Login

छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज
शीर्षक:- छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा


शिवनेरीवर जन्माला आले
शिवबांसारखे अनमोल रत्न
त्यांनी स्वराज्यासाठी सदैव
केले जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

जिजाऊंची शिकवण
परस्त्रीचा राखला मान
नेहमी दूरदृष्टीचे लढाईत
दाखवले त्यांनी ज्ञान

केली गनिमी काव्याने
शत्रूंवर खडतर चढाई
मावळ्यांच्या साथीने
जिंकल्या कठीण लढाई

छत्रपती महाराजांची कीर्ती
वर्णावी सांगा किती?
इतिहासाच्या पानातून
समजे त्यांची युद्धांची नीती

असा पराक्रमी राजा
पुन्हा होणार नाही
त्यांच्या वीर गाथेमधून
शिकण्यासारखे खूप काही

रयतेचे शिवाजीमहाराज राजे
आजही आहेत प्रेरणेचे स्थान
छत्रपतींना स्मरण करूनी
गावूया त्यांच्या शौर्याचे गान

© विद्या कुंभार

(खरं तर छ्त्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढे लिहू तितके कमी आहे. तरी कवितेतून लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे.)

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.


फोटो सौजन्य साभार गुगल
0

🎭 Series Post

View all