चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
जलदलेखन कथा
जलदलेखन कथा
चूक कुणाची भाग २
©® सौ.हेमा पाटील.
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, रश्मीने विद्याला फोन करून तिच्याकडे आईबाबत तक्रार केली. याची शहानिशा विद्या करत आहे. आता पुढे..
"आई सांग ना? आजवर तू कधीच रश्मीबाबत तक्रार केली नाहीस. मी विचारले तरी तू काहीच सांगायची नाहीस.
घर म्हटले की भांड्याला भांडे लागायचेच. त्यात तुला सांगण्यासारखे काहीच नाही असेच तू नेहमी म्हणायचीस. इतर सासवांसारखे तुला सुनेचे उणे-दुणे काढताना मी कधीच पाहिले नाही. बाबा गेल्यानंतर तर तू अधिकच शांत झालीस. मग आता असे का?" विद्या आईला विचारत होती.
" विद्या, रश्मी असं का म्हणते मला खरंच काही कळत नाही. मी तर आजपर्यंत जशी वागत होते तशीच आजही वागतेय. इतक्या वर्षात माझ्यात काही बदल झाला नाही तर आता काय होणार?" प्रमिलाताई म्हणाल्या.
" अगं पण ती अंगावर हात टाकला असा आरोप करतेय. तिने तसा फोटोही पाठवलाय मला." विद्या आईला म्हणाली.
" आता मी काय बोलू यावर? असे म्हणत आई गप्प बसली.
"आपल्यासारख्या सुशिक्षित कुटुंबात असा प्रकार घडतोय याचा मला धक्का बसला आहे. समजा, तू नाही हात पिरगाळला तर मग रश्मी का तसे सांगतेय? तुम्हां दोघींपैकी एक कुणीतरी खोटे बोलतेय. ते कोण आहे हे कसे शोधायचे हा माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे."
विद्याचे डोके चक्रावले होते.
'तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू, तर तो फोटो समोर दिसतोय. तिच्यावर विश्वास ठेवू तर गेल्या दहा वर्षांतील तुमचे दोघींचे समंजस नाते नजरेसमोर येतेय. काहीतरी मिसिंग आहे यात. ते काय मिसिंग आहे याचा शोध घ्यायला हवा.' मनातल्या मनात विद्याचे विचारचक्र सुरू होते.
विद्याचे डोके चक्रावले होते.
'तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू, तर तो फोटो समोर दिसतोय. तिच्यावर विश्वास ठेवू तर गेल्या दहा वर्षांतील तुमचे दोघींचे समंजस नाते नजरेसमोर येतेय. काहीतरी मिसिंग आहे यात. ते काय मिसिंग आहे याचा शोध घ्यायला हवा.' मनातल्या मनात विद्याचे विचारचक्र सुरू होते.
विद्याची आई, प्रमिलाताई प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. आयुष्यभर सचोटीने नोकरी करून निवृत्तीनंतरचे आयुष्य उपभोगत होत्या. दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले होते. यजमान चार वर्षांपूर्वी देवाघरी गेले होते. त्यांना स्वतःची पोटापुरती पेन्शन होती. कुणापुढे हात पसरावे लागत नव्हते. शहरातील फ्लॅट त्यांच्या नावावर होता.
समीरच्या दोन्ही मुलांना त्यांचा खूप लळा होता. मुले लहान असताना कायम आज्जीभोवती असत. असे सगळे व्यवस्थित असताना अचानक अशा कुरबुरी वरचेवर कानावर येऊ लागल्या होत्या.
"रश्मी, पुढच्या आठवड्यात मी नाशिकला येतेय चार दिवसांसाठी. तेव्हा समोरासमोर याबाबत बोलू. तोपर्यंत शांत रहा." असे तिने रश्मीला सांगितले.
काहीतरी चुकतेय किंवा आपल्यापासून लपवले जातेय असे विद्याला वाटले. 'आपण चार दिवस तिथे राहिलो की लक्षात येईल. मग यावर निर्णय घेऊ.' असे विद्याने ठरवले तरी तिच्या डोक्यातून तो विषय काही जाईना. आई अशी का वागतेय? की रश्मी खोटे बोलतेय या विचारात चार दिवस कसे गेले तिला समजले नाही.
क्रमशः
काय समोर येईल विद्याच्या? आई खोटे बोलत होती? तुम्हाला काय वाटते? पाहूया पुढील भागात...
काय समोर येईल विद्याच्या? आई खोटे बोलत होती? तुम्हाला काय वाटते? पाहूया पुढील भागात...