Login

चिजी बाईटस

खमंग मेजवानी
दिवाळी च्या या मुहूर्तावर मी एक वेगळा पदार्थ माझ्या सगळ्या वाचकांसाठी घेऊन आले आहे..... या वेळी घरातल्या लहान मुलांसाठी आपण दिवाळीच्या पदर्था मध्ये काही वेगळे पदार्थ बनवून बघुया........ जे खाऊन लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आनंद होइल...... चला तर मग सुरू करूया...........

साहित्य

१) १ कप. दूध
२) ३ चीज क्यूब
३) २ चमचा बटर
४) १ कप मैदा
५) चीली फ्लेक्स
६) ऑरगॅनो


कृती

सगळ्यात आधी एका पसरट पॅनमध्ये एक कप दूध गरम करण्यासाठी ठेवूया....... दूध गरम झाल्यावर त्यामध्ये दोन चमचे बटर घालूया........ त्याचबरोबर चीज चे क्युब दुधात टाकूया...... हे सर्व पदार्थ वितळेपर्यंत दूध कमी गॅस वर चमच्याने सतत ढवळत राहायचे........ सगळ वितल्यानंतर त्याच एक गाढ मिश्रण तयार होईल........ त्या मिश्रणामध्ये आपल्या आवडीनुसार चिली फ्लेक्स आणि ऑरर्गानो मिक्स करा........... आता गॅस बंद करून त्या मिश्रणात एक कप मैदा चमचाच्या सहाय्याने चांगला मिक्स करून घ्या....... पॅन थंड झाल्यानंतर तो मैदा त्या मिश्रणात व्यवस्थित मळून घ्या........ बघा असं पाणी टाकण्याची गरज पडणार नाही...... मळलेल्या पिठाचा व्यवस्थित गोळा बनवून घ्या.......

त्या पिठाची लाटण्याच्या सहाय्याने मोठी पोळी लाटून घ्या...... आता त्याचे शंकरपाळ्यासारखे कापे करा....... हि काप तेलामध्ये व्यवस्थित मध्यम आचेवर फ्राय करून घ्या........ तळलेली ही कापे थंड करून बंद डब्यामध्ये बरेच दिवस ठेवू शकता.........

ही काप चहाबरोबर किंवा छोट्या भुकेसाठी स्नॅक्स म्हणून लहान मुलांना आणि मोठ्या माणसांनाही खायला खूपच आवडतील............ चला तर मग लवकर ट्राय करून बघा आणि कशी झाली आहेत कमेंट्स करून कळवा...........


**********************************