ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदकथा - संघ 4 (कामिनी)
जलदकथा - संघ 4 (कामिनी)
चंद्रवासी भाग ४ (अंतिम)
सगळे तिच्या हातातल्या वस्तूकडे बघत होते. तो एक पृथ्वीगोल होता. तिने तो पृथ्वीगोल त्यांच्या समोर ठेवला. एक छोटी काठी घेतली आणि भारतावर ठेवली. ते बघून त्यांची आपापसात काहीतरी चर्चा झाली. एक चंद्रवासी धावतपळत बाहेर गेला. सगळीकडे शांतता पसरली. सोहम आणि मधू अस्वस्थपणे बसले होते.
तेवढ्यात दरवाजा उघडला आणि एक भारदस्त आवाज आला, “नमस्कार भारतीयांनो!”
दोघांनीही आश्चर्यचकित होत आवाजाच्या दिशेने बघितलं.
'मराठी बोलणारा चंद्रवासी?' दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
“तुम्हाला मराठी कसं काय येतं?” सोहमने आश्चर्याने विचारलं.
“आम्हाला माहीत होतं, पृथ्वीवरची माणसं कधी न कधी चंद्रावर येऊन पोहोचतील. अशी वेळ जेव्हा येईल, तेव्हा त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी आम्हाला त्यांची भाषा येणं महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच आम्ही आमचे वेष बदलून काही वर्षांपूर्वी पृथ्वीवर उतरलो. प्रत्येक देशात एक चंद्रवासी गेला. त्या त्या देशाची भाषा आत्मसात केली. तिथल्या संशोधनातल्या प्रगतीचा आढावा घेतला.”
चंद्रवासी बोलायचा थांबल्यावर काही सेकंद शांतता पसरली.
“आमचे प्राण तुम्ही वाचवलेत, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.” सोहमने बोलायला सुरुवात केली.
“ज्यादिवशी आम्ही पृथ्वीवर परत जाण्यासाठी उड्डाण करणार होतो, त्याचदिवशी आमचं यान गायब झालं. त्यामुळे आम्ही इथेच अडकून पडलो. आमचा ऑक्सिजन संपत आला होता. त्यातच त्यादिवशी वादळ झालं आणि आम्ही बेशुद्ध पडलो. शुद्धीवर आलो, तेव्हा तुमच्याकडे होतो. हे यान आमचंच आहे. आम्हाला पृथ्वीवर परत जायचे आहे.”
“ज्यादिवशी आम्ही पृथ्वीवर परत जाण्यासाठी उड्डाण करणार होतो, त्याचदिवशी आमचं यान गायब झालं. त्यामुळे आम्ही इथेच अडकून पडलो. आमचा ऑक्सिजन संपत आला होता. त्यातच त्यादिवशी वादळ झालं आणि आम्ही बेशुद्ध पडलो. शुद्धीवर आलो, तेव्हा तुमच्याकडे होतो. हे यान आमचंच आहे. आम्हाला पृथ्वीवर परत जायचे आहे.”
त्या चंद्रवासीने सोहमच बोलणं भाषांतरित करून प्रमुखाला ऐकवलं. त्यांची आपापसात चर्चा झाली. मग तो सोहम आणि मधूशी बोलायला लागला.
“आम्ही तुम्हाला तुमचं यान परत करू. तुम्हाला मदत करायलाही आम्ही तयार आहोत; पण आम्हालाही तुमची मदत हवी आहे.”
“आम्ही काय मदत करू शकतो?” मधूने विचारले.
“आम्ही इथे शेतीसाठी प्रयोग करत आहोत. त्यासाठी आम्हाला उत्कृष्ट दर्जाच्या बियाणांची गरज आहे. तसेच शेतीच्या संबंधित इतरही उपकरणे हवी आहेत.”
“आम्ही आमच्या शास्त्रज्ञांशी बोलून तुम्हाला हवी ती सर्व मदत पुरवू.”
दोघांनी चांद्रवासीयांना मदतीचं आश्वासन दिलं.
दोघांनी चांद्रवासीयांना मदतीचं आश्वासन दिलं.
पुरावा म्हणून त्यांचे चित्रण केले आणि यानातून परतीच्या प्रवासास सुरुवात केली.
यान पृथ्वीच्या कक्षेत परतलं. सोहम आणि मधूचं पॅराशूट अलगद समुद्रात उतरलं. त्या अथांग निळ्या समुद्रात ते पडले, तेव्हा दोघांनाही इतिहास गाजवून आपल्या आईच्या कुशीत शिरल्यासारखं वाटलं.
समाप्त
©अभा बोडस
©अभा बोडस
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा