Login

चूक कुणाची भाग ३

लघुकथा
"हो, अर्जुन. पण आधी आपण त्याच्याशी शांतपणे बोलायला हवं. दोष देऊन काही होणार नाही. आपण दोघेच त्याचे आई-वडील आहोत, आपली जबाबदारी आहे ही."रिया म्हणाली
शौर्य तेवढ्यात हॉलमध्ये आला. त्याने वडिलांकडे बघितलं पण काही न बोलता बसायला गेला. वातावरण जरा जड झालं. अर्जुन त्याच्याजवळ गेला.
"शौर्य, काल काय झालं, आपल्याला माहीत आहे. आम्ही तुझ्यावर ओरडणार नाही, पण समजून घ्यायला आलो आहोत. काय वाटतंय तुला? का असं केलं?" अर्जुन
शौर्य काही वेळ शांत बसला. मग हळूहळू बोलायला लागला.
"डॅड, तुम्हा दोघांनाही वेळच नव्हता. आमच्याशी बोलायला, गप्पा मारायला, काहीही नाही. सगळं फक्त पैसे आणि गिफ्ट्सवर चाललं होतं. मलाही चांगलं-वाईट कळतंय... पण त्या रिकामपणातून मी चुकलो. कुणी थांबवायला नव्हतं."शौर्य म्हणाला
त्या क्षणी रिया आणि अर्जुनला आपली चूक लक्षात आली. केवळ "सोयी" देऊन त्यांनी "साथ" दिलीच नव्हती.
"शौर्य, आम्ही खरंच चुकलो. तुला वेळ द्यायला हवाच होता. पण अजून उशीर झालेला नाही. आपण सगळं एकत्र पुन्हा सुरुवात करू."रिया
"मी काही दिवस ऑफिसपासून ब्रेक घेतो. फक्त आपल्यासाठी. सिया, तू आणि आम्ही दोघं. एकत्र वेळ घालवूया. आपलं कुटुंब पुन्हा एकत्र येऊ दे."अर्जुन बोलला
शौर्यच्या डोळ्यांत पाणी आलं. तो आई-वडिलांना बिलगला.
"मीही बदलायचं ठरवलंय. पण मला तुमचा वेळ आणि साथ हवी."शौर्य म्हणाला

हे ऐकून अर्जुन आणि रिया एकमेकांकडे बघून डोळ्यांनीच एकमेकांना प्रॉमिस करत होते जणू सांगत होते की आता ह्यापुढे कुटुंबाला जास्त महत्त्व द्यायचे आणि त्यांच्या सोबत वेळ घालवायचा.त्यांना कळले होते की पैसाच सर्वकाही नाही आहे.मुलांना फक्त पैसे देऊन आणि सुखसोयी देऊन त्यांच्यावर संस्कार नाही होऊ शकत.ह्यापुढे काहीही चुकीचे होऊ नये म्हणून त्यांनी आता पर्यंत करत आलेली चूक सुधारवायची ठरवले.

सिया आणि शौर्य ला आज खूप मोकळे वाटत होते इतक्या दिवसांपासून त्यांना जे हवे होते ते शेवटी त्यांना मिळाले होते आणि आज पासून एक नवीन आयुष्य सुरू होणार होते.त्याच क्षणी एक नवीन वळण त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्याला मिळाले. सिया आणि अर्जुन ह्यांनी आई वडिलांना मिठी मारली आणि स्माईल करत एकमेकांना टाळी दिली.त्याच्या कुटुंबाची नवी सुरुवात झाली होती एकमेकांच्या मदतीने