#अनुभव
चोर ss चोर
©® सौ.हेमा पाटील.
हा माझ्या आयुष्यात आलेला अनुभव मी कधीच विसरू शकत नाही.हा अनुभव वाचताना नक्कीच थरारक वाटेल.
माझे यजमान शिक्षक असल्याने आमची बदली तेव्हा वाईला झाली होती.मी वाई नगरपरिषदेत शिवणक्लास घेत असे.मुलगी स्वप्नाली तेव्हा बारावीला होती.दोन हजार सालची गोष्ट आहे ही! तिला गणिताचा खाजगी क्लास लावला होता.
तिच्या सरांनी भेटायला बोलावले आहे असा कन्येकरवी निरोप दिला होता.संध्याकाळी यजमान आल्यावर आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो.कन्या नुकतीच घरी आली होती.चिरंजीव मित्रांसोबत खेळायला गेला होता.कन्या आल्याने मी कपाटातून साडी काढली.कपाटाला किल्ली तशीच अडकवलेली होती.अर्ध्या तासात परत यायचे म्हणून कपाट लाॅक केले नाही.आम्ही दोघे गेटच्या बाहेर पडलो.
बैठा बंगला होता तो! मागील बाजूस आमच्या दोन रुम होत्या.आमच्या दोन्ही रुमची दारे बाहेरच्या पॅसेजमध्ये उघडत होती.तसेच दोन्ही रुममधून इकडेतिकडे जाण्यासाठी आतून मधल्या भिंतीला एक दार होते.तिथून कन्या आत किचनमध्ये गेली. जाताना हाॅलचे दार तिने लावले नाही.कारण पाणी पिऊन लगेच ती परत हाॅलमध्येच येणार होती.

तिने फिल्टरच्या नळाखाली ग्लास ठेवला व नळ सुरू केला.तो ग्लास भरण्यापूर्वीच तिला कपाटाचे दार उघडताना कपाटाच्या दाराला अडकवलेली चावी कपाटाला थटल्याने येणारा आवाज आला.तिचे कान पूर्वीपासूनच फार तीक्ष्ण आहेत. तिला वाटले, आत्ता तर मम्मी पप्पा गेलेत.त्यांना यायला एक तास तरी लागेल.बरं स्वप्नील खेळून आला तरी आल्याआल्या कपाटाकडे कशाला जाईल? म्हणून तिने पाण्याचा नळ बंद केला. पाणी प्यायचे सोडून ती मधल्या दरवाजाजवळ आली.
पहाते तो काय ! तोंडाला व कानांना रुमाल बांधलेला एक इसम कपाटापाशी पाठमोरा उभा होता.त्याने कपाटाचे दार उघडले होते व आतल्या लाॅकरची चावी तो आत शोधत होता.हे पाहून तिच्या लक्षात आले की आपल्या घरात चोर शिरला आहे...
प्रसंगावधान दाखवून ती अजिबात पाय न वाजवता किचनकट्ट्यापाशी परत गेली.तेथील चटणीची बरणी उघडून तिने मूठभर चटणी घेतली व पायांचा अजिबात आवाज न करता ती हळूहळू कपाटापाशी पोहोचली.

एव्हाना त्या चोराला आत शोधाशोध केल्यावर लाॅकरची चावी सापडली होती.ती त्याने लाॅकरला लावली आणि लाॅकरचा खटका फिरवला,त्याच क्षणी स्वप्नाली तिथे पोहोचली होती.तिने पाहिले की आता चोर लाॅकर उघडायच्या तयारीत आहे त्यामुळे पटकन पुढे होण्यासाठी तिने पाऊल पुढे टाकले पण तिथे असणाऱ्या बेडला ती थटली.थोडासा आवाज झाला.
चोर आता आनंदित झाला असणार, तेवढ्यात मागे झालेल्या आवाजाने तो दचकला व त्याने मागे वळून पाहिले.आपल्यापासून फूटभर अंतरावर उभ्या असलेल्या स्वप्नालीला पाहून तो चक्रावला.त्याने अर्थातच आधीच रेकी केलेली असणार! आम्ही दोघे बाहेर गेलो की ही एकटीच मुलगी करुन करुन काय करणार? तेवढ्या वेळात आपण आपले काम करुन मागील बाजूस असलेल्या कंपाऊंड वॉल वरुन उडी मारुन पळून जाऊ शकतो असा आत्मविश्वास त्याला असणार !
पण ही बया इथे आपल्यामागे कशाला कडमडली आहे असा विचार त्याच्या मनात आला असणार.
तेवढ्यात स्वप्नालीने चटणीची मूठ त्याच्या चेहऱ्यावर भिरकावली. तिचे धाडस पाहून तो कदाचित घाबरला असावा. अचानकपणे झालेल्या या प्रसंगामुळे काय करावे हे त्याला सुचले नाही.चटणी त्याच्या डोळ्यात गेली होती. पण ती चटणी पावडर नसून कांदा लसूण मिसळलेली चटणी होती. जर ती पावडर असती तर तो तिथून दूर जाऊच शकला नसता.परंतू चटणीचा एक कणही करामत करु शकतो. त्याच्या डोळ्यांत चटणी गेल्याने डोळे चोळत ती चावी, तो अर्धवट उघडलेला लाॅकर तिथेच सोडून तो चोर तिथून दरवाजाकडे पळाला.तो पळत असताना डोळ्यांची आग होत असल्याने वेडावाकडा पळत गेला. त्याच्या हातात असलेला छोटा चाकू स्वप्नालीच्या हाताला स्पर्शून गेला.तिला थोडेसे खरचटले होते. त्याने मागच्या कंपाऊंड वॉल वरुन उडी टाकली.
इकडे स्वप्नालीने चोर चोर म्हणून ओरडा केला.पण त्या घराच्या बाजूला मोकळी जागा होती.बाकीची घरे पलिकडच्या बाजूला होती.तरी तिचा आवाज ऐकून शेजारी गोळा झाले.
तेव्हा मोबाईल फोन नव्हते.

आम्ही परत आलो तर दुरुनच घराजवळ गर्दी दिसली. तिथे साप फार निघत त्यामुळे मला वाटले, सापच निघाला असेल.पाय उचलत आम्ही पटापटा आलो तेव्हा घडलेला प्रकार समजला.आधी मी कन्येला मिठी मारली.
जमलेले शेजारी म्हणाले,
" एकदा चेक करा.कपाटातील काही गेले नाही ना?"
मी कपाटाजवळ जाऊन बघितले तर त्याने लाॅकरचा खटका फिरवला होता पण समोरच असलेल्या एकाही दागिन्याला हात लावला नव्हता.दहा तोळे सोने कपाटात होते.

स्वप्नालीने राखलेल्या प्रसंगावधानामुळे दागिने वाचले. पोलिस इन्स्पेक्टरनी तिचे कौतुक केले. पाटील बाईंच्या स्वप्नालीने चोराला पळवून लावले म्हणून तिथले आसपासचे सगळे कौतुक करायला बरेच दिवस येत होते.पण मला मात्र भीती वाटत होती की तो चोर याचा वचपा काढण्यासाठी परत कधीतरी येईल. त्यामुळे तेव्हापासून मी कन्येला एकटीला घरात कधीच ठेवले नाही.त्यानंतर तीन महिन्यांत आम्ही वाई सोडून सातारला रहायला आलो आणि माझ्या मनातील भीती संपुष्टात आली.तेव्हापासून कधीच कपाटात दागिने ठेवले नाहीत.आणि चटणी पावडरची एक पुडी कायम जवळ बाळगायची सवय लावून घेतली.
तर हा अनुभव कसा वाटला नक्की सांगा.
©® सौ.हेमा पाटील.
तर हा अनुभव कसा वाटला नक्की सांगा.
©® सौ.हेमा पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा