चॅम्पियन ट्रॉफी 2025
लघुकथा
ऋतुजा वैरागडकर
लघुकथा
ऋतुजा वैरागडकर
चार लोकं काय म्हणतील...
ज्ञानेश्वरला जाऊन तेरा दिवस झाले होते.. तेराव्याचा
कार्यक्रम पार पडला. सगळे आपापल्या घरी निघून गेले.
एकुलता एक मुलगा गमावला म्हणून सरोजिनीताई आणि माधवराव दोघेही निराशेच्या गर्तेत गेले होते.
पायलच्या पायाखालची जमीन सरकली होती.
अनवी आणि त्रिशा दोघीही लहान होत्या. बाबा कुठेतरी निघून गेले एवढंच त्यांना कळतं होतं.
कार्यक्रम पार पडला. सगळे आपापल्या घरी निघून गेले.
एकुलता एक मुलगा गमावला म्हणून सरोजिनीताई आणि माधवराव दोघेही निराशेच्या गर्तेत गेले होते.
पायलच्या पायाखालची जमीन सरकली होती.
अनवी आणि त्रिशा दोघीही लहान होत्या. बाबा कुठेतरी निघून गेले एवढंच त्यांना कळतं होतं.
सरोजिनी आणि माधव यांना ज्ञानेश्वर हा एकुलता एक मुलगा होता. एम.बी.ए होऊन मल्टिनॅशनल कंपनीत जॉबला होता. जॉब जॉईन केल्यानंतर एक दिवस त्याची ओळख पायलशी झाली.
पायल जास्त शिकलेली नव्हती. ती तिच्या आईला घरकामात आणि बाहेरच्या कामात मदत करायची. आईच्या साथीने तिने सगळं शिकून घेतलं होतं. स्वयंपाक ते व्यवहार चातुर्य सगळं तिच्या अंगी भिनलं होतं.
ज्ञानेश्वरला पायल बघता क्षणी आवडली होती, पण तिचा स्वभाव ठाऊक नव्हता. त्याने हळूहळू तिच्याशी बोलणं वाढवलं. काहीतरी कारण सांगून तिला भेटायचा, तिच्याशी बोलायचा. तिच्या बोलण्यातून ती, तिच्या घरचे अगदी साधे आणि प्रामाणिक लोकं आहेत इतकं त्याला कळून चुकलं होतं.
आधी तिला न विचारता तो त्याच्या आई बाबांशी बोलला.
आधी तिला न विचारता तो त्याच्या आई बाबांशी बोलला.
"आई बाबा मला एक मुलगी आवडली आहे. तुम्ही तिच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी कराल का? मी अजून तिला काही सांगितलं नाही आहे."
"तुला आवडली म्हणजे चांगली असणार. तू तिचं नाव पत्ता सांग, आम्ही भेटतो त्यांना."
एक दोन दिवसात बघण्याचा कार्यक्रम झाला आणि महिनाभरात लग्न झालं.
लग्नानंतरचे दिवस छान गेले. वर्षभरात अनवी झाली आणि पुन्हा पुढील दोन वर्षात त्रिशा झाली.
लग्नानंतरचे दिवस छान गेले. वर्षभरात अनवी झाली आणि पुन्हा पुढील दोन वर्षात त्रिशा झाली.
खूप सुखी कुटुंब होतं, आनंदाने दिवस, वर्ष उलटली आणि एक दिवस अचानक ज्ञानेश्वर अपघातात मरण पावला.
पायलने कसबसं घराला सावरलं.. तिला स्कूल मध्ये जॉब मिळाला होता. कसबसं घर चालत होतं, हळूहळू मुली मोठ्या झाल्या, अनवीचं बारावी झालं.
तिला पुढे शिकायचं होतं पण आता जास्त पैसे लागणार होते.
तिला पुढे शिकायचं होतं पण आता जास्त पैसे लागणार होते.
"आई मी जॉब करण्याचा विचार करत आहे."
"काय? जॉब?"
"हो आई, आता कॉलेजला अॅडमिशन घ्यायची असेल तर पैसा लागेल आणि त्यासाठी मला पार्ट टाईम जॉब करावाच लागेल. त्रिशा आता दहावीला आहे, दोन वर्षानंतर तिच्या शिक्षणाचा खर्च येईल. मला तिला चांगल शिक्षण द्यायचं आहे, आई मी कमी शिकले तरी चालेल पण त्रिशा चांगली शिकली पहिजे. मला तिला तिच्या पायावर उभं राहताना बघायचं आहे."
"हो आई, आता कॉलेजला अॅडमिशन घ्यायची असेल तर पैसा लागेल आणि त्यासाठी मला पार्ट टाईम जॉब करावाच लागेल. त्रिशा आता दहावीला आहे, दोन वर्षानंतर तिच्या शिक्षणाचा खर्च येईल. मला तिला चांगल शिक्षण द्यायचं आहे, आई मी कमी शिकले तरी चालेल पण त्रिशा चांगली शिकली पहिजे. मला तिला तिच्या पायावर उभं राहताना बघायचं आहे."
पायलला तिचं कौतुक वाटलं.
तिने तिच्या डोक्यावर हात ठेवला,
"माझी लेक आता मोठी झाली, समंजस झाली. खरच मला तुझा अभिमान वाटतो." तिच्या माथ्यावर चुंबन घेतलं.
"पण अनू... काय काम करणार तू? कॉलेजमध्ये पूर्ण दिवस जाणार त्यानंतर तू काम कसं करणार? अग थकून जाशील तू."
"आई मी एका कॅफेमध्ये बोलून बघितलं. ते मला जॉब द्यायला तयार आहेत."
"कॅफेमध्ये? म्हणजे तू वेटरचं काम करणार.? नाही नाही अगं चार लोक काय म्हणतील."
"चार लोकं कोण आई?"
"अनवी, तू असं काहीही करणार नाही आहेस. हे बघ तुझ्या बाबांनी इतकं नाव कमावलं, लोकं आजही त्यांच्याविषयी आदराने बोलतात, आदराने त्याचं नाव घेतात. तू असं काम केलं तर ते काय म्हणतील.?"
"आई, कोणतंही काम छोटं किंवा मोठ नसतं आणि आपण जे काही काम करतो ते काम आपण कश्या पद्धतीने करतो आणि त्यात कसं यश मिळवतो यावर अवलंबून आहे. आई तू काळजी करू नको. मी सर्व व्यवस्थित करणार."
"अगं पण.."
"आई आपण जेव्हा कठीण परिस्थितीतून जात होतो ना तेव्हा हेच लोक आपल्या तोंडावर हसायचे. तेव्हा ही चार लोक आपल्याला मदत करायला नव्हती आली आणि ही चार लोक कोण आहेत? का मी यांचा विचार करायचा? आता मला शिक्षणाला पैसा लागतोय, देतील हे चार लोकं? नाही ना.. मग का अश्या लोकांचा विचार का करायचा? मी माझ्या परीने मिळेल ते काम करायला तयार आहे. मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे, त्रिशाला शिकवून मोठं करायचं आहे. आई तू आमच्यासाठी खूप केलंय गं... नाऊ माय टर्न.."
पायलचे डोळे भरून आले..
"आई आता नको...यांना तुझ्या डोळ्यातंच साठवून ठेव. ज्यादिवशी तुझी ही लेक काही करून दाखवेल ना? त्यादिवशी यांना वाट मोकळी करून द्यायची. तू आमच्यासाठी आयुष्यभर खूप केलंय गं. आता तू फक्त आराम करायचा."
अनवीने कॉलेजला अॅडमिशन घेतली. दिवसभर कॉलेज करून संध्याकाळी ती कॅफेला जायची, रात्री अभ्यास करायची. ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. लहान बहिणीची इंजिनिअरिंगला अॅडमिशन झाली.
दोघीही स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या.
पायलला आनंदाश्रू अनावर झाले.
पायलला आनंदाश्रू अनावर झाले.
"आई थँक यू सो मच. तू मला साथ दिली म्हणून हे शक्य झालं आणि आता कोणतंही काम करायचं नाही, तू फक्त आराम करायचा आणि हो आई या चार लोकांचा कधीच विचार करायचा नाही. आयुष्यभर आपण मन मारून जगतो, का तर चार लोकं काय म्हणतील. हे कपडे घालू... नको, चार लोक काय म्हणतील. चल फिरायला जाऊ...नको, चार लोक काय म्हणतील. आता या चार लोकांचा विचार सोडून मनसोक्त जगायचं."
दोघींनी एकमेकींना मिठी मारली.
दोघींनी एकमेकींना मिठी मारली.