विषय:- प्रेमकथा
फेरी:- राज्यस्तरीय कथामालिका लेखन
डिग्री शिक्षण पूर्ण झाल्यावर हॉस्टेल सोडताना पुनम व रोहिणी खुश होत्या. दोघींनी स्वमतानुसार एकत्र राहायचे ठरवले असले तरीही दोघींचे मार्ग यापुढे पूर्णतः वेगळे होणार असल्याची जाणीव त्यांना जरा देखील नव्हती.
खास मैत्रीण आपल्याच घरी राहायला येणार ह्या आनंदात रोहिणी पार बुडून गेली होती. कारण ज्या घरात आया गेल्यानंतर तिला एक दिवससुद्धा चैन पडले नव्हते त्या घरात पुनम येणार ही गोष्ट तिच्या मनाला सुखद करून जात होती. पुनवेच्या रात्रीत रोहिणीचे चांदणे लख्ख पडावे तशी ती उत्साहित झाली होती.
रोहिणीने केवढ्या उत्साहाने तिला फोन केला होता? मात्र आबांनी मॉडेलिंग क्षेत्रासाठी पूर्णपणे विरोध केला, त्यामुळे घरातील तप्त वातावरण पाहून पुनमने तिला नंतर फोन करते म्हणत परत फोन केलाच नाही. त्यानंतर रोहिणीने देखील तिला कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. आबांच्या धाकापायी पुनम थोडे दिवस शांत राहिली खरी पण काही दिवसांनी तिला रोहिणीची आठवण येऊ लागली. दुरावा नकोसा झाला अन् तिने रोहिणीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहिणीने कॉलिंग नंबर, व्हॉट्सॲप आणि फेसबुक वगैरे ॲपवर पुनमला ब्लॉक करून ठेवले होते. त्यामुळे रोहिणीशी संपर्क साधणे तिला शक्य झाले नाही.
तेव्हा तिच्या मनात अनेक प्रश्न किरकिर करू लागले. \"एका रात्रीत माणसं कशी काय बदलू शकतात? मैत्री अशी असते का? कॉलेज संपलं म्हणजे सगळं काही सपलं का? असो माझी देखील चुकी झाली. मी सुद्धा रिटर्न कॉल केला नाही. पण तिलाही वाटलं नसेल का की, एकदा तरी माझ्याशी बोलावं? असं वागणं योग्य आहे का?\" हा विचार करून पुनमची अवस्था पार बिकट झाली होती. त्यावेळेस पुनमला तिचा राग देखील तितकाच आला होता.
तिची दीनवाणी अवस्था पाहून आबा सारखेच समजूत घालायचे, "ते उच्च वर्गीय सोसायटी मधील लोक. ती आपल्या सर्वसामान्य मध्यम वर्गीय लोकांची कधी होत नसतात. आपल्याकडे देखील पैसा आहे पण शहरातल्या लोकांची बात काही निराळीच असते. यापुढे शहरी माणसांचा मोह पकडायचा नाही आणि तिथे पुन्हा फिरकायचे नाही." असे आबांनी चोख बजावले. त्यामुळे पुनमला गावाबाहेर पडणे कठीण झाले. पिंजऱ्यातील पक्ष्यासारखी तिची अवस्था झाली होती. हळूहळू तिने आयुष्याच्या डायरीतून रोहिणी नावाचे पान दुमडून ठेवले.
पुनमच्या डोक्यातले मॉडेलिंगचे भूत उतरवण्यामागे आबा सफल झाले होते.
गावातील मुलांना शिक्षणासाठी तालुक्याला जायला लागायचे. त्यासाठी त्यांना खूप कष्ट पडायचे. प्रवासाचा खर्च बऱ्याच लोकांना परवडत नसल्यामुळे शिक्षण घेण्यासाठी गावातील मुलं पाठी पडत होती. त्यामुळे गावातील बंद पडलेली शाळा सुरू करण्याचे आबांचे स्वप्न होते आणि पुनमचे शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय ते शक्य नव्हतं.
पुनमने शाळा सुरू करण्याची जबाबदारी घेतली. नवीन शिक्षक, शिक्षिका भरती करण्यात आले. योग्य शिक्षण पद्धती सोबत प्रत्येक वर्षी सहल, कार्यक्रम आणि खेळ राबविण्यात येत होते. सरकारी सुविधा विद्यार्थांना देण्यात येऊ लागल्यामुळे सबंध गावातील लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला लागले. गावातील स्त्री व पुरुषांसाठी साक्षरता मोहीम राबविण्यात आली. स्त्रिया शाळा सुटल्यानंतर शाळेत येऊन बसायच्या. तर कष्टकरी वर्ग संध्याकाळी काम करून आल्यावर शाळेत येऊन बसायचे. जनकल्याण मोहीम राबविण्याचे नवे प्रकल्प तिने हाती घेतले होते. जेणेकरून महिलांनासुद्धा गावातच रोजगार प्राप्त होईल. गावाचे चित्र पूर्णपणे बदलून गेले होते. लहान मोठे वयस्कर मंडळी बाप - लेकीस येता जाता आशीर्वाद देत होते. अखेर गावाचे नाव साक्षरतेच्या यादीत आले. पुनमचा तालुक्यातून सत्कार करण्यात आला. एकंदर आबांचे स्वप्न तिने पुर्ण करून दाखवले.
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन पाच वर्षात ती मुलांच्या विश्वात कधी रममाण झाली हे तिलासुद्धा कळले नाही.
पुनम गतकाळातील आठवणींत वाहवत चालली होती. किती वाजले? ह्याचे भान देखील तिला राहिले नव्हते. दरवाज्यावरील बेलचा आवाज कानी पडताच ती भानावर आली. पुनमने दरवाजा उघडल्या बरोबर रोहिणी आत आली. तिला मिठीत घेत म्हणाली. "तु यशस्वीपणे सगळे टप्पे पार पाडत चालली आहे. बस! उम्मिदो की उडान अभी दूर नाही."
"तुझा आलेला एक फोन कॉल त्यामुळे मी आज इथवर पोहचू शकले. तू माझ्या आयुष्यात पुन्हा आली नसती ना तर माझे स्वप्न अपूर्णच राहिले असते. हे नक्की स्वप्न आहे की सत्य? मलाच कळतच नाहीये. किती लवकर लवकर सफल होत चालली आहे असे वाटते आहे." पुनमला सगळं स्वप्न असल्यासारखं भासत होतं.
"अगं परी राणी हे सगळं सत्यच आहे." म्हणत रोहिणी हसली.
"जेव्हा आपण भेटलो तेव्हा मी तुला काही प्रश्न विचारणार होते. पण त्या वेळेस श्रावण क्वीन काँटेस्टची तयारी करायची असल्यामुळे तू माझ्यावर बंधन लावले. \"काँटेस्ट झाल्याशिवाय कुठलीच चर्चा करायची नाही. फोकस फक्त आणि फक्त श्रावण क्वीनवर.\" आता मला कळायलाच हवं. जिवापाड जपलेले आपले बंध तू एका रात्रीत का तोडले? का असं केलं?
तुला संपर्क साधण्याचा किती प्रयत्न केला माहिती आहे? काही दिवसांनी एका मैत्रिणीकडून समजले तू परदेशात ट्रेनिंगसाठी गेलीस. आयुष्यातून काहीतरी वजा झाल्यासारखं झालं होतं. बाकी फक्त आठवणी राहिल्या होत्या." बोलताना पुनमचे डोळे पाण्याने भरून आले होते.
तुला संपर्क साधण्याचा किती प्रयत्न केला माहिती आहे? काही दिवसांनी एका मैत्रिणीकडून समजले तू परदेशात ट्रेनिंगसाठी गेलीस. आयुष्यातून काहीतरी वजा झाल्यासारखं झालं होतं. बाकी फक्त आठवणी राहिल्या होत्या." बोलताना पुनमचे डोळे पाण्याने भरून आले होते.
"अगं वेडा बाई तुझे चांगले दिवस आले आहेत. ह्या सुखद क्षणी असं रडून चालेल का? ह्या जगात कोणी अशी व्यक्ती नसेल की, त्यांच्या आयुष्यात अमावास्येची काळरात्र आली नसावी. जीवन असेच असते काळे ढग येतच राहतात. फक्त आपल्याला अंधारमय वाटेवर स्वतःच्या आत्मविश्वासावर प्रकाशमय मार्ग शोधून काढायचा असतो." असं म्हणत रोहिणी तिला गुंतवू लागली.
"इतक्या वर्षांनी अचानक तुला माझी आठवण कशी काय झाली? तू विचार केलास का कधी? माझ्या मनाची परिस्थिती काय झाली असेल? श्रीकृष्ण जसा राधेला सोडून गेल्यावर ज्या झळा ती सोसत होती अगदी तसंच म्हणायला हरकत नाही." पुनम प्रश्नांचा भडिमार करत चालली होती.
पुनमचे वाक्य तोडत रोहिणी म्हणाली, "राधा राणी झळ सोसत होती पण त्रास श्रीकृष्णास देखील होत होता ना? काहीतरी कारण होते म्हणून श्रीकृष्ण वृंदावन सोडून गेले पण नंतर अखेरची भेट घेण्यासाठी ती श्रीकृष्णाकडे खेचत आली ना?"
"आयुष्यात जरुरीचे नाही की, कृष्ण हा मित्राच्या रुपातच भेटायला हवा. एक प्राणप्रिय सखीसुद्धा कृष्ण रुपात भेटू शकते." रोहिणीचा हात हातात घेत पुनम बोलुन गेली.
क्रमशः...
©®नमिता धिरज तांडेल.
जिल्हा पालघर
जिल्हा पालघर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा