चौकट मी स्वतः स्विकारलेली!(भाग-१)

प्रत्येक स्त्रिने स्वतः हुन स्विकारलेली आयुष्यभराची संसार नावाची चौकट.
अगं संगिता आई कुठे आहे?"

दसऱ्याच्या दिवशी माहेरी सोनं देण्यासाठी आलेली प्रियांका अ़ंगणात रांगोळी काढत असलेल्या आपल्या वहिनीला विचारते. "ताई आईना शेजारच्या देसले काकुंकडे गेल्या आहेत, बराच वेळा झालाय. येतीलच एवढ्यात". "सोनं द्यायला गेली आहे का?"


" नाही हो ताई सोनं तर अजुन आणायचं आहे, हे गेलेत घ्यायला. देसले काकुंचं काही काम असेल. म्हणून बोलावुन घेतले त्यांनी..बाबा जरा फिरायला गेलेत तेवढ्यात जाऊन येते म्हणाल्या आई."


पाच ते दहा मिनिटात आई आली

" संगिता हे आलेत का गं ?". आई बाहेरुनच विचारत होती. "नाही गं आई नाही आलेत अजुन बाबा."

प्रियांका चा आवाज ऐकुन आई म्हणाली. "प्रिया तु कधी आलीस गं?" "हे काय आत्ताच आलीये."

"कशी आहेस तु? आणि बंटी कुठे आहे तो नाही आला का?" आई लेकीची विचारपूस करु लागली. " हो येणार आहेत ते दोघे नंतर. बंटी आणि हे पण."


"तुझी तब्येत बरी आहे ना? आणि बाबा कसे आहेत आता बि.पी. कमी झाले का त्यांचे?" प्रियांका आई बाबांची चौकशी करत होती.


आई- "कसलं कमी होतंय ते बि.पी. जेवढ्या गोळ्या खाल्ल्या तेवढं बरं वाटतं.. चालायचंच आता वयोमानानुसार हे सर्व."


प्रियांका - "काय म्हणत होत्या देसले काकु? बऱ्या
प्रियांका - "काय म्हणत होत्या देसले काकु? बऱ्या आहेत का त्या? म्हणजे प्रकृती वगैरे?? सहजच गेली होतीस का तु?"


आई-"काय होतं गं त्यांना एकच मुलगा तो ही विदेशात चांगल्या पदावर. दोघे नवरा बायको आता रिटायर्ड झालेत. छान आरामाचे आयुष्य जगत आहेत.मनमोकळे पणा असला, मनस्थिती चांगली असली की,कुठलेच आजारपण नसते. साधी डोकेदुखी ची गोळी ही नाही त्या दोघांनाही. आताचचं बघ ना..

दोघेही जातायेत ट्रिप ला म्हणजे देवदर्शन साठीच जाताहेत. चारधाम यात्रेचे पॅकेज आले होते. आठ दिवसांसाठी दहा हजारात... खाणं, पिणं, रहाणं सर्व त्याच पैशात. तेच सांगण्यासठी बोलावले होते.त्यांनी मला .अजुन चार सीट आहेत म्हणाल्या. आंम्हांलाही दोघांना सांगत होत्या बुकींग करायला."


"मग करुन घे ना बुकींग.."

"आंम्ही सुद्धा हेच बोललो होतो आईंना..". संगिता ही प्रियांका च्या शब्दाला शब्द लावते..पण आईना काहीही ऐकायला तयार नसतात.सारखं आपलं बाबांचा विचार करतात.बाबांना बघायला आंम्ही आहोत ना ??
(क्रमशः)
©®✍️सौ.दिपमाला अहिरे..