चौथी माळ: देवी कुष्मांडा
“या देवी सर्वभूतेषु माँ कुष्मांडा रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।“
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।“
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेच्या कुष्मांडा रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे. कुष्मांडा देवीची महती अनन्यसाधारण आहे. या विश्वाची , सृष्टीची निर्मिती देवी कुष्मांडाच्या स्मितहास्याने झाली असे म्हणतात. देवीने तिच्या हातामध्ये अमृत कलश, निधींची माळ, चक्र, गदा, कमळ, बाण व कमंडलू धारण केलेले आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक्समध्ये कांस्य पदकाने गौरवान्वित होऊन आपल्या ध्येयापर्यंत भिंगरीसारखे धावणारी म्हणजे सिमरन शर्मा ही देवी कुष्मांडाच्या प्रतिमेस साजेशी आहे.
अकाली झालेल्या गर्भधारणा वितरण म्हणजे प्रि मॅच्युअर डिलीव्हरीमुळे दृष्टिहीन झालेली सिमरनने, देवी कुष्मांडासारखी जिद्द व सकारात्मकतेच्या जोरावर स्वतःचे विश्व निर्माण केले. तिची सृष्टी अमान्य करणार्या प्रवृत्तींना मान्य करण्यास भाग पाडले.
“भाग मिल्खा भाग” सारखे “भाग सिमरन भाग” एवढा एकच ध्यास घेऊन ही धावपटू बंदुकीच्या गोळीला पण मागं टाकून आपल्या महत्त्वाकांक्षाला गवसणी घालायला धावली.
देवी कुष्मांडासारखी सिमरन च्या एका हातात विक्रम करण्यासाठी धडपडीची माळ, गदेरूपी येणार्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची ताकद व चक्ररूपी संपूर्ण सृष्टीला जिंकण्यासाठीची पूर्व तयारी ची आहे.
येणार्या पुढच्या प्रत्येक पिढीने आदर्श घेण्यासाठी सिमरनच्या हातातल्या अमृत कलशाकडे नक्कीच डोकावावं. त्यातून मिळणारी प्रेरणा ही अंधाराला आयुष्यात हुलकावणी लावून यशाची ज्योत पेटवेल हे नक्कीच.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मिळालेल्या सिमरन च्या अभूतपूर्व यशाला पक्की जोड लाभली तिच्या गुरु, नवरा व साथीदाराची. या गुरुशिष्यांची जोडी अधिकाधिक यशाचे मीटर पळत राहोत हिच देवीचरणी प्रार्थना.
“काळाकुट्ट अंधार, पण प्रेरणा प्रकाशाची
अनमोल गुरुच्या साथीने,यशाच्या पायऱ्या चढती.”
अनमोल गुरुच्या साथीने,यशाच्या पायऱ्या चढती.”
प्राजक्ता जोशी सुपेकर
०६|१०|२०२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा