कथा-चंदनाचे हात पाय ही चंदन -भाग१
गळ्यातील घंटा व पायातील घुंगरांच्या आवाजाची सर मिसळ करीत गुरे आपापल्या घरी निघाली. तिन्ही सांजेची वेळ झाली हे जाणवत होते. गावातीलच विठ्ठलाच्या मंदिरातली घंटा सुद्धा वाजायला लागली. टाळ मृदंगाच्या साथीने हरिपाठाला सुरुवात झाली. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तसेच विठ्ठलाच्या भक्तीत रममाण होणारी तरुणाई सुद्धा हरिपाठात सामील झाली. "हरी मुखे म्हणा| हरी मुखे म्हणा| पुण्याची गणना कोण करी|"
छोटा दहा वर्षाचा केशव आपल्या आंधळ्या आजोबाला घेऊन, विठ्ठल मंदिराच्या पायऱ्या चढू लागला. चढता चढता आजोबांना धाप लागली. तसे
केशवने त्यांना पायऱ्यांवर बसवत बसवत हरिपाठात नेऊन बसविले. तो सुद्धा पायऱ्या चढताना दमला होता. कारण बालपणातच पोलिओ मुळे त्याचा एक पाय अधू झाला होता. त्याने एका पायाने लंगडतच आजोबांना मंदिरापर्यंत नेले.
संध्याकाळी शाळा सुटल्यावर आजोबांना विठ्ठल मंदिरात घेऊन जाणे हा त्याचा रोजचा दिनक्रम.

"आई! वाढणं जेवाले... खूप भूक लागली. दुपारी शाळेत खिचडी खाल्ली होती. तेव्हापासून"... त्याला मध्येच थांबवत त्याची आई म्हणाली, "थांब रे राजा! तूया बापाले येऊ दे! मंग जेवा दोघंही, तुया आज्या सोबत"... त्याचे वडील मजुरी करून थकून भागून येऊन, हातपाय धुवून ,ताटावर येऊन बसले.
"का वं माय चंदे! झाला का वं सयपाक? जेवनं सुरू आहे वाटते"! "हो ना! ये ना मावशी! काय म्हनत होती"? "काही नाही, माया नातू सांगे बा!तुया केशव नं आज मस्त भजन म्हटलं शायेत. शायेतले समदे मास्तर अन पोरं त्याचं भजन ऐकतच राहिले म्हनते".
"असं कां !कोनतं रे बाबू"? "सांग बरं! कोनतं भजन म्हटलं तूया" ?आता अंगणात सर्वजण जमले. शेजारच्या दोन-तीन बायका सुद्धा येऊन बसल्या.केशवला त्याच्या आईने आग्रह केला." म्हनरे बाबू! ऐकू दे".
त्याने सुरुवात केली.
"चंदनाचे हात पाय ही चंदन| परीसा नाही हीन|कोणी अंग| चंदनाचे हात पायही चंदन|"
त्याच्या आवाजात माधुर्य होते. तो एक एक ओळ म्हणत असताना, सर्वजण त्याच्याकडे कौतुकाने पहात होते.

माय! माह्यं लेकरू तं चांगलंच भजन म्हनते. त्याच्या आईने त्याला कौतुकाने जवळ घेतले. मध्येच त्याच्या पायाकडे पहात तिचा उर दाटून आला.
केशव शाळेत सुद्धा असेच भजन म्हणतो का पाहूया पुढच्या भागात भाग दोन मध्ये
छाया बर्वे राऊत अमरावती
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा