चिमणी दिवस ©®विवेक चंद्रकांत...
ती होतीच लक्ष वेधून घेणारी.. निरागस, छोट्या चणीची, असेल साताठ वर्षाची. भेटली की खूप बडबड करायची. तिला ओळख वगैरे लागत नसे. माझ्या बिल्डिंगच्या बाजूलाच नवीन बिल्डिंगचे काम चालू होते. तिथे खोपटे होते वॉचमनचे. त्याची मुलगी.
मी ऑफिसमधून आलो की लगेच बिनधास्त माझ्या घरी यायची. हक्काचे चॉकलेट किंवा बिस्कीट घ्यायची. हसतांना गोड खळी पडायची गालावर तिच्या. वजनाला हलकी, नाजूक चेहरा आणि सतत चिवचिव करायची म्हणून तिला लाडाने चिमणी म्हणायचो मी. होतीच तशी गोड.दोनेक वर्ष काम चालले तोपर्यंत खूप जीव लावला चिमणीने. पण बिल्डिंग तयार झाली तसे दुसरीकडे जावेच लागते. ती गेली तेव्हा आम्हा दोघां नवराबायकोच्या डोळ्यात पाणी आले. पुढे कधीतरी आठवण यायची.

मध्यंतरी एकदा स्टेशन वर भेट झाली त्या कुटुंबाची... त्यावेळी दहा वर्षाची असेल चिमणी पण लगेच ओळखले. तिथून रेल्वे स्टॉल वरूनच बिस्कीटचा पुडा घेऊन दिला तिला. पण तेव्हा जेमतेम दहा पंधरा मिनिटाचीच भेट. बरे या लोकांचा निश्चित पत्ता नाही. आज इथे तर उद्या तिथे....
नंतर दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली. एकदा काही कामानिमित्त ऑफिस च्या मागे गेलो तर तिथे एका मोठया बिल्डिंग चे काम चालू होते. वॉचमन ची झोपडी होती. सहज नजर टाकली तर चिमणीचा बाप दिसला. खूप आनंद झाला. त्याला हाक मारली तसा धावत आला. दोन मिनिटांनी त्यालाही ओळख पटली.मग विचारलेच त्याला
"चिमणी कुठे आहे.?"
त्याचा चेहरा उतरलाच.
"आहे घरीच आहे."
"मग बोलाव ना तिला.. किती वर्षे झाली भेटली नाही."
"नाही भेटणार साहेब. आता घराबाहेर जात नाही."
"का काय झाले?"
" 16- 17 वर्षाची झाली आणि एका मुलाबरोबर पळून गेली होती साहेब. "
बापरे! माझ्याकडून चॉकलेट, बिस्कीट मागणारी चिमणी एवढी मोठी झाली?
"मग?" मी काळजीने विचारले.
"मग काय? वापरून सोडून दिली. आता आली परत. चार महिने झाले.. घरात असते."
"Police case?"
"केली ना साहेब.पण पोराचा काही ठाव ठीकाणा नाही.आईवडील गावाकड असतात त्याचे. "
"मी भेटू का तिला? समजूत घालतो."
"नको साहेब. ती कोणाशी बोलत नाही. आणि बोलली तर वाईट बोलते. तुमचा अपमान नको व्हायला... जा तुम्ही."
"जातो. पण तिला सांग, काकाकाकुनां तुला पाहायचंय, भेटायचंय. जातो मी."
हळहळत मी घरी आलो. पत्नीला सगळे सांगितले.
ती म्हणाली "मी भेटते तिला "
पण ती वेळच आली नाही.
हळहळत मी घरी आलो. पत्नीला सगळे सांगितले.
ती म्हणाली "मी भेटते तिला "
पण ती वेळच आली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर एक काळी सावळी तरुणी दरवाज्यात उभी. मळकट पंजाबी, कृष शरीर,ओढलेला थकलेला चेहरा. जणू खूप काही दुःख पाहिल्यासारखा.
"कोण तू? काय हवे?"
"ओळखलं नाही काका. मी चिमणी."
"काय? " मी ओरडलोच. " ये आत ये. "
ती दबकत आत आली. पत्नीही कोण आले म्हणून बाहेर आली, तिने मात्र लगेचच ओळखले.
"अग बाई चिमणी तू? केवढी खराब झालीस."
चिमणी काकूला बघून एकदम भावुक झाली आणि तिने हिला मिठीच मारली. तिला थोपटत हिने मला पाणी आणण्याची खूण केली. मी पटकन पाणी आणायला गेलो.
पाणी पिऊन झाल्यावर आणि थोडया भावना आवरल्यावर दोघी जणी गप्पा मारत बसल्या. चिमणीला ऑकवर्ड वाटू नये म्हणून मी आतमध्ये येऊन चहा ठेवला.थोडया वेळाने पत्नी आत येऊन म्हणाली
"उद्यापासून चिमणी आपल्याकडे कामाला येणार आहे. झाडझूड,साफसफाई आणि पोते. जमल्यास भांडीही."

मी आश्चर्याने म्हणालो
"अग पण कामच किती आहे आपल्या घरात? इनमीन दोन जण. आतापर्यंत तर आपण दोघेच करत होतो. शिवाय तीचे काम कसे माहित नाही."
"अग पण कामच किती आहे आपल्या घरात? इनमीन दोन जण. आतापर्यंत तर आपण दोघेच करत होतो. शिवाय तीचे काम कसे माहित नाही."
पत्नी माझ्याकडे "अगदीच कसे काही समजत नाही " या अर्थाने पाहत म्हणाली.
"काम हे निमित्त... त्यानिमित्ताने ती बाहेर पडेल. मोकळी होईल. तिच्या कोशातून बाहेर येईल. फार भोगलंय हो पोरीने."
चहा घेतल्यावर चिमणीने पटकन कपबशा उचलल्या आणि सिंकमध्ये धुऊन ठेवल्या. मग ओढणीला हात पुसत ती म्हणाली
"येते काका."
चहा घेतल्यावर चिमणीने पटकन कपबशा उचलल्या आणि सिंकमध्ये धुऊन ठेवल्या. मग ओढणीला हात पुसत ती म्हणाली
"येते काका."
"थांब." मी म्हणालो.पटकन आत जाऊन मी बिस्कीटाचा पुडा आणून तिच्या हातात ठेवला.
"काका...",, तिने रडत रडत मला मिठी मारली.
तिच्या पाठीवर हात फिरवत मी मनात म्हणालो
", चिमण्या अशाही कमी होतं चालल्या आहेत. त्यांचे संवर्धन व्हायलंच हवे."
डॉ. विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.