चवळी - पालेभाजी

चवळी- पालेभाजी रेसिपीज इन मराठी
चवळी, या पालेभाजी चे विविध प्रकार

रोजच्या आहारात पालेभाजी आवश्यक आहे. पालेभाजीचा एक प्रकार म्हणजे चवळी. ही भाजी शरीराला अत्यंत पोषक असते. यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, आयरन ,कॅल्शियम हे शरीराला आवश्यक घटक भरपूर प्रमाणात असतात.

चवळीची सुकी भाजी
साहित्य
चवळीची एक जुडी किंवा एक पाव चवळी, दोन मोठे कांदे, दोन-तीन सुक्या मिरच्या, तेल, चवीप्रमाणे मीठ
कृती
प्रथम चवळीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घ्या. फक्त पानेच तोडायचे असल्यामुळे चिरायची ही गरज नाही. दोन कांदे लांबट चिरून घ्या. कढईत तेल घेऊन मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर कांदा, सुक्या मिरच्या व हळद घालून फोडणी तयार करा. त्यात चवळीची भाजी,मीठ घालून थोडा वेळ कढईवर झाकण ना ठेवता शिजू द्या. ही चवळीची सुकी भाजी गरमागरम चपाती किंवा भाकरी बरोबर खायला घ्या.

२) चवळी- चना डाळ भाजी
साहित्य
एक पाव चवळी भाजी, एक लहान वाटी चणाडाळ, दोन-तीन सुक्या मिरच्या किंवा चवीप्रमाणे तिखट, एक कांदा, तेल, मीठ, हळद.
कृती
चना डाळ धुवून दोन-तीन तास भिजू द्या. भाजी निवडून स्वच्छ धुवून घ्या. गॅसवर कढईत तेल घेऊन त्यात चिरलेला कांदा, सुक्या मिरच्या,हळद घालून फोडणी तयार करा. फोडणी झाली की त्यात डाळ टाकून शिजण्यासाठी त्यात थोडे पाणी घाला. डाळ मंद आचेवर थोडा वेळ शिजू द्या. डाळ थोडी शिजत आल्यावर त्यात भाजी घाला. चवीप्रमाणे मीठ घालून पाणी सुकेपर्यंत परत शिजू द्या. शिजली की लगेच गरमागरम भाकरी किंवा चपाती बरोबर खायला घ्या. ही भाजी सुद्धा खूप चविष्ट लागते.

चला तर मग वाट कसली बघताय. करा की रेसिपीला सुरुवात.

मस्त खा. स्वस्थ रहा. व्यस्त रहा.

सौ. रेखा देशमुख