Login

चरणधूळ

जलधारा आणि दगड
अचानक कोसळून जरी दुसऱ्याच्या अस्तित्वावर ठसे उमटवले तरीही
आपण जाणार आहोत वाहून
प्रवाहपतीत होऊन...
आणि दगडासारखं वर्षानुवर्षे मैत्र जपत उन्हातान्हाची पर्वा न करता अढळ उभं राहणं नसतं सोपं
याचं जलधारांनाही असतं भान....
म्हणूनच
दगडांवर स्वतःच्या अस्तित्वाच्या खुणा कोरून जाताना जलधारांनीही नकळत
मस्तकी लावलेली असते दगडाची चरणधूळ...