"वहिनी ..आज मस्त चिकन बिर्याणी बनव.
बरेच महिने झाले खाल्ली नाही.
घरामध्ये शिरणाऱ्या काव्याला पाहून तिच्या नणंदेने म्हणजेच कोमलने फर्माईश केली.
काव्या फक्त तुमच्यासाठीच बिर्याणी कर. मला मुगाची खिचडी दे करून..सासूबाईंनी पण बसल्या जागी ऑर्डर देऊन टाकली.

काव्या तणतणतच आपल्या खोलीमध्ये फ्रेश व्हायला निघून गेली.
सहा महिन्यांपूर्वी नणंदेच्या नवऱ्याची या शहरात बदली झाली. नवऱ्याबरोबर ती पण नोकरी करायची. पण इथे आल्यापासून प्रत्येक शनिवार - रविवार कोमल आपल्या माहेरी ठाण मांडून असायची. दुसऱ्या दिवशी नवऱ्याला पण माहेरीच जेवायला बोलवायची.
घरकामात मदत करणं तर दुरच...
उलट काव्याला आज पुरीभाजी बनव, पुलाव बनव, बिर्याणी बनव, अशा ऑर्डर देत असायची. शिवाय तिची २ मुलंही कमी नव्हती.
मामी आज पावभाजी पाहिजे, कटलेट पाहिजे, डोसे पाहिजे म्हणून मागे लागायची.
त्यात भरीस भर म्हणून सासूबाईदेखील मला हे जमत नाही साधंच काहीतरी बनव अस सांगून तिचं काम वाढवायच्या.
त्यामुळे सुट्टीच्या दिवशी देखील तिचा पूर्ण दिवस किचनमध्ये जायचा.
काव्याला आराम मिळत नव्हता आणि तिची चिडचिड वाढली होती.

रात्री बिर्याणी खाऊन झाल्यानंतर सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत बसले आणि काव्या एकटीच किचनमधला पसारा आणि भांडी आवरत बसली.
सकाळच्या नाश्त्यासाठी डोश्याच पीठ वाटून ठेवलं. सगळ करून तिला झोपायला जायला ११:३० वाजले.
सकाळच्या नाश्त्यासाठी डोश्याच पीठ वाटून ठेवलं. सगळ करून तिला झोपायला जायला ११:३० वाजले.
खोलीमध्ये तिचा नवरा म्हणजे निशांत वाटच पाहत होता.
ये काव्या बस ! मी समजू शकतो तुझा त्रास पण कोमलला असं डायरेक्ट कसं बोलणार की नको येऊस. शेवटी हे तिचंच माहेर आहे ना.
काव्या - अहो माझी अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी मला थोडीतरी मदत करावी . प्रत्येकाला वेगळं करत बसणं नंतर आवरत बसणं माझ्या जीवावर येतंय हो आता. शिवाय आपल्याला बाहेर कुठे जाता येत नाही. जायचं म्हटलं तरी यांचं करून जा.
यावर निशांतने काव्याच्या कानात काहीतरी सांगितले.
काव्याने निर्धास्त होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्ता, दुपारचे २ प्रकारचे जेवण , संध्याकाळी परत काहीतरी हलका फुलका नाश्ता.
रात्री कोमल आणि तिच्या नवऱ्याला द्यायला जेवणाचा डब्बा. सर्व काही न वैतागता केलं.
रात्री कोमल आणि तिच्या नवऱ्याला द्यायला जेवणाचा डब्बा. सर्व काही न वैतागता केलं.
पुढच्या शुक्रवारी दुपारी कोमलच्या दाराची बेल वाजली. समोर दादा वहिनी, आईला पाहून तिला आश्चर्य वाटले.
अरे तुम्ही असं अचानक?
आम्ही आता निघणारच होतो तिकडे यायला. काय हे आई ? तू तरी कळवायचं ना.
आम्ही आता निघणारच होतो तिकडे यायला. काय हे आई ? तू तरी कळवायचं ना.
अगं तुझी वहिनी आज ऑफिस मधून लवकर आली . बोलली नेहमी तूच मुलांना घेऊन येतेस जातेस किती दगदग करतेस. त्यापेक्षा आपणच आज जाऊन सरप्राइज देऊया...
आई हसत म्हणाली.
आई हसत म्हणाली.
कोमलने सर्वांना चहा नाश्ता दिला.
कोमल आज मस्त भरली वांगी आणि भाकरी कर. - निशांत.
हो दादा करते. - कोमलने किचन आवरता आवरता उत्तर दिलं.
कोमल भाकरी करणार आहेस तर मला साधं पिठलं कर. - आई
मम्मीsss आम्हाला नुडल्स... मुलं एकसुरात ओरडली.
नाही आता नुडल्स वैगेरे नाही मिळणार. गपचूप भाजी भाकरी खा.
सारखं सारखं काय ते पास्ता नुडल्स पाव भाजी . कोमल आतून मुलांना ओरडत म्हणाली.
सारखं सारखं काय ते पास्ता नुडल्स पाव भाजी . कोमल आतून मुलांना ओरडत म्हणाली.
अगं पण तूच बोलली होतीस ना जे काय खायचं आहे ते मामी ला सांगा.
आता आम्हाला नुडल्स हवेत. तू कर ना.
मुलांचं उत्तर ऐकून काव्या ने कोमलकडे पाहिलं तशी कोमलने दुसरीकडे नजर वळवली.
दुसऱ्या दिवशीही कोमलला चहा नाश्ता , चारीठाव स्वयंपाक करावा लागला.
आणि तिची पूर्ण दुपार मागचं आवरण्यातच गेली.
संध्याकाळी पुन्हा निशांतच्या मागणीनुसार तिला भजी तळावी लागली.

संध्याकाळी जेव्हा सर्व परत घरी गेले तेव्हा कुठे कोमलला पाठ टेकवायला मिळाली.
लागोपाठ २ आठवडे परत तेच घडलं.
न कळवता निशांत काव्या आणि आई दारात हजर.
दोन दिवस मुलांचं, मोठ्यांच, करता करता कोमलला आता राग येऊ लागला.
न कळवता निशांत काव्या आणि आई दारात हजर.
दोन दिवस मुलांचं, मोठ्यांच, करता करता कोमलला आता राग येऊ लागला.
त्यात सगळे घरी गेल्यावर कोमलच्या नवऱ्याने तिला चांगलेच सुनावले.
सतत काय गं तुझ्या घरचे येत राहतात. सुट्टीच्या दिवशी तरी दुसऱ्यांना प्रायव्हसी द्यावी एवढंही कळतं नाही का तुझ्या दादा वहिनीला.
महिन्यातून एकदा ठीक आहे पण दरवेळी ते आलेले राहिलेले मला चालणार नाही. त्यांना काय सांगायचं ते तू बघं.

कोमलला ही या गोष्टीचा त्रास होतंच होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती तडक आपल्या माहेरी गेली.
आई.....आई....
दादा वहिनी कुठे आहेत ? आणि मला सांग तुला तरी पटतं का हे?
काय झालं कोमलताई..? काव्याने आतून पाणी आणत विचारले.
तुमचं काय सुरू आहे वहिनी.
हे माझं घर आहे म्हणून येते मी पण तुम्ही तर याच्या उलट सुरू केलंत. मला किती काम पडतात माहित आहे का तुम्हाला ?

हेच तुला दाखवून द्यायचं होत कोमल . आता कळलं ना तुला तुझ्या वहिनीला पण किती त्रास होतं असेल. निशांत बाहेर येत म्हणाला.
आपलं नातं, तुझं माहेर सुटू नये म्हणून ती सहन करत होती. पण त्यालाही एक मर्यादा असतेच ना. तिलाही हक्काचे २ दिवस मिळतात आराम करायला . त्यात तिने तुझंच कराव का?
कोमल ताई तुम्ही या , हवं तेवढं रहा पण फक्त मदत करा एवढीच अपेक्षा आहे .
काव्या.
काव्या.
सॉरी वहिनी माझं चुकलंच बघं.
हक्काचं माहेर म्हणून मी आराम करायला यायचे पण तुला किती त्रास होतो याचा विचारच नाही केला . इथून पुढे मी माझी चूक सुधारेल.
हक्काचं माहेर म्हणून मी आराम करायला यायचे पण तुला किती त्रास होतो याचा विचारच नाही केला . इथून पुढे मी माझी चूक सुधारेल.
काव्या ने हसत हसत कोमलला मिठी मारली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा