चंद्रिका (भाग २)
अनुराग घरी आला पण त्याच्या नजरेसमोर फक्त आणि फक्त चंद्रिकेचाच चेहरा येत होता. काहीतरी ओढ म्हणा की काय माहित नाही पण अनुराग निव्वळ एका भेटीत चंद्रिकाच्या स्वाधीन झाला होता. त्याला तिची पुन्हा भेट व्हावी असे वाटू लागले.
दुसऱ्या दिवशी तो पुन्हा चंद्रिकाला जिथे सोडले होते त्या ठिकाणी गेला. अंधारात त्याला ती जागा नीट दिसली नव्हती. पण आता त्याला त्या जागेचे सौंदर्य दिसत होते. आत पायवाट संपताच समोर बकुळीचे तिरकेसे झाड त्याच्या मागे एक कॉटेज होते. बाजूलाच सुंदरसा तलाव. त्या तलावाच्या बाजूलाच छोटीशी बाग. अनुराग बागेत फिरता फिरता, चंद्रिकावर त्याची नजर गेली. समोरच्या बागेत कोपर्याच्या बँच होता तिथे ती बसलेली. गोरापान वर्ण, नीळसर डोळे, छोटुसं नाक, वार्यावर उडणारे हळवे केस. खुप खेळकर वाटत होती आणि हसताना ना तिच्या गालावर एक खळी पडत होती. ती तिथे एकटीच बसलेली होती. अलगत पावलांनी अनुराग चंद्रिकाच्या जवळ गेला. त्याची चाहूल लागताच चंद्रिका एकदम दचकून अनुरागला पाहू लागली. दोघांचीही नजरानजर झाली. जणू कैक जन्माची ओळख असल्यागत ते एकमेकांना पाहत होते. ना कोणता ईशारा, ना कोणती मागणी जणू नियतीनेच त्यांना एकमेकांच्या प्रेमात पाडले होते.
कधी ते एकमेकांचे झाले ते त्यांना कळले ही नाही. रोजच अनुराग आता बागेत जाऊ लागला. त्यांचा तो कोपर्यातला बँच ठरलेला असायचा. ती रोज तीथेच अनुरागची वाट बघायची. मनातल्या त्या सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगायचे. मनसोक्त गप्पा मारायचे मन मोकळं व्हायचं. तो तिला सगळं सांगायचा. अनुरागला ती एकदम जवळची वाटु लागली. तिच्याशी भेटल्यावर त्याचं मन शांत व्हायचं. जर एक दिवसही ते भेटले नाही तरी अनुराग बैचेन व्हायचा. नेहमी बोलताना चंद्रिका अनुरागच्या पाठीवर हात ठेवून असायची.
एक वर्ष उलटले. त्यांचं प्रेम घट्ट होत गेले. त्या बागेत फक्त ते दोघेच असायचे. त्यांच्या ऐवजी तिसरा व्यक्ती कधीच बागेत दिसला नाही. आता तर अनुरागला चंद्रिका शिवाय जराही करमत नसायचे. तिचाच सहवास हवाहवासा वाटु लागला. मनातल्या भावना कधी तिच्या पुढे व्यक्त करतो असे व्हायचे. ती ही नीमुटपणे सगळं ऐकून घ्यायची. चंद्रिका मुळे अनुराग आता घरी वडिलांकडे ही जायचे टाळायचा. त्याने अजुन तरी चंद्रिका बद्दल कुणाला सांगितलं नाही. एकदोनदा काही जणांनी त्यांना बागेत पाहीले होतं. पण कोण काही बोलले नाही.
अनुरागच्या साईड वरील काम संपले तरीही तो घरी आला नाही त्यामुळे त्याच्या वडिलांना त्याची चिंता वाटू लागली. त्याने आपल्या तारापूरच्या अधिकाऱ्यांकडे विचारपूस केल्यावर त्यांना कळाले होते की अनुराग तिथे जवळ एका बागेत रोज बसतो. राजाराम यांना वाटले की अनुरागचे नक्कीच तिथे कुणा मुली बरोबर सुत जुळले असेल त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीकडे काना डोळा केला होता. परंतु अनुराग घरी साधा फोनही करत नव्हता किंबहुना त्याने घरच्यांना विसरून टाकले होते म्हणून राजाराम चिंतेत आले आणि त्यांनी स्वतः तारापूरला जायचा निर्णय घेतला.
राजाराम जेव्हा तारापूरच्या आपल्या बंगल्यावर आले त्यावेळी त्यांना अनुराग भेटला. अनुराग त्यांना पाहून फक्त किंचीत हसलाच. जणू काही एखादी दूरची ओळखीची व्यक्ती भेटावे तसेच त्याचे रिएक्शन होतं त्या पलीकडे काहीच नाही .या गोष्टीमुळे राजाराम यांना अजून विचित्र वाटले. कारण अनुरागचं वागणं त्याची देहबोली काहीतरी विचित्र वाटत होते.
एका रात्री जेवताना राजाराम यांनी अनुराकडे त्या बागेचा विषय काढला. तेव्हा अनुरागणे राजाराम यांना चंद्रिकेबद्दल सांगितले. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे हे सुद्धा सांगितले.
राजाराम यांनी विचारले "ही चंद्रिका कोण ? कोठे असते ?."
त्यावेळेस अनुरागने तिचा पत्ता आणि तिचे वर्णन राजाराम यांना सांगितले. ते ऐकून राजाराम यांना मात्र मोठा धक्का बसला होता.
ते अनुरागला म्हणाले "तू ज्या चंद्रिकाला भेटतो ती अस्तित्वातच नाही आहे. ती चंद्रिका तीस वर्षांपूर्वीच मेली आहे. त्या तलावाजवळ, त्या बागेत आणि त्याच्याजवळ असलेला कॉटेजमध्ये कोणीही राहत नाही. कारण त्या कॉटेजमध्ये चंद्रिका तिची बहीण आणि आई यांचा तीस वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांचे घर जळाले. त्यात त्या तिघींचाही मृत्यू झाला होता.
हे ऐकून अनुरागला आता मात्र खूप मोठा धक्का बसला. कारण त्याला रोज भेटणारी चंद्रिका ही खरी होती. पण राजाराम यांनी जे सांगितलं ते सत्य तो मानायला तयारच नव्हता. राजाराम अनुरागला येथून घेऊन जाण्यास घाई करत होते.
पण अनुरागला एकदा चंद्रिकेची भेट हवी होती. त्याला माहित होते तो ज्या चंद्रिकेला भेटतो ती खरी आहे.
अनुरागने त्याचे वडील राजाराम यांच्या नकळत चंद्रिकेची भेट घेण्यासाठी; तो नेहमी ज्या बागेमध्ये ते दोघे एकमेकांना भेटत होते त्या ठिकाणी गेला. पण आज त्या ठिकाणी जाऊन त्याला काहीतरी वेगळं पण जाणवलं. तो नेहमी ज्या बागेत येत होता ती फुलांनी वेलीने भरलेली बाग आज तशी दिसतच नव्हती तर एक भयान सुकलेलं झाडांचं कोरडं मैदान होतं ते. समोर जो सुंदर तलाव असायचा त्या तलावा गढूळ पाणी त्याला दिसलं. बाजूला ती जी सुंदर कॉटेज होती त्या ठिकाणी तिच्या जळून गेलेल्या भंगण अवशेषा शिवाय काहीच नव्हतं. हे सर्व पाहून तो गांगरून गेला. त्याने कोपऱ्यात पाहिले जिथे तो आणि चंद्रिका रोज बसायचे. तिथे त्याला चंद्रिका पाठमोरी दिसली तो धावतच. चंद्रिके जवळ गेला. त्याने चंद्रिकेच्या पाठीवर हात ठेवला तेव्हा तिने वळून पाहिले. चंद्रिकेचा चेहरा आणि तिची अवस्था पाहून तो घाबरून चार पावलं मागे आला.
----------
( आज चंद्रिकाला पाहून अनुराग का घाबरला असावा ? का अनुरागच्या बाबांनी आधीच भेट घेतली होती ? )
----------
( आज चंद्रिकाला पाहून अनुराग का घाबरला असावा ? का अनुरागच्या बाबांनी आधीच भेट घेतली होती ? )
(क्रमशः)
लेखिका : आहाना कौसर ( कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे आहेत)
लेखिका : आहाना कौसर ( कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे आहेत)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा