चवळी- पालेभाजी

चवळी- पालेभाजी रेसिपीज इन मराठी
चवळी- पालेभाजी

चवळी- बटाटा भाजी
साहित्य
एक पाव चवळी भाजी, दोन मध्यम आकाराचे बटाटे, तीन-चार सुक्या लाल मिरच्या,एक कांदा, फोडणीसाठी तेल, हळद, चवीपुरते मीठ.
कृती
चवळी भाजी स्वच्छ धुऊन निवडून घ्या.बटाट्याची साल काढून त्याच्या पातळ फोडी करा. कढईत तेल, कांदा, सुक्या मिरचीचे तुकडे, हळद घालून फोडणी तयार करा. या फोडणीत बटाट्याच्या फोडी, चवळीची भाजी,मीठ घालून शिजू द्या, पाणी सुकेपर्यंत परतवत रहा. ही सुकी भाजी सुद्धा चपाती भाकरी सोबत छान लागते. प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता.

२) पॅटीस
साहित्य
एक पाव चवळीची भाजी, पाच-सहा ब्रेडच्या स्लाईस, दोन उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, अर्धी वाटी रवा, तेल, मीठ
कृती
ब्रेडच्या स्लाईस पाण्यात भिजवून पाणी काढून टाका. त्यात उकडलेले बटाटे, बारीक चिरलेली चवळीची भाजी, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, मीठ हे सर्व एकत्र करून चांगले मळून घ्या. त्याचे गोळे तयार करा. त्याला आकार देऊन रव्यावर थापून घ्या व तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या आणि हिरव्या चटणीवर सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला घ्या. लहान मुलांना सुद्धा हा पदार्थ खूप आवडतो.

मग वाट कसली बघताय. करा की रेसिपी ला सुरुवात

मस्त खा. स्वस्थ रहा. व्यस्त रहा.

सौ रेखा देशमुख