विषय:- प्रेम कथा
कवितेचे नाव:- चिंब भिजलेले भाग 2
हेय.....मधु......माय डार्लिंग....उम्मम्मा... ऐश्वर्या मधूचे दोन्ही खांदे पकडून तिच्यासोबत एक गिरकी घेते आणि तिच्या गालावर किस करते.
अगं हो हो....काय झालं तरी काय एवढं? आज स्वारी खूपचं खुशीत दिसते.
हो आहेच मी खुश! दोन दिवसात मी बेंगलोरला जाणार आहे. नवीन टेंडर च्या मिटिंगसाठी माझं नाव सुचवलं आहे. यार....ही मिटिंग खूप महत्त्वाची आहे बघ.. जर का ही मिटिंग सक्सेस झाली ना तर.... अपनी तो लाईफ सेट हे बॉस...ऐश्वर्या धपकन सोफ्यावर आदळतचं बोलली.
खरचं....थांब आलेच मी...मधु किचनमध्ये जाऊन साखर आणते आणि ती देवाजवळ ठेऊन हात जोडते.
देवा माझ्या लाडक्या मैत्रिणीला हवी ती सगळी सुखं मिळो, आणि तिच्या नव्या कामामध्ये तिला भरभरून यश मिळो.असाच तिच्या पाठीशी रहा. तुझी कृपा दृष्टी कायम तिच्यावर असुदे आणि आतातरी तिचा बलिशपणा थोडा कमी कर रे बाबा! मधु कान्या डोळ्याने तिच्याकडे बघत म्हणते.
देवा माझ्या लाडक्या मैत्रिणीला हवी ती सगळी सुखं मिळो, आणि तिच्या नव्या कामामध्ये तिला भरभरून यश मिळो.असाच तिच्या पाठीशी रहा. तुझी कृपा दृष्टी कायम तिच्यावर असुदे आणि आतातरी तिचा बलिशपणा थोडा कमी कर रे बाबा! मधु कान्या डोळ्याने तिच्याकडे बघत म्हणते.
माझा बलिशपणा मुळीच कमी होणार नाही समजलं.... ऐश्वर्या पाठीकडून दोन्ही हात तिच्या मानेभोवती गुंफत बोलते.
बर बाई... नको करू कमी. मधु तिचे हात पकडून हलकेच स्वतःचे डोके तिच्या डोक्यावर आपटते.
बर चल मी निघते कारण मला खुप तयारी करायची आहे घरी जाऊन.
हो, सावकाश जा... अस म्हणून मधु तिला बाय करते आणि पटकन तिला काहीतरी आठवत आणि ती पुन्हा ऐश्वर्याला आवाज देते. अगं थांब..
आता काय?
तुझा डब्बा! यात तुझ्या आवडीचे मेथीचे लाडू आहेत घरच्या तुपातले अगदी तुला आवडतात तसे सुका मेवा टाकून बनवले आहेत. मधु लाडवांचा डब्बा तिच्या हातात देत बोलते.
ओहो....थँक्स यार....उममम्मा... ऐश्वर्या तिच्या गालाची मोठीशी पप्पी घेते आणि लागलीच तिच्या स्कुटीला चालु करून वाऱ्यासारखी उडते सुद्धा..
ही मुलगी पण ना... वादळ आहे.
****************
अरे प्रत्या...काम झालं का नाही?
अगंहो माझे आईशी..जरा दम धर. एक तर जाडजुड वही आणून दिली आहेस हातात ती टायपायला थोडा वेळ लागणारच ना?
हा ठीक आहे पण जरा भर भर.
मला एक सांग ही वही तू चोरली कशी गं?
ए.... चोरली बिरली नाही हं... लपवून आणली आहे ते ही तिच्या समोरून.
अगं पण लपून घेऊन येणं म्हणजे चोरी..
हे बघ तू सी आय डी नाहीस त्यामुळे चोर पोलीसचा खेळ बंद कर आणि सांगितलं आहे ते काम पटपट कर समजलं. उगा डोक्याची वाट लाऊ नको.
बर बर... दोन दिवसात काम पूर्ण होईल.
हम्मम ठीक आहे.
**************
आज आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे फोन करून घ्या.
ते तू मला सांगायची गरज नाही.
ठीक आहे.
ठीक आहे म्हणजे?
ठीक आहे म्हणजे ठीक आहे.. तुम्हाला माझी गरज होती गावची प्रॉपर्टी हवी होती म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलंत आणि व्हील वर भावी नात आणि नातू बद्दल वाचल्यावर तुम्ही लाथाडलतं मला. गावाच्या इस्टेटीसाठी माझ्याशी शारीरिक संबंद ठेवायला सुद्धा तयार झालात पण मी एवढी मूर्ख नाही.
जास्त बोलतेस तू.
उलट हे आधीच बोलायला हवं होतं पण माझ्या सासू सासऱ्यांसाठी गप्प बसून तुमची ही थेर... निमूटपणे सहन करते. तुमची ही अय्याशी आईबाबांना सांगितली ना तर सगळ्यांतून बेदखल करतील हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. हो ना?
मधु..तिच्यावर ओरडून तो हात उचलतो तशी ती तिच्या उजव्यां हाताने त्याच मनगट घट्ट पकडते.
अनिकेत.....जरा सांभाळून! मी बायको असली तरी ते फक्त जगासाठी.. माझ्यावर नवऱ्याचा अधिकार नाही गाजवायचा हां... ही..ही आहे ना तिच्यावर सगळे हक्क आणि अधिकार गाजवायचे... आज हात उचलून चूक केलात पुन्हा जर अस झालं तर हात मुळासकट उपटून टाकेन. लक्षात ठेवा. मधु अजूनपर्यंत घट्ट पकडून ठेवलेलं त्याच मनगट हवेत झिडकारते.
मधुचं बदलेल रूप पाहून तो जरा घाबरलाचं पण तरी त्याचा अहंकार त्याला गप्प बसू देत नव्हता.
तुझी एवढी हिम्मत की तू माझा हात झिडकारलास?
ऑफिसमधून गडबडीत निघालेली ऐश्वर्या मधूच्या घरीचं धडकते आणि दारातूनच ती हा सगळा प्रकार पाहत असते तिला मधूचा फार अभिमान वाटतो म्हणून ती दारातुनचं टाळ्या वाजवत आत येते.
वाह मधु.. वाह! ये हुई ना बात! अगं राणी..हेच तू आधी करायला हवं होतंस म्हणजे अक्कल आणि डोकं दोन्ही ठिकाणावर आली असती.
ए...आम्हा नवरा बायको मध्ये बोलायच नाही समजलं ना?
कोण नवरा बायको? मधु चिडूनच विचारते.
तसा तो गप्प बसतो आणि मोर्चा ऐश्वर्या कडे वळवतो.
ही तुझी मैत्रिण आहे ना.. हिने तुला चढवलं आहे तुझे कान भरले आहेत. ती जस बोलते तस तू वागतेस.
पहिली गोष्ट असल्या फालतू गोष्टी बोलायच्या नाहीत आणि दुसरी गोष्ट माझी मैत्रीण तुमच्या मैत्रिणी इतकी खालच्या पातळीची नाही आणि आता विषय वाढवण्यापेक्षा शांत रहा उगाच माझं डोकं गरम करू नका आणि मला तोंड उघडायला पण लाऊ नका नाहीतर तुमची ही मैत्रीण पण हातून निसटायची.
अनिकेत रागारागात त्याच्या खोलीत निघून गेला.
काय गं तू अशी अचानक?
मी सांगून येतेच कधी? अस म्हणून ऐश्वर्या जोरजोरात खिदळते.
हो, ते ही आहेच म्हणा! बरं चल बस. मी गरम गरम थालीपीठ देते.
अगं नको, मी आत्ताच पिझ्झा खाऊन आले.
काय गं हे? इतक्या सकाळी या असल्या गोष्टी खाणं बरं नाही गं!
अगं बर झालं खाऊन आले नाहीतर तुझं हे रूप पाहून चक्कर आली असती मला.
तू बरोबर बोलत होतीस. मी गप्प राहून सगळ्या गोष्टींना खत पाणी दिलं.
तू स्वतःला दोष देऊ नको. मी अनिकेतला तुझ्या पेक्षा जास्त ओळखते मित्र आहे तो माझा म्हणजे होता. पैशांसाठी त्याने काय काय केलं आहे हे मला चांगलं माहीत आहे पण मला आनंद आहे की तू मला मैत्रीण म्हणून भेटलीस. अनिकेतच नशीब खराब आहे की त्याला तुझं प्रेम सांभाळता नाही आलं. खूप कमनशिबी आहे तो सगळ्याच बाबतीत. पैशापाई खूप चुकीच्या गोष्टी केल्या आहेत त्याने.
जाऊदे ना आता तो विषय. थांब आईंना फोन लावते मगाशी केला होता पण त्या कामात होत्या म्हणून नीटसं बोलता नाही आलं.
क्रमशः...
श्रावणी लोखंडे
जिल्हा- पालघर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा