चुकीला माफी नाही : भाग २

नणंद भावजय चे सुंदर नाते
ताई, जीजू आज असे का घाई करत होते आपल्याला? अनिकेतच्या प्रश्नाने एवढा वेळ गाडीत गाणे ऐकत बसलेली साक्षी भानावर आली. 
घरी पोहोचल्यावर सर्व सांगते. आनिकेत आपण ना मध्ये उतरून मस्त बटाटे वडे खावूया. साक्षी ने अगदी अल्लड पणे भावाला सांगितलं. 
बरं खावुया, अस म्हणत अनिकेतने गाडी हॉटेल समोर थांबवली.
ए ए, आज्जी आजोबांचं घर आले, म्हणत आरु उड्या मारत होती. अनिकेत आणि साक्षी जोर जोरात हसू लागले. 
आरु वेळ आहे अजून, आता आपण खावू खायला उतरत आहोत.
मस्त बटाटा वडा आणि गरम गरम चहा पीवून साक्षी फ्रेश झाली. सकाळ पासून सर्व जेवण नाश्ता बनवला पण स्वतःच्या तोंडात एक घास नव्हता गेला तिच्या.
ताई, तू दमल्या सारखी वाटते. आरुकडे माझे लक्ष असेल तू आता जरा शांत डोळे मिटून बस गाडीत.
खरच माहेरच सुख काय असते, हे साक्षीला भावाच्या ह्या बोलण्याने कळल. शांत डोळे मिटून गाडीत बसलेल्या साक्षीला आरूची काळजी वाटलीच नाही. मस्त जुनी मराठी गाणी आणि माहेरच्या वाटेचा प्रवास, सारेच कसे आल्हादायक. पण माहेराची ही माया रश्मी वन्स ना खरच सुख देते का? उठ सुट उठून त्या इकडे येतात. आताही आल्या असतील, आईंचे कान भरायला. भावाच्या संसारात ढवळा ढवळ करून काय आनंद मिळतो ह्यांना?
असा विचार करत असतानाच आईच्या बंगल्या समोर कधी गाडी थांबली कळल सुधा नाही.

आजी.. आजी.. करत आरु आजी कडे धावली पण. आशू वाहिनीने सामान हातात घेत आत पण आली. आई म्हणत बिलगले मी, बाबा...म्हणत मिठी मारली त्यांना. तोपर्यंत आशू वाहिनीने मस्त पाणी दिलं. आरु तर मामा सोबत रमली घरी. मस्त फ्रेश झाल्यावर माझा आवडत संत्र्याच सरबत आणि गरमा गरम थालिपीठं घेवून आई आली. खूप मस्त, खात खात गप्पा झाल्या. आशू वाहिनीने तोपर्यंत स्वयंपाक बनवून ठेवला. सर्वजण आरूच्या बोबड्या बोलण्यात हरवून गेले. सचिन मी पोहोचली हा. अस कळवत नवऱ्याची पण काळजी दूर करून मस्त आरामात बसली.
तेव्हड्यात सासूचा फोन आला. उचलायची ईच्छा तर नव्हतीच पण उचलला. 
साक्षी अग तुमचं बेडरूम बंद आहे वाटत. म्हणून तुला फोन केला. आई...मला नाही माहित काही ह्यांना विचारा.
बर बर म्हणत, सासू ने फोन ठेवला.

काय बाई आहे? साधी चौकशी पण नाही केली, पोहोचली का अशी.मरू दे त्यांचा विषयच नको. मला आता मनसोक्त राहू दे.
इकडे सचिन येताच आईने बडबड सुरू केली. "रश्मी, आता काय तुझा भाऊ त्याच्या बायकोच्या सांगण्याने बेडरूमला कुलूप लावून जाणार. म्हणजे आमच्या वर विश्वास नाही हा त्याचा".
हे बघ उगाच आरडा ओरडा नको. कोणी मला काही सांगितलं नाही. माझ्या ऑफिस मधल्या काही महत्वाच्या फाईल्स आत आहेत, म्हणून मी तसे केलं. 
अरे दादा पण तुझ्या फाईल्स कोण घेणार? रश्मीच्या बोलण्यावर सचिन जोरातच बोलला. मागच्या वेळी पण साक्षीची साडी आपोआप हॉल मध्ये आलेली. म्हटल परत तसे काही नको.
रश्मी मान खाली घालून आत निघून गेली. काही बोलायला शब्दच नव्हते.
आई पण ते ऐकून तोंड बंद करून राहिली. सचिन ने जेवून घेतल आणि तो सरळ बेडरूम मध्ये निघून गेला.
रश्मी तू नको लक्ष देवू, मस्त आमरस पी. आवडतो ना तुला?
हो आई म्हणत, ती जेवू लागली.
दोघींनी आवरून घेतल आणि झोपायला गेल्या. रश्मी थोडी गप्प च होती.
साक्षीची सकाळ मस्त निवांत झालेली. आई काय बनवते? अस म्हणत ती किचन मध्ये रेंगाळत होती. वहिनी नाही का उठली? 
अग उठली ती, आवरते आहे स्वतःच. तोपर्यंत मी पोहे करते. ती पूजा पाठ करून मग येईल चहा द्यायला.
तुझ्या बाबांना सुनेच्या हातचा चहा आवडतो .
अरे वाह, वहिनी म्हणजे तुझ्या पेक्षा छान चहा बनवते तर?

अग साक्षी, अस नाही म्हणायचं. आहेच तिच्या हाताला चव. ती छान बनवते तो चहा ह्यांना आवडतो. मग त्यात काय झालं?
मी नसते तेव्हा घर छान सांभाळते. मग उगाच का तिला बोलू मी?
अग आई, पण तू एवढं छान करते मग ती कशी काय वरचढ? 
कोणी सांगितलं की ती माझ्या वरचढ आहे?
अग, आता तूच तर बोलली की बाबांना तिच्या हातचा चहा आवडतो. एवढे दिवस तू द्यायची, म्हणून मी बोलली.
साक्षी थांब, चुकते आहेस तू.

बाबांना तिच्या हातचा चहा आवडतो ह्यात बाबांची आवड बदलली, आणि साहजिकच आहे कोणताही पदार्थ त्याच त्याच चवीचा खात राहण्या पेक्षा थोडा बदल करावा. ह्यात आशू ची काय चूक?

चल तू ये फ्रेश होऊन, मी पोहे देते. ही बघ आशू पण आली चहा बनवायला. आशू बेटा चहा बनवून आण तोपर्यंत मी पोहे देते सर्वांना. 

साक्षी, आई आणि आशू कडे बघतच राहिली. एक नंबर पोहे झाले आहेत. मस्तच हा आई. तुझ्या पदार्थांची सर कोणाच्याच हाताला नाही. कालच वांग्याचं भरीत पण मस्तच होत.

साक्षी, कालचे वांग्याचे भरीत, भाकरी आणि कोशिंबीर आशू ने बनवली होती.
आईच्या ह्या बोलण्यावर साक्षी गप्प च झाली.
साक्षी बेटा मस्त पोहे आणि चहा घे. आरु उठली की आपण मंदिरात जावू. बाबांच्या बोलण्याने साक्षी एकदम खुश झाली. साक्षी ताई, हा घ्या चहा तुम्हाला आवडतो तसा भरपूर साय घातलेला. आशू कप पुढे करत बोलली.
वाह, वहिनी….ये हुई ना बात. 
चहा नाश्ता झाल्यावर साक्षी स्वतःच्या लेकीला घेवून बाबांसोबत मंदिरात गेली.