Login

चंद्रमुखी

This Is A Heart Touching Story Of Chandramukhi She Is Suffering In Red Light Aria And Desperately Want To Leave Such A Life

         
              
             दरवाजा आतून बंद करून, चंद्रमुखी खोलीत बेडवर जाऊन बसली. दरवाजा बंद करत असताना आपल्या ही आयुष्याचा दरवाजा आता असाच.. आतून..खोलवर हळूहळू बंद होत आहे. याची तीला तीव्र जाणीव होत होती. मात्र अजूनही...आपन या घाणीच्या चक्रव्यूहातून सुटू शकतो.. असे तीला अधून मधून वाटत होते. पहिल्या वेळेस शरीर दुसऱ्यांच्या ताब्यात देत असताना, तीला खुप  भीती वाटली होती. आता तेवढी भीती वाटत नसली तरी .. \"त्या सर्व घाणेरड्या प्रकारची\" तिची घीण मात्र वाढतच होती.

                         रोज कित्येक पुरुष...पुरुषत्वाचा आव आणणारे...सुटाबुटातले, स्वतःला सुसंस्कृत म्हणणारे... दारू व तत्सम नशा करून येणारे..येन तारुण्यात येणारे... मिशी ही न फुटणारे... एवढेच नव्हे तर उतारवयात आलेले.. असे असंख्य पुरुष.... स्वतःची अब्रू  नग्न करून अक्षरशः शरीरावर  लंडग्या सारखे तुटून पडतात. व शरीराचे जणुकाही लचकेच तोडतात.. \"त्यांचे डोळे तर शरीर सुखाला एवढे बळी पडलेले असतात की, त्यांच्याच डोळ्यात आपल्याला...आपलेच नको ते नग्न अवयव दिसतात.\"...\"वासना... फक्त क्षणिक वासना... तिच्यात एवढे सामर्थ्य....ती जागृत झाली की, माणसाच्या विवेक बुद्धीला लखवा होतो. व ती शरीराच्या प्रत्येक अवयवात एवढी दाटून भरून जाते की, त्यांच्या प्रत्येक कृतीतुन ती विक्षिप्तपणे प्रगट होण्याची कोणतीच संधी सोडत नाही..\"...अस्वस्थ..एकटी...हतबल झालेली ती अशा अगणित विचाराच्या भोवऱ्यात..सापडली.. अन त्यात बुडून गेली..

                     तेवढ्यात कोणी तरी दरवाज्याची कडी वाजवली.. आवाज ऐकू येताच..ती भानावर आली. बेडवरून उठली. तिने घाईघाईत दरवाजा उघडला. तोच तिला एक जोरदार धक्का बसला.. एका झटक्यातच ती सरळ बेडवर जाऊन पडली.. "सा...### रं..###..... ..जादा नखरे कर रही...कबसे दरवाजा ठोक रहा हू..सुना नही देता क्या..?" असे म्हणून त्याने सरळ तिच्या कानशिलात लावली.. "मजा किरकिरा कर दिया सा....... ने.."  ती स्वतःला सावरत... "शेटजी..माफ करना..".. ती पुढे काही बोलण्याच्या आताच....शेटजी..."ठीक है".."ओ, बॅग मै व्हिस्की है.. जलदी से पेग बना"
        
                 शेटजी.. हो शेटजीच...अक्का चे खास कस्टमर.. मालदार पार्टी.. त्यांना नाराज केले तर..अक्का चा मार खावा लागणार...या भीती ने चंद्रमुखी ने शेटजीना पाहिजे ते केले...दारू पिऊन शेटजी..चन्द्रमुखी च्या शरीरावर तुटून पडला..शेवटी थकला...
तिच्या शरीरावर त्याच अखं शरीर पडून राहिल. पण याच भान त्याला नव्हतं... तीने त्याला कसंबसं बाजूला केलं.... बेड वरून उठली.. स्वतःचे कपडे व स्वतःला सावरले..व कोपऱ्यात जाऊन बसली.. त्या बेड कडे..शेटजी कडे..पाहून तीला स्वतःचीच लाज वाटत होती..बेडवर नग्न शेटजी आडवा पडला होता.. खाली मान घालून.. ती स्वतःच्या नशीबाला दोष देत राहली.. खूप वेळ झाला ती तशीच सुन्न बसली होती.. काही वेळाने शेटजी उठला..अंगावर कपडे घालून.."नेक्स्ट टाइम दरवाजा जलदी से खोलना.." अस म्हणून तिला दोन-चार शिव्या दिल्या. व तिच्या कडे न पाहता निघून गेला..

                    तीने दरवाजा पुन्हा आतून बंद केला.. बेडशीट व्यवस्थित केली.. पुन्हा तोच डार्क मेकअप केला. तो गरजेचा होता.. नाही केला तर अक्का ची भीती..आता असा मेकअप नेहमी-नेहमी करून तिचा चेहरा ही निंबर झाला होता..तेवढ्यात पुन्हा दरवाज्याची कडी वाजली...भेदरलेल्या तिने.. घाईघाईत दरवाजा उघडला..समोर एक काळाकुट्ट व संपूर्ण चेहऱ्यावर मोस असलेला..व प्रचंड ढेरी पुढे आलेला..उतरवायकडे कडे लागलेला माणूस आत आला..तो आत येताच त्याच्या सोबत कसल्या तरी दारूचा जीवघेणा वास ही आत आला होता...तो तिच्या कडे वासनेच्या नजरेने असा काही पाहू लागला की \"वासना\" या शब्दलाही लाज वाटेल..त्याला पाहून तिन घट्ट डोळे मिटून घेतले. त्या माणसाने लगेच त्याच्या शरीराची लाजिरवाणी भूख भागविली. व लवकरच तिथून निघून गेला..चंद्रमुखीला खूप किळसवाणे वाटत होते..तिने ओकारी केली..व स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला..

                     आता बस झालं..आज अजून कोणी यायला नको... म्हणून ती देवाकडे याचना करत होती..तोच तिची नजर एका पिशवी कडे गेली.. ती त्याच काळ्याकुट्ट माणसाची पिशवी होती.. पिशवीत.. लहान मुलांचे खेळणे, काही चॉकलेट, थोडं किराणा समान, व थोडासा भाजीपाला होता. हे सर्व समान पाहून ती थक्क झाली. \"शरीरसुख...फक्त शरीर...त्याच्या पुढे...स्वतःची बायको नाही.. संसार नाही.. मुले नाहीत.. नातवंडे ही नाहीत.. एवढी मोठी भूक असते शरीरसुखाची...माणसाला..?\" की त्या सुखपुढे तो सर्वाना विसरून जातो. \"विचारांचं ही एक चक्रव्यूह असते\" तीच संवेदनशील मन त्या चक्रव्यूहात अडकल होत.

                      चंद्रमुखीला ला आता रेड लाइट एरिया मध्ये येऊन चार ते पाच वर्ष पूर्ण झाले होते..ती बारा वर्षाची असताना तिच्या वडिलांनी आत्महत्या केली होती..एकटी बाई व सोबत बारा वर्षाची मुलगी....\"नवरा नसतो..तेव्हा समाज एकट्या बाईला सहनभूतीच्या नजरेने कमी पण संधीच्या नजरेनं जास्त पाहतो\" हे समजायला चंद्रमुखी च्या आईला जास्त वेळ लागला नाही. त्यातच तिची मावशी..तिला दुसरं लग्न करण्याचा आग्रह करत होती..ती तिला नेहमी म्हणत असे.."लग्न करून घे.. निदान चंदा कडे पाहून तरी कर".. "नाहीतर हे लोक तुला जगू देणार नाहीत.."पण आई लग्न करायला तयार होत नव्हती...पण जेव्हा चंद्रमुखीच्या आईवर चंद्रमुखीच्याच समोर बलात्काराचा प्रयत्न झाला. तेव्हा तिने नाइलाजास्तव लग्नाचा निर्णय घेतला. व मावशी ने एका मिस्त्री सोबत तिचे लग्न लावून दिले...पण काही दिवसातच सावत्र बाबाच खरं रूप समोर येऊ लागल. बाप नेहमी दारू व जुगाराच्या नशेतच राहयाला लागला. थोड्याच दिवसात त्याने कामावर जाणे सोडून दिले व फक्त आईच्या मिळकती वरच जीवन जगायला लागला. पैशासाठी आईला मारहाण आता रोजचीच झाली होती. घर चालवायला पैसा कमी पडू लागला. अश्यातच चंद्रमुखीच्या शिक्षणानेही कायमचीच सुट्टी घेतली.

                       एक दिवस मावशी धावतच घरी आली.. घाबरलेल्या मावशीच्या तोंडून शब्द ही बाहेर पडेनात. तिला घाम फुटला होता.."चंदे..तुझी..आई...तुझी..आई...गेली ग..तुझी आई.." हे ऐकताच चंद्रमुखी वाऱ्याच्या वेगाने धावतच सुटली.. गर्दी ला कापत..पुढे आली ...पाहते तर काय......तिच्या आईच्या डोक्यातून रक्त....आई मरून निश्चल पडली होती...तिची आई आता तीला कायमची सोडून गेली होती... काम करत असताना पाय घसरून इमारतीवरुन खाली कोसळली होती. आई जाण्याच्या दुःखातुन ती बाहेर पडली ही नव्हती. तोच एक दिवस बाप नेहमी प्रमाणे नशेतच घरी आला. तो चंद्रमुखी जवळ गेला. चंद्रमुखी थकून झोपली होती..तिला चाहूल लागताच ती बापाला.."काय करत आहात..?"..आई अग आई.. अस करू नका... बाबा ..आवरा स्वतःला.. आवरा...बाबा...आई...आई... बाबा.. बाबा.." तीच काही न ऐकता सावत्र बापानं तिच्यावर बलात्कार केला..एवढंच नव्हे तर दुसऱ्याच दिवशी, पैशासाठी तिला कोठी जाऊन विकले.

                    कोठी वरचे जीवन तिच्या साठी खूपच वेगळे होते... इथे कोणीही त्यांच्या मर्जी प्रमाणे आले नव्हते..काही मुलीना..त्यांच्या प्रियकराणी प्रेमात फसवून..भविष्याची सोनेरी स्वप्ने दाखवून आणले होते..तर काहींना शहरात चांगल्या नोकरीची व भावी आयुष्याची स्वप्ने दाखवून  आणले होते..तर काही विधवा..हतबल झालेल्या महिलांना विविध प्रकारची आमिष दाखवून आणले गेले होते.. इथे कोणी ही स्वतःच्या इच्छेनुसार आले नव्हते. वा इच्छेनुसार काम करत नव्हते. इथे प्रत्येकाची आपली वेगळी व्यथा होती. कहाणी होती.

                   नवीन आलेल्या मुलींना सर्व व्यवहार समजून सांगितला जात असे. कस्टमर सोबत कस वागावं... हे ही शिकविल्या जात असे. जे कोणी याला विरोध करत.. त्यांना मात्र अक्का एका बंद खोलीत डांबून ठेवीत असे... त्यांना जबरदस्ती ने नशेचे इंजेक्शन दिल्या जात असे... त्यांना उपाशी ठेवल्या जात असे....त्याना अमानवी पद्धतीने मारल्या जात असे...चंद्रमुखी ही याला अपवाद नव्हती... तीलाही या सर्व परिस्तिथी तुन जावे लागले होते....सरतेशेवटी ती ही इतरांप्रमाणे शरण आली व बापानेच बलात्कार केला व पैशासाठी आपल्याला इथे विकले या पेक्षा अजून काय वाईट होऊ शकते. या विचारने स्वतःची भाबली समजूत काढत होती.

                  तिच्या पहिल्याच दिवशी तिच्या कडे तीन कस्टमर ला पाठवल्या गेले..ती दिसायला खूप सुंदर होती. तिच्या नावाप्रमाणे.. चंद्रा सारखच तिचं मुख होत.. त्यामुळे तिच्या कडे येणाऱ्या कस्टमर ची संख्या वाढत होती. व अक्का तिचा कोणताही विचार न करता तिच्या कडे कस्टमर पाठवीत होती. किती कस्टमर तिच्या कडे पाठविले जातात याचा आकडा ही अक्कानी मोजने सोडले होते. त्यामुळे तिला तिच्या सुंदर दिसण्याची ही आता लाज वाटत होती...व ..\"स्त्री ने सुंदर दिसणे हा या पुरुषांच्या जगात खूप मोठा शाप आहे\"... असं ती मानायला लागली होती..

                    आता हळूहळू तिची ओळख सर्वसोबत होत होती...हे जग म्हणजे एक प्रकारची दलदल आहे आणि यात एक वेळेस फसल की यातून सुटका नाही. पण या दलदलीतुन निघण्याचा प्रयत्न चन्द्रमुखी ने खूप वेळा केला..पण प्रत्येक वेळी तिचा प्रयत्न फसला..आणि...नंतर शिक्षा म्हणून अमानवी शारिरीक मारहाण..गरम जळत्या सळी चे चटके ..चिमटयाने केस उपटने..उपाशी ठेवणे..रात्रभर झोपू न देणे..चुकून डोळा लागला की पुन्हा चटका व मारहाण..असा अमानवी छळ होत असे..पण तिने प्रयत्न करणं सोडले नव्हते कारण \"ज्या वेळी तू इथून पळून जाण्याचा विचार करणं सोडशील त्या वेळी इथून पळून जाण्याच्या तुझ्या सर्व वाटा नेहमी साठी बंद होतील\"..अस कमला तिला नेहमी म्हणत होती..म्हणून चंदा..\"पळून जाण्याचा दिवा\" सदैव मनात तेवत ठेवीत होती.. त्याला.. इच्छेच, निश्चयाच, विश्वासाच, व सहसाच..तेल अर्पण करत होती.

                 अक्का प्रत्येकाच्या खोलीत कस्टमर पाठवत असे.. प्रत्येकाच्या खोल्या ठरलेल्या होत्या. खास मालदार कस्टमर आला तर सर्वाना बोलून..त्याच्या समोर उभं केल्या जात असे..मग तो त्यांच्या पैकी एका ची निवड करून त्याची शारिरिक भूक भागवित असे.. आज खोलीत जाण्याच्या आधीच अक्का नि सर्वाना बोलावून घेतले होते..काही खास कस्टमर आले होते..त्यांच्या समोर सर्वाना उभं केलं गेलं...पण त्यातील काही लोकांनी..घाईघाईत तळ घरात.. व इतर रूम मध्ये वाऱ्याच्या वेगाने झेप घेतली..व ते संपूर्ण कोठी ची झळती घेऊ लागले..ते कस्टमर नसून पोलीस होते.. अक्काला काही कळण्याच्या आत..ते सर्वांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले..

                        पोलीसाची धाडी नेहमीच पडत असत..नंतर अक्का स्वतः येऊन त्यांना सोडवून परत घेऊन जात असे.. मात्र ही धाड नेहमी सारखी नव्हती अस चंदाला जाणवत  होत.. तिच्या सोबतच्या सर्व स्त्रीया आरामात बोलत होत्या.. हसत होत्या. तेवढ्यात.. एक  तिशीच्या आत असणारा तरुण त्यांच्या समोर येऊन  खूप घाणेरड्या भाषेत शिव्या देऊ लागला.. त्याच बोलणं एवढं घाणेरडं होत की, रूम मध्ये त्या काळ्याकुट्ट माणसासोबत झोपतानाही एवढ घृणास्पद वाटल नाही तेवढ घृणास्पद आज चंदा ला वाटत होते. पण तिच्या सोबतच्या सर्व स्त्रीयांना त्याच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नव्हता..मात्र चंदाला ते सर्व सहन झालं नाही..आणि ती एकदम रडायला लागली.. तिच्या सोबतच्या सहकारी.. तीच रडणं पाहून हसायला लागल्या...तेवढ्यात त्या युवकाने चंदाचा हात घट्ट पकडून तिला आत नेले...व बाहेरून दरवाजा बंद केला..

                     आता केबिन मध्ये धारधार मिश्या.. चेहऱ्यावर तेजस्वी तेज..पाणीदार डोळे.. रुबाबदार... मध्यम वयातील माणूस उभा होता.. त्याने खड्या आवाजाने .." पाणी पितेस का.."  चंदा चुपचाप उभी होती.."बस...घे पाणी पोरी.."...\"पोरी\" या शब्दाने ती भानावर आली.."मी पोलीस निरीक्षक रविकांत.." त्याने बोलत बोलत तिला खुर्चीवर बसविले... "शांत हो..रडू नकोस.."तो तिच्या डोळ्यात पाहून बोलू लागला.. "मी तुला फक्त एकच प्रश्न विचारतो...त्याच खरं उत्तर दे..आणि येथून निघून जा.."........\"निघून जा\"...हे शब्द कानावर पडताच... ती त्यांच्या पायावरच पडली..."नाही..साहेब.. कुठे जाऊ त्या नरकात... नका...नका...पाठवू तिकडे मला...वाचवा मला....तुमच्या घरी भांडे.. धुणे करेल...पण मला तिकडे नका पाठवू..."बोलताना तिला दम लागत होता..."सात..सात.. वर्ष त्या नरक यातना भोगत आहे...आणि आता तिकडे गेले तर..कायमची अडकून जाईल.. साहेब हा माझा शेवटचा व निकराचा प्रयत्न करत आहे.. म्हणून तुमची विनवणी करत आहे... तुम्ही जर आता मला तिकडे पाठविले तर....कायमची...कायमची.. तिथे..."  बोलता बोलता ती खाली कोसळली... तिचे हातपाय कडक पडू लागले..दात उघडत नव्हते.. तीच शरीर थरथर कापू लागलं.."..तिला लगेच...जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलविल्या गेले...

                  थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली.. तिच्या समोर पोलीस स्टेशनला तिला घाणेरड्या भाषेत बोलणरा तरुण उभा होता.. तिला काही समजण्याच्या आतच त्याने..."तुझी त्या कोठीतून कायमची सुटका झाली आहे.." असं म्हणून बोलायला सुरुवात केली.."मी स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करतो...आमची संस्था पोलिसांच्या मदतीने ज्या स्त्रिया कोठीवर वैशा व्यवसायात अडकलेल्या आहेत.. व त्यांना खरंच तिथून बाहेर पडायचे असते..त्याची सोडवणूक करतो.."...तुझ्या बाबत आम्हाला तीन महिन्याआधीच समजले होते..फक्त सापडा रचण्याची व संधी ची वाट आम्ही पाहत होतो..तुला बोललो कारण तुझी तिथून बाहेर पडण्याची धडपड आम्हाला पोलिसांना दाखवायची होती..ती तू खूप चांगल्या प्रकारे रविकांत सरांसमोर दाखविली"...."तिथेच तुझी त्या नरकातून सुटका झाली"...ती सुन्न होऊन त्याच बोलणं ऐकत होती.. नकळत आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून... तिच्या चेहऱ्यावर पसरू लागले.. व तिचा निंबर मेकअप मिटवू लागले.. तिने त्या युवकाचे व रविकांत सरांचे आभार मानले...जाताना तो युवक तिला म्हणाला..."तुझी जिद्द.. दृढनिश्चय.. व इच्छाशक्ती..यामुळे तू त्या घाणेरड्या नरकातून बाहेर पडू शकलीस.."...कधी नव्हे तिच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला होता..

..समाप्त.

..✍️© जगदीश लक्ष्मण वानखडे..
Copyright
All Rights Reserved

संपर्क - jmunnaw@gmail.com
0