Login

छंद जोपासणारी आठवण (सुखद आठवण)

सुखद आठवण!
#सुखदआठवण

छंद जोपासणारी आठवण (सुखद आठवण)

काही व्यक्ती खूप खास असतात. अगदी दररोज जरी आपल्याला ती भेटत नसली तरी त्यांच्यासोबत असलेल्या नात्यांचा सुगंध नेहमी आयुष्यात दरवळत राहतो. माझी मैत्रीण आणि मी मागच्या वर्षी एका ठिकाणी भेटण्याचे ठरवले होते. शाळेपासूनची आमची मैत्री ते आजपर्यंत तशीच आहे देव करो पुढेही तशीच राहावी.

शाळेमध्ये एकाच बाकावर बसणाऱ्या आम्ही नंतर महाविद्यालय आणि पदवीच्या शिक्षणासाठी वेगळे क्षेत्र निवडल्याने थोडे दूर झालो शरीराने बरं का, मनाने मात्र नेहमी सोबतच.

आयुष्याच्या प्रवासात एका महत्त्वाच्या टप्प्यावर माझी मैत्रीण वाटचाल करणार होती. खूप काही गोष्टींची आठवण आणि शाळेतले किस्से आठवून शेवटी आम्ही पोहोचलो ते पुस्तकांच्या दुकानात. बाहेरचे धावपळीचे जग पण तिथे गेल्यावर जो शांतपणा होता ना काय सांगावे त्याबद्दल फक्त पुस्तकांची पाने उलगडताना होणारा आवाज आणि पुस्तक विकत घेत असू तर त्याबद्दल माहिती देताना होणारे बोलणे एवढेच काय ऐकू येत होते.

सुखद धक्का काय असतो तर माझ्या मैत्रिणीने मी जेवढी पुस्तके घेतली त्याचे सर्व पैसे तिने दिले. तिला विचारल्यावर मला समजले की, ही माझ्या वाढदिवसाची भेट आणि जेव्हा कधी ती पुस्तके वाचेन ना तेव्हा नकळत तिची आठवण येईल. म्हणजे किती विचारपूर्वक तिने मला पुस्तकांचा खजिना दिला होता. वाचनाचा छंद अशाने जपला जाणार होताच आणि शेवटी मला लिखाणात त्याचा उपयोग होईल हा तिचा दूरदृष्टीचा विचार आश्चर्यचकित करणारा होता. आजही पुस्तके वाचतांना खरचं तिची आठवण मला येते.

लेखन :- © विद्या कुंभार.

सर्व लेखनाचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.