचे घोट घेत होता... सुंदरता माझ्या चेहऱ्यात कुटून कुटून भरली आहे तरीही यांचं लक्ष भलतीकडेच होतं.. मी रागातच एक कटाक्ष टाकून डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहीलं तर तो घाबरलाच आणि त्याच्या हातातून चहा सांडला त्याच्या पँन्टीवर..मी मूद्दामच लगेच पटकन उठले आणि कापडाने त्याच्या मांडीवरून चहा पूसत होते..हा नालायक अजूनही माझ्या छातीवरच्या उभाराकडे पहातच होता..मी जातानी मूद्दाम त्याच्या पायावर पाय देऊन गेले..थोड्या वेळानी सगळे मंडळी गेले ..मी पण लगेच साडी काढून ड्रेस घालून पळत पऴत मैत्रिऩींकडे गेले..

मैत्रिनींने लगेच मला चारही बाजूंनी घेरलं..मला गाणे म्हणत म्हणत एकसुरात विचारू लागल्या की, नवरा कसा दिसतो माझा..मी लाजेने पऴू लागले तर पून्हा सगळ्यांनी अडवलं..

"कसा गं दादला..हेकना की चिकना
धोतरा की म्हातारा ..कसा असेल गं सांगना ..सांगना ",सुमीने विचारलं

"काळा गोमटा कोळसा जसा..नवरा भेटला तूला कसा..
मिशाळ यमाचा तो अवतार ..कसा गं करशील तू संसार " कमळी ने चिडवलं

"गोल गोबरा भोपळा जसा..नवरा भेटला तूला कसा..
खायला क्हार भूईला भार कसा गं करशील तू संसार" शेवंतीने विचारलं

बरं बरं सांगते सांगते ..ऐका आता

"माझा नवरा राज कूमार असेल त्याला नोकर गूलाम
दिसायला देखना ओठांवर मीशी , चांगला करेल हो आम्ही संसार.. चागला करेल हो आम्ही संसार" मी उत्तर दिलं

क्रमश..
0

🎭 Series Post

View all