चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदलेखन कथा
जलदलेखन कथा
चूक कोणाची? भाग १
©® सौ.हेमा पाटील.
"ओ ताई, आईंना जरा समजवा. अजिबात ऐकत नाहीत. तुमचे तरी ऐकतील. " रश्मी म्हणाली.
" आता काय झाले?" विद्याने विचारले.
" बघा, मी कट्टा पुसू नका म्हणतेय तर माझा हात इतक्या जोरात पिरगाळला, की लालभडक झालाय आणि सुजलाय."
" आईने? " विद्याने आश्चर्याने विचारले. आपण लहान असताना कधी आईचा मार खाल्लेला तिला आठवत नव्हता. ती फारतर रागवायची. पण मारणे तिला कष्टप्रद वाटे.
'एकदा मी तिला न सांगता मैत्रिणीकडे अभ्यासाला गेले होते . तेव्हा आपल्याला शोधून शोधून ती घाबरली होती. आपण परत आल्यावर मात्र तिच्या हातचा मार खाल्ला होता.' ही एकमेव आठवण विद्याकडे होती.
आता समीरची बायको, तिची वहिनी रश्मी तिला चक्क सांगत होती की, आईने तिचा हात पिरगाळला. यावर विश्वास ठेवणे विद्याला जड गेले. ती म्हणाली,
आता समीरची बायको, तिची वहिनी रश्मी तिला चक्क सांगत होती की, आईने तिचा हात पिरगाळला. यावर विश्वास ठेवणे विद्याला जड गेले. ती म्हणाली,
"रश्मी, आईला फोन दे बघू." रश्मीने आईंकडे फोन दिला.
" आई, काय म्हणतेय गं रश्मी? तू ऐकलेस ना? काय झाले आहे?" विद्याने विचारले.
" कुठे काय झालेय? मी किचनकट्टा पुसत होते. आता माझे काम रश्मीला आवडेना. ती मला म्हणाली, ' बाजूला व्हा. मी पुसते.' मी कापड दिले नाही म्हणून तिला राग आला आणि तिने तुला फोन केला."
यावर विद्या काही बोलायच्या आधीच रश्मीची मोठ्याने चाललेली बडबड विद्याला ऐकायला आली. रश्मीने आईच्या हातातून फोन हिसकावून घेतला असावा, ती म्हणाली,
"आई खोटं बोलतायत. त्यांनी माझा हात खरंच पिरगाळलाय. मी फोटो पाठवते तुम्हाला." असे तणतणत रश्मीने फोन कट केला. तिला आईला समजवण्याचीही संधी दिली नाही.
दोन मिनिटांनी विद्याला वाॅटसअपवर मेसेज आला. विद्याने पाहिले तर रश्मीचा मेसेज होता. तिने ओपन करून पाहिला तर रश्मीचा हात थोडा लालसर दिसत होता. ते खोटे आहे असे विद्या म्हणू शकत नव्हती, पण आई असे काही करेल असेही तिला वाटत नव्हते. त्यावेळी तिथे नेमके काय झाले असेल या विचारात ती पडली.
दोन मिनिटांनी विद्याला वाॅटसअपवर मेसेज आला. विद्याने पाहिले तर रश्मीचा मेसेज होता. तिने ओपन करून पाहिला तर रश्मीचा हात थोडा लालसर दिसत होता. ते खोटे आहे असे विद्या म्हणू शकत नव्हती, पण आई असे काही करेल असेही तिला वाटत नव्हते. त्यावेळी तिथे नेमके काय झाले असेल या विचारात ती पडली.
तिने आईच्या मोबाईलवर फोन केला व आईला सांगितले,
"जरा बाजूला कुठेतरी जा. मला तुझ्याशी बोलायचे आहे." आईने फोन कट केला व ती बाहेर आली. खाली गार्डनमध्ये बाकड्यावर बसल्यावर तिने विद्याला फोन केला.
"आई, खरं खरं सांग, काय झाले मगाशी? गेल्या वर्षापासून रश्मी तुझी तक्रार करायची, पण त्यात एवढे विशेष काही नसायचे. गेल्या वर्षापासून हे वारंवार घडतेय. आज मात्र तू तिचा हात पिरगाळलास असे ती म्हणतेय. मी तुला काही म्हणणार नाही, मला खरे काय झाले ते सांग."
" अगं कुणाची शप्पथ घेऊ सांग? मी हात पिरगाळला नाही. मी कापड दिले नाही याचा तिला राग आला आणि तिने तुला फोन करुन काहीही खोटेनाटे सांगितले. तू तुझ्या आईला ओळखत नाहीस का?"
" मी तर माझ्या जन्मापासून तुला पाहत आलेय. तू कशी आहेस हे मला माहीत आहे. मला एक कोडे पडलेय. समीरच्या लग्नाला दहा वर्षे झाली. या दहा वर्षांत तुझ्याबद्दल रश्मीने कधीच तक्रार केली नाही. मग आत्ताच का? "
का? हे प्रश्नचिन्ह खूपदा खोल रूतलेले असते. वरवर पहाता याचा अर्थ लक्षात येत नाही. पाहूया पुढील भागात काय होते ते.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
काय होते पुढे? खरे काय आहे? हे जाणून घेण्यासाठी पुढील भागाकडे वळूया.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा