विषय:- प्रेमकथा
फेरी:- राज्यस्तरीय कथामालिका लेखन
सुधांशुचा आक्रोश पाहून जमलेल्या सिनेसृष्टीमधील लोकांच्या डोळ्यांतुन देखील अश्रू ढळत होते. सगळीकडे तिच्या मनमोकळ्या मृदू स्वभावाची चर्चा सुरू होती. अंतिम संस्कार करून आल्यानंतर सुधांशु बंगल्यावर आला. रोहिणीचा फोटो छातीशी कवटाळून रडू लागला. कारण तिच्याशिवाय त्याचे कोणी जवळचे नव्हतेच.
पुनमने अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने पाठी वळुन पाहताच पुनम बोलू लागली,"अचानक रोहिणीच्या जाण्यामुळे मनावर खुप मोठा आघात झाला आहे. ह्या दुःखातून आपण बाहेर पडू की नाही ठाऊक नाही. सबंध आयुष्य तिच्या आठवणी हृदयाशी कवटाळून काढावं लागणार. फक्त आणि फक्त तिच्यामुळे मी इथवर आले. अडगळीच्या खोलीत जसे जुने सामान टाकून द्यावे आणि अचानक कधीतरी त्याचा शोध घेताना तेच आपल्याला जुने ते सोने वाटावे. अशी माझी परिस्थिती झाली होती. पण आता पुन्हा स्वप्न गाठोड्यात बांधायची वेळ आली आहे. मी तिच्याशिवाय पुर्णत्वास जाऊ शकणार नाही." मनातील दुःख व्यक्त करत पुनम रडू लागली.
स्वत:चे डोळे त्याने पुसले आणि तिला धीर देत म्हणाला."रोहिणी ह्या जगात नाही. मात्र शेवटची घटिका मोजत असताना तिने माझ्याकडून वचन घेतले. कुठल्याही परिस्थितीत तुझे स्वप्न पुर्ण करण्याचे. यशाच्या पायरीवर तुला अर्ध्यावर सोडून कसे चालेल? तिच्या आत्म्यास कशी काय शांती मिळेल ?"
"तुम्ही फ्रेश होऊन या आणि थोडं जेवून आराम करा." ती सुधांशुला म्हणाली.
"मला खरच भुक नाहीये." त्याने प्रतिउत्तर दिले.
"कालपासून एक अन्नाचा कण पोटात नाहीये आणि म्हणताय भुक नाहीये. तुम्ही उपाशी राहिले तर तिला देखील त्रास होणार ना. मला सुद्धा रोहिणी अनोख्या बंधनात अडकवून गेली आहे. तुम्ही जो पर्यंत ह्या दुःखातून सावरत नाही. तो पर्यंत मी तुमच्या सोबतीस आहे एक मैत्रीण म्हणुन. त्यानंतर माझ्या परतीची वाट गावाकडेच नेणार आहे." असं म्हणत ती स्वयंपाक खोलीत गेली.
सुधांशु फ्रेश होऊन डायनिंग टेबल कडे आला. पुनमने त्याला जेवण वाढले. "पुनमs, तु सुध्दा कालपासुन काही खाल्लेले नाही. सोबत जेवायला बस." तिला बोलुन कसाबसा जेवायला लागला. जणु डोळ्यांतील पाण्याचा बांध त्याने अडवून धरला होता. त्याला पाहून तिचे मन गहिवरून आले होते.
"मी थोड्या वेळ विश्रांती घेतो. तु सुद्धा आराम कर. कोणी भेटायला आले तर मला उठवायला येऊ नकोस. मी घरात नाहीये म्हणुन सांग." सुधांशु बेडरूममध्ये निघुन गेला.
घरात काम करणाऱ्या दोन स्त्रिया होत्या. त्यांच्यासोबत बोलण्यात तिचा वेळ निघुन गेला. विचार करून अती त्राण झाल्यामुळे तिचे डोके जड झाले होते. रोहिणी गेस्ट रूम मध्ये विश्रांती घेण्यासाठी गेली.
डोळे बंद केल्यावर डोळ्यांसमोर रोहिणी येऊन उभी राहिली. डोळ्यांची उघडझाप सतत सुरूच होती. विचारांचे चक्र भरधाव वेगाने फिरू लागले. आता मात्र रोहिणीने जे गुपित लपवले होते त्याचा तिला शोध घ्यायचा होता. पण कसा? ह्या प्रश्नाने तिच्या मनात चिन्ह लिहिले. कदाचित सुधांशुला माहिती असेल. पण सध्याच्या घडीला त्याच्याकडून नको त्या प्रश्नांचा उलगडा करणे तिला योग्य नाही.रोहिणी तिच्यासोबत गुपित घेऊन गेली असे समजणे तिला योग्य वाटले.
सहा वाजुन गेले होते. सुधांशुने कॉफी घेऊन पुनमला टेरेसवर येण्यास सांगितले. ती कॉफी घेऊन टेरेसवर आली. संध्यासमयी केसरी सूर्य रंग उधळण करत चालला होता. पक्षी परतीच्या प्रवासावर होते. पुनम ते दृश्य पाहण्यात दंग झाली होती. सुधांशु लॅपटॉप घेऊन तिथे आला. कॉफीचा एक घोट पिऊन झाल्यावर सुधांशु म्हणाला,"रोहिणी एवढी वर्ष तुझ्यापासुन लांब का होती हे तुला जाणुन घ्यायचे होते ना ?"
हे ऐकुन पुनमला जोरदार ठसका लागला.
"अगं! हळू हळू" म्हणत त्याने कॉफीचा कप टेबलवर ठेवला आणि तिच्या पाठीवरून काळजीने हात फिरवू लागला.
"अगं! हळू हळू" म्हणत त्याने कॉफीचा कप टेबलवर ठेवला आणि तिच्या पाठीवरून काळजीने हात फिरवू लागला.
"मी ठीक आहे. मला वाटले होते मला कधीच उलगडा होणार नाही. तुम्हाला तरी कसे विचारणार? मनात खंत होती आणि आता ऐकुन मला..." एवढं बोलुन ती गप्प राहिली.
सुधांशुने तिला गुपित सांगण्यास सुरुवात केली. माझे आणि रोहिणीचे प्रेम जुळले. त्यानंतर नेहमी ती मला तुझ्याबद्दल सांगायची. तुझ्या सगळ्या गोष्टींची तिला माहिती होती. शिक्षण मंत्र्याद्वारे तुझा सत्कार करण्यात आला. तेव्हा तुझे आबा म्हणाले, "आम्हाला आमच्या मुलीचा अभिमान वाटतो. अखेर हिने आमचे स्वप्न पुर्ण केले." तेव्हा रोहिणी म्हणाली,"आता पुनमचे स्वप्न पुर्ण करण्याची वेळ आली आहे. एकदा तरी तिने ह्या काँटेस्टमध्ये भाग घ्यायला पाहिजे. स्व मनातील इच्छा बाजूला करून तिने आबांचे स्वप्न पुर्ण केले आहेच. शाळा संपुर्ण तालुक्यात नंबर वन वर आणली आहे. आता तिच्या स्वप्नांना दिशा मिळाली पाहिजे."
पण नेहमीप्रमाणे आबांना दिलेले वचन डोळ्यांसमोर उभे राहीले.आबांना काय वाटेल? काय विचार करतील ते माझ्याबद्दल?"
पण नेहमीप्रमाणे आबांना दिलेले वचन डोळ्यांसमोर उभे राहीले.आबांना काय वाटेल? काय विचार करतील ते माझ्याबद्दल?"
"एक मिनिट. आबांना दिलेले वचन. ते कधी? त्यांची भेट कधी घडली. आबा कधी काही बोलले नाही." पुनम आश्चर्यचकित झाली.
"दोघींनी हॉस्टेल सोडल्यानंतर तुम्ही आपआपल्या घरी निघुन गेल्या. रोहिणी खुप खुश होती तु परत तिच्या सोबतीस येणार म्हणून. पण तुझ्या आबांनी दुसऱ्या दिवशी हॉस्टेल मधुन रोहिणीचा पत्ता घेतला. तिच्या घरी जाऊन तिच्या पाया पडले. तुझ्यापासुन लांब रहा म्हणून शपथ घातली. तुझ्या आयुष्यात कधीच दखल देणार नाही असे वचन घेतले तिच्याकडून आणि ही गोष्ट कधीच कोणाला कळता कामा नये म्हणुन बजावले. मनात नसताना ती तुझ्यापासुन लांब गेली आणि आता एवढी लांब गेली की, कधीच परत येणे शक्य नाही."
दोघांच्या डोळ्यांतुन न थांबणारे अश्रु वाहू लागले होते.
हे शब्द ऐकुन पाया खालची जमीन सरकावी असे काहीसे पुनमला झाले. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णत: बदलून गेले होते. तिच्या हृदयाला जखम झाली होती.आबांनी रोहिणीबद्दलचे किती नकारात्मक विचार मला सांगितले. सारखेच तिचा अपमान करत राहिले. एवढा अपमान एखादी व्यक्ती कशी काय पचवू शकते? तरीही तिच्या मनात आबांबद्दलचा आदर कायम होता.
मनोमन ती बोलू लागली. \"खरं तर ह्या घडीला कृष्णासारखी माझी अवस्था झाली आहे. राधा शेवटची घटिका मोजत असताना तिने कृष्णाला बासरी वाजवायला सांगितली. राधेचा प्राण गेला तरीही तो बासरी वाजवत राहिला. शेवटी ती बासरी तोडून टाकली कधी न वाजविण्यासाठी. परंतु मला त्याग करून चालणार नाही. तिने मला इथवर आणुन सोडले. केवळ माझे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी ना. मग मी माघार घेऊन कसे चालेल?\"
क्रमशः
©®नमिता धिरज तांडेल
जिल्हा पालघर
©®नमिता धिरज तांडेल
जिल्हा पालघर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा