Login

कथा-चंदनाचे हात पाय ही चंदन भाग ३ अंतिम

Story Of A Little Boy
कथा-चंदनाचे हात पायही चंदन -भाग ३ अंतिम

बाईंच्या मार्गदर्शनाखाली त्याने त्या गीताचा गोड आवाजात सराव केला .
स्वातंत्र्य दिनाला सर्व गावकरी व पाहुण्यांसमोर केशवने ते देशभक्तीपर गीत सादर केले. त्या गीताने लोकांना गहिवरून आले. शिक्षक वृंद तर त्या गीताने भारावून गेला. सर्वांनी केशव चे भरभरून कौतुक केले. पण केशव चे डोळे आपल्या शिक्षिकेला शोधत होते.तेवढ्यात त्या शिक्षिकेने शाळेत प्रवेश केला. केशव लंगडत च बाईंच्या कडे गेला. त्याने बाईंना मिठी मारली.
बाई सर्व शिक्षकांना उद्देश म्हणाल्या, "या पोराच्या आवाजात जादू आहे. याने ती वाया घालवू नये, असे मला वाटते". "केशव! प्रयत्न करून आपली ही कला तू वाढविली पाहिजेस". बाईंच्या आपुलकीने, कौतुकाने केशव चे डोळे भरून आले. तो एका पायाने लंगडत च, भराभर चालत घरी पोहोचला. त्याचे वडील सुद्धा त्याच्यासोबत होते आईला कधी मिठी मारतो असे त्याला झाले....
शाळेत घडलेला सर्व वृत्तांत आईला सांगून, परिसरातल्या सर्व आया बायांना त्याने ते गीत म्हणून दाखवले. आईने तर त्याला कडे वरच उचलून घेतले. शाळेतील सर्व शिक्षकांचे प्रोत्साहन आणि विशेष शिक्षिकेचे मार्गदर्शन, यामुळे त्याच्या मनाला उभारी आली. त्याला वाटले, आपलं शरीर दुर्बल आहे. पण मनात दहा हत्तींच बळ आहे. आपल्या आवाजात जादू आहे. ही कला आपण वाढविली पाहिजे.
आता केशव च्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. उत्साहाने शरीराचा कण न् कण भारावून गेला. तो दररोज वेगवेगळी गीते म्हणण्याचा सराव करू लागला.
त्याच्या अधू पायाचा कोणताही परिणाम त्याच्या भविष्यावर झाला नाही.

अरे केशव! "मले घेऊन चल ना विठ्ठल मंदिरात ...आज एकादशीचे भजन आहे". त्याच्या आजोबांनी त्याला हाक मारली. केशवने लगेच आजोबाचा हात धरला .

केशव! "हे केळ्याची पाटी उचलून दे रे बाबा डोक्यावर." वाटेत म्हातारीने केशव ला साद घातली.केशव लंगडतच आजीची पाटी तिच्या डोक्यावर उचलून द्यायला गेला. "कमी पैशात केळी घ्यायले लाजा कशा नाही वाटत यायले"! म्हातारी बडबडत होती.

मंदिरात अभंग गायन सुरू होते

"चार पैसे रोज |करूनी नंतर
काम झाल्यावर| दोन पैसे
कोणी मजुरा जो |लावी वाटेसी
त्याची एकादशी| व्यर्थ गेली"

केशव व त्याचे आजोबा विठ्ठल मंदिरात जाऊन बसले. केशव ने त्याचा आवडीचा अभंग म्हणायला सुरुवात केली.
"चंदनाचे हात पायही चंदन| परिसा नाही हीन कोणी अंग"
समोर उभे असलेल्या कीर्तनकारा ने याचा अर्थ सांगायला सुरुवात केली.

"जगात कोणतीही गोष्ट कमी प्रतीची नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगले आणि मौल्यवान असते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूमध्ये चांगले गुणधर्म नक्कीच असतात."

राम कृष्ण हरी

समाप्त

छाया बर्वे राऊत अमरावती

!

,

.