चांदणे शिंपीत जा भाग ,१

मित्राच्या बहिणीच्या साखरपुड्याचे खास आमंत्रण होते म्हणून तो त्याच्या गावी गेला होता



" अरे विक्या काय रे रोड हा. किती खाच खळगे . बापरे...!!! कसा काय तु रोज इथून येऊन जाऊन करतोस रे. कमाल आहे तुझी. आताच माझे अंग खुळखुळा झाले आहे. आणि तु निवांत गाडी चालवत आहे . " सुहास म्हणाला.
," अरे यार मला आता सवय झाली आहे. आणि काय करायचे हे काय शहर आहे का. पाऊस आला की रस्ते उखडतात..मग पुन्हा डांबरीकरण केले कि शेताची कामे सुरू होतात. मग ट्रक्टर ,बैल गाड्या जात असतात. आणि इथे तुझ्या शहरासारखे सारखे सारखे कोण रे रस्ते सुशोभित करणार. " विकासने सुहासला म्हटले.

सुहास आणि विकास दोन्ही काॅलेजचे बेस्ट फ्रेंड्स. यांची मैत्री खुप जुनी नव्हती . अगदी तीन वर्षे झाली होती ही दोघे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ही दोघे एकाच क्लासमध्ये आली. आणि हे दोघे एकाच बेंचवर बसायचे. तेव्हा पासून यांची मैत्री झाली आणि ती देखील अगदी अतुट मैत्री झाली.
आता हे दोघे फायनल इयर मध्ये होते.सुहास शहरात रहात होता.काॅलेज त्याला घरापासून इतके काही लांब अंतरावर नव्हते. अगदी म्हणजे अगदी चार किलोमीटर अंतरावर होते. विकास शहरानजीकच्या गावात रहात होता.त्याचे वडील शेतकरी होते. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती.पण विकास अभ्यासात हुशार होता.आणि तो स्काॅलरशिपवर शिक्षण पूर्ण करत होता. आता त्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि जाण्यासाठी बसची वेळ त्याच्या काॅलेजच्या वेळात न जमलेने त्याला वडिलांनी बाईक घेऊन दिली होती.आता तो रोज वेळेवर काॅलेजला जात होता.
कधी कधी काही प्रोजेक्ट वर्क असले तर तो सुहासच्या घरी जाऊन पूर्ण करत होता.सुहासची आई प्रायमरी स्कूल ची टिचर होती.आणि वडिल एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होते. सुहास हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. एकंदरीत हे एक छोटे सुखी शिक्षित कुटुंब होते.
विकासला दोन बहीणी होत्या.मोठ्या बहीणी चे लग्न झाले होते आणि लहान बहीण बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती.
विकासाच्या धाकट्या बहीणीला चांगल्या घरातील मुलाचे स्थळ आले होते .आणि त्यांना ती पसंत पडली होती.आणि त्यांनी साखरपुडा करायचा नंतर तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करायचा निर्णय घेतला होता. आता रविवारी साखरपुडा करायचा असे ठरविले. मग विकास ने सुहासला आणि त्याच्या आई वडिलांना आमंत्रण दिले होते. सुहास च्या आई-वडिलांनी रविवारी येण्याचे कबूल केले .विकासने सुहासला आदल्या दिवशी यायला हवे तु ते ही माझ्या बरोबर असे सांगून आपल्या बरोबर काॅलेज सुटल्यावर गावी नेत होता.

दोघेजण गावी पोहोचलो.घरी गेल्यानंतर विकासचे बाबा बाहेर आले .त्यांना पाहून सुहासने त्यांना नमस्कार केला आणि पाया पडला. इतक्यात आतून विकास ची आई आली. " अरे आलास बाळ.तुझे आई बाबा का नाही आले? "
" अ.हो .ते उद्या येतील.आई शाळेला गेली होती आणि बाबांना सुट्टी नसते न.मग उद्या रविवार आहे तर उद्याच येतील ते."
" बरं बरं .चल हात पाय धुवून घ्या .मी जेवण वाढते ."
दोघेही जेवायला बसले.विकासची मोठी बहीण पण आली होती.तिचे ते लहान बाळ गोंडस घरात दुडूदुडू धावत खेळत होते.
" व्वा काय मस्त आहे जेवण.किती भाजी स्वादिष्ट आणि चविष्ट झाली आहे.शहरात अशा भाज्या पहायला देखील मिळत नाहीत"
सुहास म्हणाला.
चुलीवर स्वयंपाक केलेला.गरम गरम भाकरी,वांगे, हरबऱ्याची भाजी,लोणचे,दही,लोणी आणि काकडी,गाजर.हे सगळे असे ताजे ताजे शेतातील भाज्यांचीं चवच निराळी.
जेवण झाल्यानंतर विकासचे बाबा विकासला येणाऱ्या पाहुण्यांना व्यवस्थितपणे पाहुणचार करायचा त्यांना काय हवे नको ते पहायचे आणि जेवणाची पंगत बसली कि व्यवस्थित पणे वाढायचे .जराही कसली कमतरता भासू देऊ नये. पाहुणे नावे ठेवतील किंवा नंतर याचा त्रास आपल्या बारकिला होईल असे वागायचे नाही .हे सांगत होते.
यावर विकासने " तुम्ही काही काळजी करू नका बाबा.मी आणि सुहास सगळे व्यवस्थित सांभाळतो.तुम्ही निर्धास्तपणे रहा." असे सांगितले.
रात्री विकासच्या बहीणी च्या मैत्रीणी मेहंदी लावण्यासाठी आल्या.बाहेर अंगणात मांडव आणि त्याची आरास करायचे सुरू होते.लाईट,पडदे रंगबिरंगी रिबीणी लावून मांडव सजवत होते.घर अगदी लख्ख प्रकाशमय झाले होते.
लोकांचे येणे जाणे सुरू होते.जो तो आपल्या परीने कामात मदत करत होता.
" सुहास..ये ..सुहास..
विकासने सुहासला बोलावले.तेव्हा सुहास आत विकासच्या बाबांसोबत बोलत बसला होता.विकासचा आवाज ऐकून तो " हो हो आलो हा." म्हणत उठला.आणि तो बाहेर जाणार तोच बाबांनी त्याला \" हे बघ बाळ हे तिथे लावायच्या काही वस्तू आहेत या देखील घेऊन जा." म्हटले.
" हो हो .द्या बाबा इकडे त्या" विकास म्हणाला.
आणि बाबांनी त्या वस्तू ठेवलेली मोठी लोखंडी बुट्टी त्याच्या हातात दिली.सुहास ती बुट्टी घेऊन बाहेर पडत होता तोच एक मुलगी समोरून पळतच आली आणि सुहासला धडकली आणि त्याच्या हातातील ती बुट्टी खाली पडली त्याच बरोबर ती मुलगी देखील खाली पडली.
" ओ..!!! नो...!!!
सुहास म्हणाला.


यावर " आईं गं....!!
एक नाजुक मंजूळ आवाज.
तसाच सुहास त्या आवाजाच्या दिशेने पाहतो तर तिथे एक दोन वेण्या घातलेली पांढ-या रंगाचा सलवार कमीज घातलेली युवती पडलेली दिसली.आणि तिला या अवस्थेत पाहून प्रथमतः सुहासला हसुच आले पण तो न हसता त्या मुलीला उठण्यासाठी मदत करण्यासाठी हात दिला आणि ती मुलगी पडली म्हणून जराशी लज्जा आणि आतून घाबरलेली अशा द्विधा मनस्थितीत आपला हात पुढे केला आणि हळूहळू उठली .
" आय एम व्हेरी सॉरी हो." सुहास म्हणाला.
" अं..!! हो...!! अ..!! हो...!!" तिला काय बोलावे सुचेना.तिने गडबडीने आपला ड्रेस व्यवस्थित केला आणि आत पळाली.
आज सकाळी लवकर उठून सगळेजण साखरपुड्याच्या तयारीला लागले.जेवण बनविणारा आचारी आला.त्याने जेवण बनविण्यास सुरुवात केली.चहा,पोहे हा नास्ता करुन जो तो आपली तयारी करत होता.
मांडवात खुर्च्यांची मांडणी केली गेली.स्पिकरवर मस्त गाणे वाजत होते.लहान लहान मुले या तालावर आपले पाय थिरकवत नाचत होते.अगदी हर्ष उल्हासित वातावरण निर्माण झाले होते.
सुहास आणि विकास आपापल्या कामात व्यस्त होते.आता पाहुणे यायची वेळ झाली होती.सगळी व्यवस्था छान केली आहे मुलांनी हे पाहून विकास चे बाबा खुश झाले.
पाहुणे आले.नवरा मुलगा आणि त्याचे आई-वडील आणि त्यांचे काही नातेवाईक एका गाडीतून आले.
सगळ्यांचे स्वागत करुन आत बसण्यासाठी सांगितले.आता स्टेजवर नवरा मुलगा खुर्चीवर विराजमान झाल्या नंतर नवरी मुलगी ला अंगठी घालण्यासाठी बाहेर आणण्यासाठी सांगितले.
सुहास आणि विकास दोघेही स्टेजवर जाऊन उभारले .आता नवरी मुलगी तिच्या मैत्रिणी बरोबर येत होती.नवरी मुलगी स्टेजवर चढली तिला नवरा मुलग्याच्या बाजूला खुर्चीवर बसविण्यासाठी सुहास ने सांगण्यासाठी समोर गेला आणि पाहतो तो तिच्या बरोबर तिची मैत्रीण जी काल दोन वेण्या घातलेली सुहासला धडकून पडलेली तीच होती.पण ती आज खूप वेगळी दिसत होती.तिने पांढऱ्याशुभ्र रंगाची साडी परिधान केली होती.तिचे लांब कुरळे केस पंख्याच्या हवेने तिच्या चेहऱ्यावर रुळत होते आणि ती त्यांना मागे करण्याचा प्रयत्न करत होती.तिचे ते रुप पाहून तिची ती सुंदरता पाहून सुहास तिथेच स्तब्ध होऊन उभा राहिला आणि एकसारखा तिलाच पहात उभारला.जणूकाही पुतळाच झाला होता.
चांदण्या सारखे लखलखीत सौंदर्य खुलून दिसत होते.आणि तिचे ते सौंदर्य सुहासला तिच्या कडे आकर्षित करत होते.
क्रमशः
©® परवीन कौसर....