Login

छिछोरे एक प्रेरणादायी चित्रपट

चित्रपट मालिका हे नुसते मनोरंजनाचे साधन नसतात तर त्यातुन आपल्याला खुप काही शिकायला मिळते.फक्??

                   मी पाहिलेला एक प्रेरणादायी चित्रपट छिछोरे

       असे म्हटले जाते की चित्रपट,मालिका हे निव्वळ मनोरंजनाची साधने,माध्यमे असतात.काल्पणिक असतात त्यांचा वास्तव जीवनाशी काहीही संबंध नसतो.तसे ते प्रदर्शित करत असताना खाली दिलेही जाते की याचा वास्तव जीवणाशी कोणताच संबंध नाही.अणि तसे झाले तर तो निव्वळ योगायोग समजावा.पण त्या कल्पणेलाही कुठेतरी वास्तवाची झालर लावलेली असतेच.अणि वास्तविक जीवनात आपण जे जगतो जे अनुभवतो त्याचेच प्रतिबिंब हया चित्रपट,मालिकांमध्ये आपणास पाहायला मिळते.तसाच एक चित्रपट म्हणजे छिछोरे.लेखकाने खुप छान पदधतीने कथेची रचना केली आहे.

     चित्रपटामध्ये थोडया अश्लिल शब्दांचाही वापर केला गेला आहे.कदाचित हयामुळेच युटयुबवरून हा चित्रपट काढुन टाकण्यात आला आहे.पण ती एक गोष्ट वगळली तर चित्रपट खुप छान आहे.अणि कोणत्या गोष्टीतुन काय घ्यायचे काय नाही घ्यायचे हे आपल्याला चांगलेच कळते.आपण सज्ञान आहोत.अणि ते म्हणतात ना वाईटातूनही चांगले घेता येते.फक्त आपली निरीक्षण शक्ती ही तिक्ष्ण असायला हवी.

             अणि हेच गुण एका परिक्षकामध्ये समीक्षकामध्ये,निरीक्षकामध्ये,संशोधकामध्ये आपणास मुख्त करुन पाहायला मिळतात.अणि त्याने ते स्वताच्या अंगी रुजवणेही फार गरजेचे आहे.म्हणुन वाईट सोडायचे अणि चांगले घ्यायचे.

      हया चित्रपटात लेखकाने खुप महत्वाचे मुददे मांडले आहेत.जसे की :

१) जेव्हा जिंकण्यासाठी आपली स्वताची शक्ती कमी पडते तेव्हा आपल्या प्रतिस्पर्धीची शक्ती कमी करावी त्याला कमजोर पाडावे हे हया चित्रपटातुन शिकायला मिळते.म्हणजे जिथे आपली शक्ती कमी पडते तिथे युक्ती वापरावी अणि आपल्या प्रतिस्पर्ध्याची शक्ती कमी करावी हे यातुन शिकायला मिळते.

2)काहीतरी गमावण्याची भीती ही काहीतरी मिळविण्यासाठी प्रेरणा निर्माण करते(प्रेरक ठरते).

3)कधी कधी खोटा सिक्का पण कामाला येतो फक्त त्याचा वापर कुठे अणि केव्हा करायचा याचे आपल्याला ज्ञान असणे आवश्यक आहे.

4)वेदना आपल्याला तेव्हाच वेदना देतात जेव्हा आपण वेदनेला आपल्याला वेदना देण्याची परवानगी देत असतो.

5)यश मिळविल्यानंतर काय करायचे याचे वेळापत्रक कल्पणा सगळयांनी आखून ठेवलेल्या असतात पण अपयशी झाल्यानंतर काय करायचे याचा विचार कोणी करतच नाही.हा एक फार महत्वाचा प्रश्न लेखकाने चित्रपटादवारे मांडला आहे.

6)आपण यश आणि अपयश जिंकणे हारणे याच्यात इतके गुंतत चाललो आहे की आपण आपले आयुष्य जगणेच विसरून चाललो आहे.

7)आयुष्यात जर सगळयात महत्वाचे काही आहे तर ते म्हणजे आपले आयुष्य कारण आज अपयश आले आहे तर उदया यश हे मिळणारच आहे पण आयुष्य जर हातातुन एकदा निघुन गेले तर मग ते पुन्हा मिळणार नाही.म्हणुन अपयश आले म्हणून आपले किंमती आयुष्य संपवू नये.यश अणि अपयश हया क्षणिक गोष्टी आहेत चिरंतन काही आहे तर ते आपले आयुष्य जगणेच.

                 अशाप्रकारे मला हया चित्रपटातुन खुप काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या.हयापेक्षाही खुप जास्त काही शिकण्यासारखे आहे हया चित्रपटातुन फक्त वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करुन ते आपल्याला शिकता आले पाहिजे.

       सांगण्याचे तात्पर्य ऐवढेच आहे की मनात शिकण्याची जर ईच्छा असेल ना तर पुस्तके न वाचताही आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. फक्त अंगी शिकण्याची आवड, जिदद,चिकाटी तीक्ष्ण निरीक्षण शक्ती अणि संशोधक प्रवृत्ती असायला हवी.

                                           - योगेश सोनवणे 

0