Login

छत्रपती शिवाजी महाराज कविता

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल वर्णन करणारी प्रेरणादायी कविता..!
छत्रपती शिवाजी महाराज 


छत्रपती शिवाजी महाराजांचे 
न्यायाचे हिंदवी स्वराज्य 
प्रजेच्या कल्याणासाठी 
स्वराज्य स्थापनेचे केले कार्य 

सर्व जाती धर्मांच्या होते 
कल्याणकारी स्वराज्य
राजवटी बद्दल इतिहासात 
प्रसिद्ध महाराष्ट्र राज्य 

शिवरायांनी सिंधुदुर्ग 
विजयदुर्ग समुद्रकिल्ले बांधले 
गुप्तहेर खात्याचा प्रमुख
बहिर्जी नाईक यांना केले 

स्वराज्याचा खजिना होता 
द्रव्याने सतत भरलेला 
पायदळाच्या प्रमुखाला
सरनोबत नावे गौरवलेला 

शिवरायांनी राजधानीसाठी 
रायगडाची निवड केली 
1674 ला शिवरायांच्या
राज्याभिषेकाची तारीख ठरली 

शिवरायांनी आपल्या प्रजेवर 
मातेसारखी माया केली 
फितुरी पासून राज्याला धोका 
होऊ नये ही खबरदारी घेतली 

शिवरायांनी गनिमी काव्याने 
प्रचंड फौजेचा धुव्वा उघडवला 
मुत्सदद्रेगिरीच्या जोरावर 
हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोवला 

©® चैताली वरघट 
मूर्तिजापूर, जि अकोला 

0

🎭 Series Post

View all