Login

चंद्रिका भाग ३ अंतिम

चंद्रिका ही कथा काल्पनिक असून ती एका अतृप्त आत्म्याची कथा आहे. या कथेचे सगळे पात्र काल्पनिक आहेत जर कोठे साम्य आढळल्यास तो निवड योगायोग असेल.
चंद्रिका (भाग 3)

"त.. त.. तू कोण आहेस ?." त्याने घाबरून विचारले.

कारण चंद्रिकेचा चेहरा एक एका भयानक सैतानासारखा दिसत होता. तिचे अस्थीपंजर झालेले शरीर, जळून गेलेला चेहरा आणि तिच्या हातामध्ये एक बाळ होते. मेलेले बाळ, तेही जळून कोळसा झालेले.

चंद्रिका त्याला पाहून म्हणाली "मी तुझीच चंद्रिका आहे."

अनुराग म्हणाला "हे कसं शक्य आहे.?"

चंद्रिकाने अनुरागच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले अनुराग एका तंद्रीत जाऊ लागला आणि त्याच्या डोळ्यांसमोर चंद्रिकेचा भूतकाळ येऊ लागला.

चंद्रिका एक अल्हढ मुक्त उडणाऱ्या फुलपाखरासारखी चंचल होती. याच ठिकाणी तिचं घर होतं. तिच्यावर प्रेम करणारी आई आणि लहान बहीण. एकमेकांना जीव लावणाऱ्या दोघी बहिणी. आई कबाड कष्ट करून आपल्या मुलींना वाढवत होती. तिघीही साध्याभोळ्या, मितभाषी आणि कष्टाळू होत्या. चंद्रिकेला तिच्या आईचे मेहनत आणि मुलींसाठी घेतलेले कष्ट याची जाणीव होती. त्यामुळे चंद्रिकेचे स्वप्न होतं काहीतरी मोठं व्हावं आपल्या लहान बहिणीला डॉक्टर बनवावे. एक छानस घर आणि आपल्या आईला सुखात ठेवावं. यापेक्षा तिच्या आयुष्यातून काहीच अपेक्षा नव्हत्या.

चंद्रिकेचा शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर ती एका ऑफिसमध्ये कामाला लागली. तिचे वागणे बोलणे सर्वांना आपलेसे करणारे होते त्यामुळे तिने लवकरच ऑफिसमध्ये रुळली. ऑफिसमध्ये राजाराम भोसले काम करत होता. चंद्रिकेचं सौंदर्य पाहून राजाराम चंद्रिकेवर भाळला. ते दोघेही एकाच ऑफिसमध्ये कामाला असल्यामुळे रोज त्यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. राजारामचाही स्वभाव चांगला होता त्याच्या बोलण्यात आपुलकी होती. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या सानिध्यात ओढले गेले.

राजारामची स्वप्ने खूप मोठी होती त्याला खूप पुढे जायचं होतं खूप पैसा कमवायचा होता. त्याचं चंद्रिकेवर प्रेमही खूप होतं चंद्रिकाही राजाराम वर खूप प्रेम करायची. दोघेही प्रेमामध्ये आपल्या मर्यादा ओलांडून गेले होते ते शारीरिक जवळही आले होते. त्यात चंद्रिकेला दिवस गेले. चंद्रिका ने हे राजारामला सांगितले. तिला वाटले की राजाराम काय प्रतिक्रिया देईल पण राजारामला त्या गोष्टीचा आनंद झाला.

आपण बाप होणार आहोत त्याने लवकरच चंद्रिकेशी लग्न करण्याची तयारी दाखवली. त्यासाठी सुट्टी काढून तो मुंबईतील आपल्या घरी आई वडिलांची बोलण्यासाठी गेला. चंद्रिका येथे त्याची वाट बघत होती. तिच्या पोटातील अंकुर वाढू लागला तिचं पोट दिसायला लागलं. लोकलज्जेभय्या मुळे तिने कामाला जाण्याचे सोडलं होतं. ती फक्त आणि फक्त राजाराम याची वाट पाहायची. पण राजाराम परत आलाच नाही.

सहा महिन्यानंतर चंद्रिकेला समजले की राजारामने मुंबईला गेल्यावर त्याच्या आई-वडिलांनी निवडलेल्या मुलीशी लग्न केले. ती मुलगी एक श्रीमंत बापाची एकुलती एक कन्या होती. त्या मुलीशी लग्न केल्यामुळे राजारामला आपसुकच श्रीमंत होण्याचा एक सोपा मार्ग सापडला होता. म्हणून त्याने चंद्रिकेला आपल्या आयुष्यातून वजा करून परस्पर लग्न करून टाकल.

ही गोष्ट चंद्रिकेला माहित पडताच चंद्रिका मात्र कोसळून गेली. तिने मुंबईला जाऊन राजारामची भेट घेतली. चंद्रीकेला आपल्या घरी आलेल्या पाहून राजाराम मात्र हादरून गेला. चंद्रिका तेव्हा सात महिन्याची गरोदर होती. त्याने तिला एकांतात नेले.चंद्रिका त्याच्या छातीवर डोके ठेवून धरडसा रडू लागली.

"राजाराम तुम्ही असे का केले ?. तुमचं माझ्यावर प्रेम नव्हतंच ना ?. तुम्ही माझा वापर करून घेतला."

राजाराम तिला म्हणाला "चंद्रिका माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि अजूनही आहे. पण मला हे लग्न मजबुरी मध्ये करावं लागलं. आई वडिलांनी माझ्यावर दबाव टाकला. पण मी तुला विसरू शकत नाही. मी तुला वचन देतो हे त्या चार दिवसांमध्ये मी सगळं सुरळीत करून तारापूरला येईल आणि तुझ्याशी लग्न करेल." राजारामने तिला वचन दिले.

चंद्रिकेला तिच्या घरी तारापूरला परत पाठवले. घरी गेल्यावर चंद्रिका राजाराम ची वाट पाहत होती. तीन दिवसानंतर राजाराम खरोखरच तिच्या घरी आला. तो दुसऱ्याच दिवशी तिच्याशी लग्न करणार होता. चंद्रिका आनंदी झाली. आज त्याने स्वतः त्यांच्या साठी स्वयंपाक केला. जेवण झाल्यावर रात्री चंद्रिकाची आई तिची बहीण आणि चंद्रिका झोपले होते. राजारामने त्यांच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले होते. मध्यरात्री उठून राजारामने चंद्रिकेच्या घराचा दरवाजा बाहेरून कडी लावून बंद केला आणि घरावर पेट्रोल ओतून संपूर्ण घर पेटवून दिलं. त्या आगीत चंद्रिकाचे कुटुंब आणि चंद्रिका तिच्या पोटातील बाळा बरोबर जळून राख झाले.

चंद्रिकाचा भूतकाळ पाहून आणि आपल्या बापाचा काळा चेहरा समजल्यावर अनुरागला खूप वाईट वाटले. तितक्यात अनुरागचे वडील जयराम त्याला शोधत तिथे आले.

राजारामला पाहून चंद्रिकेचा आत्मा चवताळाला तिला हेच तर हवे होते. कितीतरी वर्षांपासून ती प्रतिशोधाच्या संधीसाठी डाव मांडुन बसली होती. योगायोग म्हणा किंवा नियतीनेच मांडलेला डाव म्हणा जयरामचा मुलगा अनुराग तिच्या विव्हात आला. त्याचाच सोंगट्या सारखा वापर करून तिने राजारामला इथे येण्यासाठी मजबूर केले होते. आज ती तिचा प्रतिशोध घेणार होती.


"बदला.. बदला.. माझ्या मृत्यूचा बदला."


एका प्रतिशोधाचा आर्त संदेश त्या प्रतिध्वनी मधून येत होता. राजाराम त्या गोंगाटाने एकदम कासावीस झाला. त्याला तो गोंगाट सहन होत नव्हता. आपले कान दोन्ही हातांनी घट्ट दाबण्यासाठी आपल्या हातांना उचलायचा प्रयत्न करत होता. पण त्याचे शरीर जणू काही निर्जीव झाल्यासारखे झाले होते. त्याचे लक्ष तलावातील हालचालींवर गेले. जणू तो तलाव राजारामला आपल्यात खेचत होता असे त्याला जाणवले. एक तीव्र कळ त्याच्या छातीतून निघाली. हृदय बंद पडून राजारामचा मृत देह तिथेच खाली कोसळला.

आणि अनुराग ....? तो केव्हाचाच चंद्रिकेच्या स्वाधीन झाला होता.

समाप्त....

🎭 Series Post

View all