चंद्रिका : भाग १
-----------------------
राजाराम भोसले हे नामवंत उद्योगपती. त्यांचा एकुलता एक मुलगा अनुराग आपल्या नवीन प्रोजेक्ट साठी तारापूरला आला. आज साईड वर खूपच उशीर झाल्यामुळे त्याला अर्ध्या रात्री ऑफिस मधून निघावे लागले.
-----------------------
राजाराम भोसले हे नामवंत उद्योगपती. त्यांचा एकुलता एक मुलगा अनुराग आपल्या नवीन प्रोजेक्ट साठी तारापूरला आला. आज साईड वर खूपच उशीर झाल्यामुळे त्याला अर्ध्या रात्री ऑफिस मधून निघावे लागले.
पौर्णिमेचा चंद्र आकाशात पूर्ण आलेला. एक मुलगी रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेली. डोक्याला थोडासा मार लागलेला. अनुराग तेथूनच आपली बाईक घेऊन सुसाट जात होता. जाता जाता त्याची नजर रस्त्याच्या कडेला पडलेल्या मुलीवर गेली. गाडी सुसाट होती म्हणून त्याला बाईक थांबवता आली नाही म्हणून अनुराग पुढे जाऊन पुन्हा मागे आला. तो त्या मुलीला आधी दुरूनच एकटक पाहत होता. त्या अवस्थेत पडलेल्या मुलीला पाहून त्यात रस्ता सुनसान. मदतीची गरज असावी कदाचित म्हणून हिंम्मत करून तिच्याजवळ गेला. हात लावून पाहिले तर कळले त्या मुलीला शुद्ध नव्हती अनुराग त्या मुलीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला. जवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी तिच्या तोंडावर शिंपडले. मुलगी घाबलेल्या अवस्थेत अंगाला हिसके देत शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले तेव्हा समोर अनुराग दिसला. तिने त्याला पाहून घाबरत घट्ट मुठी धरली. काहीतरी शोधत असावे या नजरेने ती आपल्या अवतीभवती भरभर नजर फिरवली.
त्यावर अनुराग उत्तरतो. "मी अनुराग,येथून जात असताना तुम्ही मला इथे दिसलात म्हणून मदतीसाठी थांबलो."
पुढे अनुराग तिला प्रश्न करतो "तुम्ही कोण कुठे राहता आणि इतक्या रात्री या अवस्थेत इथे कशा ? "
ती मुलगी शांत होती काहीच बोलली नाही. अनुरागने तिच्या चेहऱ्यावर शिंपडलेल्या पाण्यामुळे जसे चंद्राचा उजेड तिच्या चेहऱ्यावर पडत होता तस-तसा चेहरा उजळून दिसत होता. चेहऱ्यावर पडणाऱ्या त्या चंद्रप्रकाशाने ती मुलगी अधिकच मनमोहक दिसत होती. तिचे ते मनमोहक रूप अनुराग निरखतच राहिला. थोडा वेळ निघून जाताच भानावर येत अनुरागने पुन्हा तिचं नाव विचारले. यावेळी ती मुलगी काही शोधू लागली. तिला एका हाताच्या अंतरावर तिची पर्स दिसली त्यातून तिने एक कार्ड काढत अनुरागच्या हातात दिले.
अनुराग त्या कार्ड वरील नाव व पत्ता वाचतो त्या मुलीला विचारले "हा तुझा पत्ता आहे का ?"
तेव्हा ती मुलगी हो म्हणत मान डोलावते. अनुराग एकदा त्या मुलीला पाहतो एक नजर आकाशात असलेल्या पूर्ण चंद्रावर पडते व पुन्हा तो त्या कार्डवर नाव वाचतो 'चंद्रिमा'. मनातल्या मनात म्हणतो "खरेच चंद्रासारखीच आहे चंद्रिमा."
"या पत्त्यावर जायचं आहे का ?" असे अनुराग विचारतो. चंद्रिमा इशाऱ्यानेच हो म्हणते. अनुराग तिला हात देतो. चंद्रिमा उठून उभी राहते. कपड्यावर लागलेली माती झटकते. अनुराग येथे तेथे पाहतो त्याला कोठेच कोणतेच वाहन येणारे दिसत नाही.
" रोज इथूनच जाते का ?" अनुराग चंद्रिमा ला विचारतो.
चंद्रिमा पुन्हा इशाऱ्यानेच " हो " म्हणते. ती घाबरली आहे एवढं तर अनुराग ला आता पर्यंत कळालेलं असत. म्हणूनच का कोण जाणे ती बोलत नसावी असा विचार अनुराग च्या मनात येतो.
" किती वेळ लागेल इथून तुझ्या घरी जायला ? तू वाट दाखवशील ना ?" अनुराग पुन्हा प्रश्न करतो व चंद्रिमा पुन्हा "हो" मान डोलावते. रात्र फार झाली होती. गार वारा अंगावर शहारे आणत होता. यावेळी अनुराग ही इशाऱ्यानेच चंद्रिमा ला बाईक वर बसण्यास सांगतो.
बाईक दोन - तीन वेळा सेल्फ स्टार्ट केल्यावर देखील सुरु होत नव्हती. अनुराग मग किक मारून बाईक स्टार्ट करतो किक मारता-मारता त्याची नजर हातातील घड्याळावर पडते. पाहतो तर काय ? दीड वाजलेले असतात. खूपच उशीर झाला असल्याने अनुराग गाडी वेगाने चालवत असतो. चंद्रिका त्याच्या पाठीवर हात ठेवून बसली. जवळपास एक किलोमीटर एवढे पोहोचल्यावर चंद्रिमा ने गाडी थांबवण्यास सांगितले. गाडीवरून उतरून स्मित हास्य देत चंद्रिमा रस्त्याच्या कडेला एक पायवाट असते तिथून पुढे थोड्याच अंतरावर एक कॉटेज दिसत होते त्याच्या वाटेने जाऊ लागली. अंधारात त्याला ते काही बरोबर दिसले नाही. फक्त अंधारात ती मुलगी हळूहळू गुडूप होत होती.
ती गेल्यावर अनुराग जरा गोंधळत स्वतःशीच पुटपुटला "काय मुलगी आहे, साध थँक्यू इतक देखील बोलली नाही" म्हणत अनुराग गाडी पुन्हा सुरु केली.
अनुराग तिथून बाईक घेऊन निघाला, त्या मुलीने आपली मान तिरकी केली. त्या मुलीची नजर अनुरागवरच होती. त्या नजरेत एक असूया आणि राग होता. तिच्या तोंडावर एक रहस्यमय हास्य होते. अनुरागच्या पाठीवर जिथे चंद्रिकाने हात ठेवला होता त्या ठिकाणी पाठीवर हाताचा लालपंजा उमटला होता.
--------
( हा लाल पंजा कसा बरं उमटला ? तिच्या हाताला जखम वगैरे झाली होती का ? की अजून काही ?)
--------
( हा लाल पंजा कसा बरं उमटला ? तिच्या हाताला जखम वगैरे झाली होती का ? की अजून काही ?)
(क्रमशः)
लेखिका : अहाना कौसर ( कथा चोरी गुन्हा आहे. कॉपीराईट अंतर्गत )
लेखिका : अहाना कौसर ( कथा चोरी गुन्हा आहे. कॉपीराईट अंतर्गत )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा