Login

चॅम्पियन ट्रॉफी 2023 माझ्या नजरेतून

आठवणींना उजाळा चॅम्पियन ट्रॉफी 2023 च्या

ईरावर होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफी बद्दल बरचं ऐकून होते. गेल्या वर्षी पासूनच या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे वाटत होते. पण सांघिक स्पर्धेचा अनुभव नव्हता आणि आपल्याला जमेल की नाही ही भीती सुद्धा मनात होती. म्हणून या वर्षी जेव्हा संजना मॅडमने चॅम्पियन ट्रॉफी २०२३ ची घोषणा केली तेव्हा देखील भाग घेऊ की नको अशी दोलायमान स्थिती झाली होती. अखेर हो नाही करता करता मी शेवटच्या क्षणी फॉर्म भरला. लकी ड्रॉ मध्ये पहिला संघ मला मिळाला. डॉ. शिल्पा, डॉ.मुक्ता आणि प्रियांका यां मॉम्सप्रेसोमुळे माहितीतल्या होत्या. सगळ्या कथा आवर्जून वाचणारी, लाईक आणि कमेंटद्वारे सगळ्यांना प्रोत्साहन देणारी म्हणून ॲड. श्रद्धा मगर हे नाव परिचयाचे होते. संबंध सेतूमध्ये लिहिल्याप्रमाणे वनिताच्या कथा आधी वाचल्या होत्या. संगीताताईंबद्दल सुद्धा थोडीफार माहिती होती. त्यांच्या फेसबुक प्रोफाईलला असलेली 'घरचचं काम करते' स्वतःच्या ही टॅग लाईन फार आधी पासून माझ्या मनात घर करून बसली होती. लेखिका, कवियत्री, ब्लॉगर, शिक्षण असा कुठलाही उल्लेख न करता "घरचचं काम करते, स्वतःच्या" त्यांचं वेगळेपण सिद्ध करणारी ही ओळ मेरे दिल की छू गई थी. खुशी, प्रणाली, स्नेहा मात्र पूर्णपणे अनोळखी होत्या. अशा एक से बढकर एक लेखिकांच्या ग्रुपमध्ये स्थान मिळाल्याचा जेवढा आनंद झाला होता तेवढेच टेन्शन पण आले होते.

त्यात आमच्या ग्रुपमध्ये सगळ्या लेखिका एकही लेखक नाही. दोन तीन बायका जमल्या की नाही म्हंटल तरी थोड फार तरी गॉसिपिंग, कुसकुस, तूतूमैंमैं होतेच. तेव्हा ह्या दहा जणींचा ताळमेळ सांभाळायचे शिवधनुष्य कोण उचलणार, कॅप्टन कोण बनणार ह्या विचारात असतानाच संगीताताई स्वतःहून मला आवडेल कॅप्टन बनायला म्हणत पुढे आल्या. म्हंटल तू बन, तू बन एकमेकींना फोर्स करण्यापेक्षा त्या स्वतःहून जवाबदारी स्वीकारत आहेत त्यांचा कॉन्फिडन्स भावाला मनाला. एकमताने संगीताताई कॅप्टनपदी विराजमान झाल्या. वेळोवेळी त्यांची निवड योग्य असल्याचं त्यांनी सार्थ करून दाखवलं. ग्रूप मध्ये त्या कायम ॲक्टीव असतच पण पर्सनल वर पण मेसेजद्वारे, फोन करून सतत संपर्कात असत. शांतपणे, संयम बाळगत, दूरदृष्टीने संघाच्या भल्यासाठी संगीताताईने घेतलेला प्रत्येक निर्णय वाखाखण्याजोगा होता. ज्याक्षणी आम्ही तुम्हाला कॅप्टन केले त्याक्षणापासून तुम्ही आमच्या हृदयातसर्वोत्कृष्ट कॅप्टन म्हणून विराजमान आहात. त्या स्थानाला धक्का लावण्याची ताकद कशातही नाही. कॅप्टन व्हायची, नेतृत्व करायची कधी संधी मिळाल्यास मी कायम तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवीन ताई.

व्हॉट्सअप ग्रूप बनल्यावर लगेच कशा फेऱ्या असतील, स्पर्धेचे वेळापत्रक आले. पहिली फेरी पाहूनच मी गारद झाले. जलद कथा तीही पाच भागांची. आतापर्यंत कधीच एवढे भाग लिहिले नव्हते. लघुकथाच लिहायला आवडतात मला. शॉर्ट आणि स्वीट लेखनावर माझा जास्त भर असतो. दीर्घकथा मालिका, चॅटसंवाद, स्टँड अप कॉमेडी, ऑन द स्पॉट या फेऱ्या सगळ्यांसाठी कम्पल्सरी नसल्यामुळे मी निश्चिंत झाले. पण जलद कथेने माझी झोप उडवली. स्पर्धेतून माघार घ्यावी असे विचार मनात येत असताना ग्रुपचा पहिला व्हिडिओ कॉल झाला. त्यात मुक्ताताईने सांगितलं, "जास्त भाग लिहायचे असल्यास संवाद लिहायचे. संवादाने कथा खुलवायची." मुक्ताताईकडून बहुमोल टीप मिळाली आणि माझी जलदकथा वेळेत पूर्ण झाली. थॅन्क्स मुक्ताई. बरेचवेळा असं होत की आपल्याला येत असलेली गोष्ट पटकन कोणी समोरच्याला सांगत नाही. आपलेच आपल्याला मदत करत नाहीत. तसं पहायला गेलो तर आम्ही अगदीच अनोळखी अगदी जुजबी ओळख असे असूनही मुक्ता ताईने अगदी सहजपणे माझी अडचण दूर केली. अर्थात ही खासियत आहेच टीम संगीताची. इथल्या सगळ्याजणीच अगदी तत्पर असायच्या एकमेकींच्या मदतीला. मुक्ताताईच कौतुक करावं तेवढं थोड. तिचं आत्मचरित्र वाचून तर भारावून गेले. अलकारांची ती राणी, उत्तम लेखिका, उत्कृष्ट कावियात्री, थेट राजकारणात प्रवेश…या ऑल राऊंडर व्यक्तिमत्वाच्या मी प्रेमात पडले.

सगळ्या फेऱ्या कम्पल्सरी नसल्या तरी सगळ्यांनी भाग घ्या. संगीता ताईंचा कायम आग्रह असायचा. पण मी कॅप्टन माझं ऐकलच पाहिजे असा ताठा त्यात कधीच नसायचा. जमेल तुला, छान लिहतेस…या प्रोत्साहनामुळे मी कवितेचा व्हिडिओ, चॅट संवाद, ऑन द स्पॉट या फेऱ्या पूर्ण करू शकले. ऑन द स्पॉट फेरी झाल्यावर वाटले बरं झालं ताईंनी सगळ्यांना भाग घ्यायला लावला. अन्यथा मला एनवेळी विषय दिल्यावर मी लिहू शकते हा कॉन्फिडन्स मला मिळाला नसता. मी जमणार नाही यातच राहिले असते.

मला शिल्पाच म्हणा ग, मैत्रीत कुठल्याच फॉर्मालिटीज नकोत. तुझ ते डाऊन टू अर्थ असणं फारच आवडलं शिल्पाताई. डॉ. शिल्पा क्षिरसागर बसं नाम ही काफी है ! नावातच सगळं काही आलं. पुढे काही लिहायची गरज उरतच नाही. तुझ्या प्रोफेशन प्रती असलेली, स्त्रियांचे प्रॉब्लेम्स यावर जनजागृती करण्याची तळमळ मनाला भावते. तुझ्या लिखाणातील वास्तवता विचार करायला लावते. फार पूर्वी पासूनच फॅन आहे मी तुझ्या लेखणीची. तुझ्या आणि मुक्ताईच्या लेखणीतून खरोखरच शब्दरत्न उमलतात.

श्रद्धा तू खरोखरच क्रियाशील आहेस. आपला वकीलीपेशा सांभाळून तू ग्रुपला दिलेले योगदान खरचं मोलाचे आहे. कोणाचे किती लाईक, व्ह्यूज झाले यावर बारीक लक्ष असायचं तुझ. लिखाणातही तू वेगवेगळे विषय अभ्यासपूर्ण हाताळतेस. कथा पेजवर आली की तत्परतेने त्याची लिंक पाठवणं, वेळात वेळ काढून खूप केलंस तू ग्रूपसाठी. नाही हा शब्द बहुतेक तुझ्या डिक्सनरीत नसावा. "एवढं बघून घेशील श्रद्धा" असं म्हणायची खोटी की पाच दहा मिनिटात श्रद्धा सोल्युशन घेवून ग्रूपवर हजर. या चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्ताने एक गोडगोडुली मैत्रीण लाभली मला.

वनिता…तुझ्याबद्दल जे लिहायचं ते संबंध सेतू मध्ये लिहिलंच आहे. कायम अशीच रहा डॅशिंग. साक्षात संजना मॅडम तुझ्या लेखनावर फिदा आहेत. त्यांना खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून. त्या तू पूर्ण करशील ह्याची खात्री आहे. खूप शुभेच्छा?

प्रियांका तू सुपर मॉम आहेस. कठीण परिस्थितीतून मार्ग काढणारी खरी लढवय्या आहेस. सगळ्या आघाड्या समर्थपणे सांभाळत आपली लेखनकला जोपासतेस. तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत. खूप प्रेम, तुझ्या छोटूला आशीर्वाद ♥️

प्रणाली तुझा चेहरा खूप बोलका आहे न सांगताच बरचं काही बोलून जातो. दमदार आवाजाची देणगी लाभली आहे तुला. अवघड परिस्थितीवर मात करत तू नक्कीच गगनभरारी घेशील. ऑल द बेस्ट सखी.

खुशी वाटेवरती असंख्य काचा असूनही न डगमगता सामना करत स्वतःला सिद्ध केलसं. हॅट्स ऑफ टू यू. सलाम तुझ्या जिद्दीला.

स्नेहा तुझी स्वतःची अशी वेगळी लेखनशैली आहे. जादू आहे तुझ्या लिखाणात. करिअर सांभाळत वेळ मिळेल तसे शनिवार, रविवार अगदी प्रवासात सुद्धा तुझी लिखाणाची आवड जोपासत आहेत फार कौतुक वाटते तुझे . लिहित रहा खूप शुभेच्छा.?

टीम संगीता ग्रूप १ ने अव्वल कामगिरी करत तब्बल वीस पुरस्कार मिळवले. बाकी स्पर्धा म्हंटली की हारजीत आलीच. एखाद्या स्पर्धेचा भाग होणे, प्रयत्न करणे, तिथपर्यंत पोहोचणे हे देखील तितकंच महत्वाचं असत. त्यामुळेच चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद न मिळूनही विजेता असल्याचाच फिल येत आहे.

चॅम्पियन ट्रॉफीने खूप काही दिलं, नवीन तंत्र शिकायला मिळालं. अनुभवाने समृद्ध केलं. आत्मविश्वास द्विगुणित झाला. नऊ मैत्रिणीच्या रुपात नवीन कुटुंब मिळाले. माझ्या मनातली चॅम्पियन ट्रॉफी शब्दात मांडायची होती, कृतज्ञता व्यक्त करायची होती म्हणून केलेला हा लेखनप्रपंच.

मैत्रीचा हा स्नेहबंध असाचं वृध्दींगत होवू दे. लवकरच प्रत्यक्ष भेटीचा योग येऊ दे. खूप प्रेम ♥️ खूप आभार ? भावी वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा मैत्रिणींनो. ?

संजना मॅडम, संपूर्ण ईरा टीमचे देखील मन: पूर्वक धन्यवाद.