Login

चित्र आयुष्याचे

एका गृहिणी च्या स्वप्नांची कथा
फेरी - "राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

विषय - स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असत का हो ?

कथेच नाव - चित्र आयुष्याचे

          संध्याकाळचे साडेसहा वाजले , अंजुच लक्ष सारख त्या घड्याळ्याच्या काट्याकडे जात होत .

तेवढ्यात दारावरची बेल वाजली . आरश्यासमोर तयार होत असणारी अंजु लगबगीने हॉल मध्ये आली , तिने हसतमुखाने दरवाजा उघडला .
समोर अपेक्षे प्रमाणे तिचा नवरा रवीच होता .
रवी यायच्या वेळेला अंजु रोज नीटनेटकी तयार होऊन , हसतमुखाने त्याचे स्वागत करायची .
कारण लग्न झाल्यावर तिच्या आईने तिला तसेच करायला सांगितले होते .
\"नवरा कामावरून दमुन आला की समोर बायकोचे रुप बघून तो त्याचा दिवसभराचा सगळा ताण विसरून जातो .\"

     म्हणून आज त्यांच्या लग्नाला बारा वर्ष झाली तरी तिचा हा नियम ती नेहमी न चुकता पाळायचा प्रयत्न करायची .

तिने दरवाजा उघडताच रवी आपल्या हातातील बॅग तिच्या हात देत म्हणाला , " माझ्यासाठी चहा कर मस्त , मी आलोच फ्रेश होऊन. "
रुममध्ये जाता जाता बोलला , " सारंग कुठे आहे ."

" तो त्याच्या ड्रॉईंगच्या क्लासला गेला आहे ".  

     त्याच्या एका नजरेसाठी तिथे थांबलेली ती . पण तो तर केव्हाच रुममध्ये निघून गेला होता . हल्ली आता हे रोजच झाल होत . पण अंजु कोणीतीच तक्रार न करता आपला रोजचा नियम पाळायची .

     तिच्या हातातील रवीची बॅग सोफ्यावर ठेवत , काही न बोलता ती देखील किचनमध्ये निघून गेली .

आत जाऊन तिने रवीला आवडतो असा आलं घालून चहा करायला ठेवला . ती चहाला उकळी यायची वाट बघत होती . तेव्हा तिची नजर खिडकीजवळ लावलेल्या एका फ्रेम वर खिळली .

भूतकाळ -

"अंजु तुझ्या हातात तर जादू आहे ग , किती मस्त चित्र रेखाटले आहेस तु . अस वाटतय की , जणु खरच जिवंत निर्सगच माझ्या समोर आहे ," रवी अंजुच्या चित्राची स्तुती करत म्हणाला .

" रवी , मला चित्र काढायची खूप आवडत आहे . पण बाबांना मी चित्र काढलेल आवडत नाही . तुम्ही मला काढू द्याल ना ...! "

" हो , का नाही . मी तुझ्या करिअर मध्ये कधीच अडथळा बनणार नाही . त्या उलट कायम तुला साथ देईन . कारण कलेला कधीच रोखून धरु नये ."

   " अंजु ए अंजु ", तेवढ्यात रवीचा हॉल मधून आवाज आला .
पण कानांवर बाहेरचे आवाज येण्यासाठी  वर्तमान काळात असाव लागत . पण अंजु तर अंतर्मनात सलणाऱ्या भूतकाळाच्या आठवणीत गेली होती . ती सल तिला अजूनही टोचत होती .

   तशी अंजु भुतकाळातुन बाहेर आली , पण तोवर मंद आचेवर ठेवलेला चहा कधीच आटून गेला होता . करपलेल्या पातेल्याचा करपट वास झर्कन तिच्या नाकात गेला आणि ती भानावर आली .

दु:खरी सल मनात वर्षानुवर्षे असली की खऱ्या आयुष्यातही ते अदृश्य दुःख घेऊन वावरावे लागते . नाईलाजाने मौन पांघरूण आपले दु:ख मनातच साठवावे लागते असच काहीस झाल होत अंजुच पण ....

अंजूने चहाचे दुसरे पातेले गॅसवर चढवले . रवीच्या हाकेला ओ देत अंजू म्हणाली , "पाच मिनिट, आणते चहा ."

"लक्ष कुठे असते ग तुझे . कितीवेळ झाला आवाज देतोय तुला . दिवसभर घरात बसून तुझं डोकं चालेना वाटत . जरा भानावर राहत जा .” रवी बडबड करत असताना अंजू चहा घेऊन आली .

चहाचा एक घोट घेत रवी शांत झाला .

” तुझ्यासारखा चहा कुणी बनवूच शकत नाही .”
अंजु औपचारिकतेने हसली . आणि चहाचा एक घोट घेत दिवसभर वाचून चुरगळलेल्या पेपरची घडी करू लागली .

तेवढ्यात त्याच्या खाली असणाऱ्या कागदावर अंजुने रेखाटलेली कलाकृती त्याच्या नजरेस पडली .

” अंजु अजूनही तु चित्र काढतेस का ?”
एकाच घरात राहून आपल्याच नवऱ्याला आपल्याबद्दल काही माहीत नाही म्हणून तिला वाईट वाटले होते .

” कधीतरी , मनापासून इच्छा झाली की कोऱ्या कागदावर काही तरी काढते . ” तिने उदासीनतेने उत्तर दिले .

” पूर्वीसारखं आता चित्र काढायला जमत नसेल ना ." रवी .

हो ना , आधी बाबांची भीती होती . पण नंतर वाटल होत मला संधी मिळेल पण छे , काहीच झाल नाही . ती उपहासाने पणे म्हणाली .

" तेव्हा तुझं वय आयुष्याच्या एका छान वळवणाचा अनुभव घेत होते . आता संसार म्हटलं की विचारांना तितकीशी गती मिळत नसेल ना रेखाटण्यासाठी ." रवी च्या बोलण्यावर अंजु कुत्सितपणे हसली .

" चित्र रेखाटताना त्यात कल्पना नाही , तर हातात कला लागते ओ , पण सत्यात मात्र ते घडत नाही . कारण मला तेवढी मोकळीक नाहीय ना ."
डोळ्यातील पाणी पुसत अंजु बोलली .

” काल्पनिक लिखाणाच्या प्रेमात पडणं सोपं असते . खरे बोल टोचतात ."

डोळ्यांत आलेलं पाणी त्याच्या नकळत पुसत अंजु पुढे म्हणाली ,

” मघाशी म्हणाला होतात ना , ” तुझं लक्ष कुठं असतं . तर रवी माझं लक्ष या संसारातच आहे . पण खरं तर , तुमचंच लक्ष कुठेच नसते . "

"आज इतक्या वर्षांनंतर हे स्केच बघून , मी चित्र काढायचे हे तुम्हाला आठवलं . तुम्ही हे विसरलात हेच माझ्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे .” अंजु

खरंच माझं मन कळत नाही का ह्यांना ?
मला करायला आवडणारी \" चित्रकला \" ही एकमेव गोष्ट मी कशी विसरेन बरं .
पुरुषांना बाईच मन कधी कळलंच नाही .
स्त्रियांना समजून घेणं खरंच कठीण असतं का हो ?

तेवढ्यात सारंग बाहेर चप्पल  काढत आनंदात "आई ...आई” म्हणत त्यांच्याजवळ आला .

” आई , तू काढलेली सगळी चित्र सरांना खूपच आवडली .”

सातवीत शिकणारा सारंग आनंदाने आईच्या कुशीत शिरत म्हणाला .

"बाबा , तुम्ही पण बघा . ही आईने काढलेली चित्र ", म्हणत सारंगने आपल्या दप्तरातील ड्रॉइंग बुक रवीच्या हातात सोपवली .

त्यातील चित्र बघून रवी अचंबित झाला . त्याच्या अपेक्षा पेक्षा खूप परिपुर्ण चित्र अंजुने त्या वहीत काढली होती .

"बाबा बघ ना , आईच्या हातात किती मस्त जादु आहे ना चित्र काढायची . तुला माहीत आहे का सर काय म्हणाले ." सांरग हसत बोलला.

"काय म्हणाले रे तुझे सर ." रवी .

" ते विचारत होते की, त्याच्या ड्रॉइंग क्लासच्या एक्सिबिशन साठी आई चित्र काढुन देईल का ??" सारंग

"आई तू हो म्हण ना , सगळ्यांना कळु दे की , माझी आई किती छान चित्र काढते . तिच्या हातात किती मस्त जादु आहे ." ,सारंग अंजु कडे हट्ट करत म्हणाला .

सारंग अस म्हटलावर ती हसली . आणि त्यावेळी रवी मात्र अपराधी नजरेने पण तितक्याच आनंदाने अंजु कडे बघत होता .

पण अंजुच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेच भाव नव्हते .

अमृता कुलकर्णी
जिल्हा - सातारा , सांगलीफेरी - "राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

जिल्हा - सातारा , सांगली