Login

चव तिच्या स्वयंपाकाची भाग १

चव तिच्या स्वयंपाकाची भाग १
" तेजू जरा पटपट आवर ग. मला ऑफिसला जायला उशिर होत आहे." अनिश म्हणाला.
मोबाईल मधले मेसेज बघत तो खुर्चीवर येऊन बसला.

तेजूने पटकन चहा आणि खाकरा त्याच्या समोर ठेवला.

" फक्त पाच मिनिट थांब. थालीपीठ करत आहे. लगेचच आणते." तेजू म्हणली.

इतक्यात रूम मधुन लतिकाबाई बाहेर आल्या. लेकाच्या समोर असा कोरडा नाष्टा बघून त्यांचं नाक मुरडलं. कपाळाला आठ्या पडल्या. अगदीं कासणुसा चेहरा करून त्यांनी अनिशच्या समोरचा नाष्टा बघून त्या बोलल्याच,

" अरे अनिश हे काय आहे रे ? हे असं कोरड कोरड  काय खातोस. मी तुला आतापर्यंत असा कोरडा नाष्टा कधी खायला दिला का ? नाही ना. सकाळीं उठून तुझ्यासाठी मस्त पैकी पराठे करायचे. त्यावर भरपूर तूप वाढायचं.सोबतीला एखादी खोबऱ्याची चटणी किंवा कोशिंबीर करायची. अग तेजु जरा लक्ष देत जा नवऱ्याकडे. "

" हो ग आई तूझ्या हातच्या पदार्थांची चवच न्यारी. सकाळीं कितीही गडबड असली तरी नुसती पोळी नाही सोबत एखादी कोशिंबीर किंवा चटणी असायची म्हणजे असायचीच. अगदी भाजी वगेरे नसेल तर दाण्याच्या कुटाचा भुरका. तर असायचा. फळाच्या सिझन प्रमाणे जॅम किंवा जेली नाही असं कधी झालंच नाही बघ."

चहाचा घोट घेत अनिश त्याच्या बालपणाच्या आठवणीत रमला. साहजिकच आईच्या बोलण्याने त्याला सगळं आठवलं. नेहमी प्रमाणे त्याने आईला अनुमोदन दिलचं.

तेजश्री किचन मध्ये थालीपीठ भाजत या माय लेकाचा सवांद ऐकत होती. नेहमीच तर होत. पण त्यांचं हे बोलण कुठे तरी तिला मनाला टोचत होत. मनात एक नकारात्मक भावना तग धरू लागली होती.
' बायको म्हणून मी कुठं कमी पडते आहे का ? '

ती नोकरी करत होती. ऑफिस आणि घर यांचं समतोल राखण्याचा प्रयत्न करत होती. लग्नाला अजून आठ महिने पुर्ण झाले होते. या इतक्या काळात असं कधी घडलच नव्हत की नवऱ्याने कधी तिच्या स्वयंपाकाचं कौतुक केलं होतं की सासूबाईंनी कधी मनापासून आवडलं असं सांगितल होत.

तरी बरं ती तिच्याकडून होईल तसं सगळं करायचा प्रयत्न करत होती. पण कधी मीठ कमी पडलं, तर कधी मसालेदार झालं आहे तर कधी किती तेलकट केलं तर
भाजी करताना अमुक एक भाजीला दाण्याचं कूट घालायचं होत तु खोबर कशाला घातलं ?

उसळीला आमसूल घालायचं चिंच नाही आवडत कोणाला ?
उपासाला कोथिंबीर नाही खात ?
पण काहितरी कमीच रहात. त्यावरून या मायलेकांची विशेष टीपणी ऐकावी लागत.

तिने अनिशला गरम थालीपीठ दिलं. सोबत दही आणि लोणचं होत. पण लतिका बाई म्हणल्या,

" तेजश्री थालीपीठा सोबत दही नाही घरच्या लोण्याचा गोळा पाहिजे. असं ग कसं काम करतेस तु ?" कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या.

तिने हो आई. पुढच्या वेळी करते हां. अस म्हणत वेळ मारून नेली. तरी बरं सासु बाईंनी स्वतः परवाच लोणी कढवल होत. आता दोन दिवसात लोणी कसं काय येईल ?

पण तेजश्री काही बोलली असती तर पुन्हा एकदा नव्याने वाद झाला असता. तिला आता वाद घालण्यासाठी वेळ नव्हता. ऑफिस साठी निघायच होत. या भांडणात एनर्जी वाया घालण्या पेक्षा ती एनर्जी कामात वापरली तर प्रमोशन साठी फायदा होईल. असा सुज्ञ विचार करून तिने नाष्टा संपवला. मग ती ऑफिस मध्ये निघून गेली.

एक दिवस संध्याकाळी घरी आली तेव्हा बघितलं तर लतिका बाईंच्या बहिणाबाई रोहिणी मावशी आल्या होत्या. ती त्यांच्याकडे बघुन हासली. हातातल्या पिशव्या किचन मध्ये ठेवल्या. फ्रेश होवून त्या तिघींच्यासाठी चहा बनवला. चहा पीत असताना मावशीनी तिला भाजी निवडून दिली.
त्यांनी तेजश्रीला सहजच विचारलं,

" आज काय करायचा बेत आहे. मेथी आणि मटार तर निवडून झालेत."

" विचार करते,आज मेथी मटार मलई आणि पनीर पुलाव बनवते." तेजश्री म्हणाली

" रोहिणी तिला नाही काही मेथी मटार मलई बनवता येत. ती पंजाबी पद्धतीची भाजी तर आपण छान बनवतो. हिच्या भाजीला काही चवच नसते. ना रंग ना चव ना मसाल्याचा सुगंध. तिला नको सांगु करायला. आपण बनवू नंतर.
ताई तुला आठवत एकदा भाऊबीजेच्या कार्यक्रमाला मी भाजी बनवली होती तर सगळ्यानी बोट चाटून भाजी खाल्ली होती. अहाहा. अजून ती चव जीभेवर रेंगाळत आहे." लतिका बाई त्यांच्याच आठवणीत रमल्या होत्या.

" लतिका तु छानच बनवते ग, पण जरा तुझ्या सुनेच्या हाताची चव तर चाखू दे. बघू तर कशी बनवते ती ?" वातावरण आधिक बिघडायच्या आधी ते सावरण्याचा प्रयत्न करत रोहिणी मावशी म्हणल्या.

तेजश्री ने रोहिणी मावशी कडे हसुन पाहिले. मग स्वयंपाक करायला ती किचन मध्ये गेली. तर या दोघी बहिणी गप्पा मारत बसल्या. तिला मनात विचार आला,